सुविचार-स्मरणी
(५३) लोकांकडून नेहमी सन्मान घेऊ इच्छिणारी माणसे ऐन प्रसंगी अपमानास पात्र होतात. याकरिता आपला उगीच मान व्हावा असे चिंतू नका आणि सर्वाशी समान भावनेने वागा.
(५४) देहापेक्षा कर्तव्याचा मान लाखोपटीने उत्तम असतो आणि चिरंतर ही (अमर) असतो.
(५५) पुढे सरकाल तर सेवेकरिता आणि मागे हटाल तर मानाकरिता (सन्मानप्रसंगी); असे झाले की लोकमित्र निश्चयाने व्हाल.
(५६) निर्वैर भावातही आपला सत्यपेक्ष न सोडणे म्हणजे प्रतिपक्षाला दुरुस्त करणारा आदर्श दाखविणेच होय, थोर लोक ही गोष्ट केंव्हाही विसरत नसतात.
(५७) आपले दोष दुसऱ्याला सांगण्याएवढी जरी हिंमत नसली, तरी ते दोष आहेत असा भाव मनात जागृत असू द्या, म्हणजे दुरुस्त व्हालच.
(५८) मानाकरिता उपवासी न राहता कामाकरिता चपळ असलेले बरे, म्हणजे मान (कि्ती) आपोआपच मागे लागून येईल.
(५९) भक्तिवान मनुष्याने आपल्याला आवश्यक असणारे कामही न करणे म्हणजे भक्तीच्या पांघरुणात लपून अघोर पाप वाढवणेच होय.
(६०) ज्यांना धन, मान, वैभव, संप्रदाय इ. गोष्टी अत्यंत आवडत असतील त्यांच्याकरिता समाज-सेवकाच्या आणि ईश्वर भक्तांच्या सभेत कोठेही स्थान नाही.

सुविचार-स्मरणी
(६१) मित्रांनो ! आपल्यासमोर जेंव्हा कोणत्याही मनुष्य मात्रात काही कमतरता दिसून येईल, तेंव्हा त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या आणि त्याचा जन्म सफल करा. याच्याएवढे पुण्य सर्व जगात दुसरे नाही.
(६२) जी गोष्ट ज्याच्यात उपजत अंशत:ही नाही, तिची हौस करुन त्याने आपली फजीती करुन घेऊ नये.
(६३) अतिआग्रहानंतरही मनुष्याने तेथून जाणे आणि बाहेर निघताच तेथे घोर आपत्ती कोसळणे, हेही एक परमेश्वराच्या कार्यापैकी आपले अस्तित्व दर्शविणारे कार्यसूत्रच आहे; की जे नकळत मनुष्याकडून वेगळेच कार्य घडवून आणते.
(६४) अचानक घडून येणाऱ्या ईश्वरी योगाच्या वेळी थोरांचीही बुद्धी कुंठित होत असते, कारण तो प्रसंग अनावर असतो.
(६५) वीरांच्या भरवशावर आपली वीरता दाखविणारे लोक वास्तविक अबलेपेक्षाही कमी धैर्यवान असतात.
(६६) काहीतरी उद्योगकला शिकल्याशिवाय जिवंत राहणे म्हणजे भूमीला भार होणेच आहे.
६७) सद्य:परिस्थितीतील दुःखी जीवांना उद्योगशील करुन त्यांच्यात आनंद निर्माण करणे हीच कला सर्व साहित्यात व कलांमध्ये मला श्रेष्ठ वाटते.
(६८) मित्रांनो ! जी गोष्ट तुम्ही तुमच्याकरिता उत्तम समजता, तीच गोष्ट दुसरऱ्याकरिताही तेवढीच उत्तम समजून मदत करा.
(६९) जवळच्या माणसाला फाटके पांघरूण असता आपल्याजवळ अधिक कपड़े संग्रही ठेवणे, हे परमेश्वराला खपत नसते.

सुविचार-स्मरणी
(२६७) मितरांनो । विषयवासना संपूर्ण जागृत झाल्यावर कोणीही पुरुष तिला रोखू शकत नाही कारण त्यावेळी विचार बुदीच नष्ट झालेली असते.
(२६८) ज्ञानसंपन्न साधकलोक मोहप्रसंगी लगेच विषयभावनेची प्रवृत्ती मोडून दुसरा प्रसंग विवेकाने निर्माण करितात.
(२६९) वाघ शिकारीच्या युक्तीने वाघ होत असतो तसाच साधू संयमाच्या अभ्यासानेच साधू होत असतो.
(२७०) गावातील कुतुहल मानणाऱ्या-कौतुक करणाऱ्या बहुसंख्य लोकांपेक्षा समजदार आणि लोकसंग्रही अशा एका माणसाचे शब्दसुद्धा बहुमोलाचे असतात.
(२७१) जसे शरीर बनण्याकरिता रोजचा नियमित व्यायाम कारणीभूत होतो. तद्वतच मानसिक शक्तीची उत्तम मूस बनण्याकरिता रोजची प्रार्थनाच महत्त्वाची ठरते.
(२७२) समाजातील एकाच व्यक्तीजवळ अत्यंत द्रव्य असणे, हे देवाचे देण नसून, समाजाच्या बौद्धिक दुर्बलतेचेच द्योतक होय, असे मला वाटते.
२७३) कोणत्याही विशिष्ट वृत्तींचा उदय सहवासाशिवाय होतच नसतो ज्याला ज्या मार्गाने जावेसे वाटेल, त्याच मार्गाच्या पुरुषाची संगती केली पाहिजे. हे म्हणणे फुकट आहे की,आम्ही आपणहूनच शहाणे होऊ.
(२७४) व्यवहारात इमानीपणा व करारीपणा असणे हेच लोकप्रिय होण्याचे खरे बीज आहे.
(२७५) स्वत:ला उपयुक्त व आवश्यक असणारी वस्तु दुसऱ्याच्या कामी लावणे, म्हणजेच त्याग करणे होय. निरूपयोगी, टाकाऊ वस्तु देणे म्हणजे दान करणे नव्हे. अधिक सामुग्री असुनही दुसऱ्यास जरुर ते साह्य न करणे, म्हणजे ते प्रत्यक्ष पापच सग्रंहून ठेवणेच होय.

सुविचार-स्मरणी
(२५७) स्वार्थविवश माणसाच्या बोलण्यावर मुळीच विश्वास नका आणि विषयान्ध माणसाच्या प्रामाणिकतेवर केव्हाही घर सोपवून जाऊ नका.
(२५८) तरुण मुलांनी शृंगाररसाचे गाणे ऐकून कदापि वाईट चितुं नये. वाईट चिंतन म्हणजे आत्मघातच होय !
(२५९) मोठ्यांच्या वजनानेच चांगली आदत (सवय) लागून उत्तम गुण अंगी येत असतात.
(२६०) एकांत हा माणसाच्या विचाराला पुष्टी देणारा भावी परिस्थितीचे स्वप्न दाखविणारा असतो.
(२६१) लोकापवादांचे ओदझे सहन केल्याशिवाय कोणीही नवीन सुधारणा घडवून आणू शकत नाही.
(२६२) गावाची सुधारणा श्रीमंतीच्या बळावरच होत नसते त्याकरिता लोकप्रियताच असावी लागते.
(२६३) बंडखोरपणाने लोकांवर खरे वजन पडत नसते, तर त्याने उलट त्यांच्यात प्रतिकाराची शक्ती उत्पन्न होत असते.
(२६४) निव्यळ भाषणानेच टिकावू लोकमत केव्हाही मिळत नसते तर लोकांच्या कामी पडल्यानेच वास्तविक लोकप्रिय होता येते.
(२६५) पुराणादि ग्रंथाच्या किंवा संतांच्या भाषेत नेहमी दोन प्रकार असतात एक कल्पनाशृंगार आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्षानुभवाचे कथन अनुभवाचा बोध वृत्ती (बुद्धी) करीता असतो व त्यांची जाणीवही तिलाच होत असते आणि कल्पनाशृंगार हा कल्पनेचेच रंजन करणारा असतो.
(२६५) मनुष्याचा पूर्ण विकास त्याच्या कार्यप्रणालीने होत ज़ात असतो. केवळ आत्मनुसंधानानेच होणे शक्य  नाही.

सुविचार-स्मरणी
(७०) दुसऱ्याच्या अडलेल्या कामाकरिता घरात वस्तू असून नाकारू नका, म्हणजे तुमच्याकरिताही लोक धावून येऊन तुमच्या अडचणी दूर करतील.
(७१) तो मनुष्य मनुष्यत्वविहीन होय, जो आपण स्वत: भोजन करुन आणि शेजारच्या मनुष्याला उपवासी पाहूनही काही देत नाही.
(७२) ज्या ज्ञानाने तुम्ही जगाची सत्व परीक्षा करिता तोच तुमचा स्वभाव आहे.
(७३) राजा प्रजेचा आधाराशिवाय राज-मुकूट टिकवू शकत नसतो.
(७४) जगाची सेवा करणाऱ्या लोकांना-आपल्या हातात आपली प्रतिष्ठा, सत्यनिष्ठ लोकांवर प्रेम करणारी प्रबळ वृत्ती, दरिद्री लोकांची अंत:करणात वेदना, संघर्षप्रसंगी धाडस आणि मार खाणे व मरणे याविषयी आध्यात्मिकता ठेवावी लागते अशीच माणसे जगावर आजन्म उपकार करु शंकतात आणि पुढच्या पिढीला धडा देणारे होतात.
(७५) सत्यज्ञान हेच मनुष्याचे स्वरुप आहे. त्याला पहातच (शोधीतच) मनुष्य जगात थोर होत असतो.
(७६) निष्काम प्रेमच अमर आत्म्याचा प्रकृतिस्वभाव आहे.
(७७) सत्य प्रेम हे व्यक्तिभाव विसरुन शुद्ध वृत्तीच्या द्वारे प्रेमी जनांत उदात्ततेचा अनुभव करणारे असते; ज्यायोगे आकुंचितता, क्षुद्रता नष्ट होत जाते, ते प्रेम भक्त लोकांत आणि विनम्र सदाचारी लोकांतच सापडत असते.
(७८) जगाचे सुखदुःखात्मक आघात ज्ञानी पुरुषावरही संभवत असतात, पण तो त्यात आसक्त होत नाही. तो आपल्या जाणिवेने सर्वांचे निरसन करुन लौकरच मोकळा होत असतो.

सुविचार-स्मरणी
(৭८३) मित्रांनो ! आपल्या माननीय वडिलाच्या बोधास जो विन्मुख होतो तो जन्मभर रडत रहातो हे लक्षात असू द्या.
(१८४) ज्या वस्तूशी आपल्या जीवनाचा निकट संबंध येतो ती वस्तू फार विचाराने जवळ केली पाहिजे.
(१८५) उदार, कर्तव्यशूर आणि बुद्धिमान असा आपला वैरीही मित्राप्रमाणे प्रिय मानला पाहिजे, आणि आळशी, निंदक, विश्वासघातकी व व्यसनी असा आपला बहुप्यारा मित्र जरी असला तथापि त्याला शत्रुतुल्यच समजून अंतरात खूणगांठ बांधून ठेविली पाहिजे. कारण, थोडी जरी असावधानी झाली
तरी तो आपल्याला खड्ड्यात नेल्याशिवाय राहणार नाही.
(१८६) मित्रांनो ! कर्तव्यहीन विद्वानापेक्षा कर्तव्यरशील मूढही मला अधिक श्रेष्ठ वाटतो.
(१८७) कोणत्याही माणसाकडे तिरस्कारदृष्टीने पाहू नका. प्रत्येक व्यक्तीकडे आदराने पाहणे हा मानवधर्माचा नियम आहे.
(१८८) आपले मन नेहमी उत्तम विचारात खेळू द्या.
(१८९) मित्रांनो ! आपले जीवन आदर्शमय बनविण्याकरिता जन्मभर विद्यार्थी राहून गुण शिका, आणि जेवढे उत्तम गुण तुमच्यात असतील तेवढे दुसऱ्याला शिकविण्यात आळस करु नका,
म्हणजे तुमच्यासहित तुमचे राष्ट्र उन्नत होईल.
(१९०) मी त्यालाच सुधारक म्हणेन, ज्याची वागणूक आणि विचार आपल्यासहित समाजाला सुसंस्कृतिशील बनवणारे आहेत.

सुविचार-स्मरणी
(७९) आत्म्याचे अमरत्व ओळखल्याची साक्ष मरणाच्या धडाडीतच पटत असते; सुखाच्या गादीतक्क्यावर नव्हे.
(८०) जिवंत माणसाने मरणाऱ्या तत्त्वाला समजणे हे जसे खरे जीवन देणारे तत्त्वज्ञान आहे, तसेच सगुण जगात निर्गुणत्वाची ओळख करुन घेणे, हे अत्यावश्यक व पूर्णत्व देणारे सत्य ज्ञान होय.
(८१) मनुष्याच्या बौद्धिक (बुद्धीच्या) विकासाला क्रमश: अनुभवाची जरुरी असते.
(८२) अल्पज्ञ माणसाला एकाएकी सर्वज्ञता सहन होत नसते.
(८३) मनुष्याचा पूर्ण विकास त्याच्या कार्यप्रणालीने होत जातो; आत्मानुसंधानानेच केवळ होऊ शकत नाही.
(८४) सर्व लोक माझे आहेत आणि मी त्यांचा आहे ही कळकळीची वृत्ती कार्यपद्धतीसह ज्यांना लाभते, त्यांना ब्रह्म सर्वत्र आहे असे म्हणण्याची आश्यकताच उरत नाही.
(८५) असलेल्या परिस्थितीपेक्षा व्याप जास्त न वाढवता, आहे त्यातच नेहमी आकुंचितपणे समाधान मानणाराची बुद्धी मानवतेला विकसित करणारी नसून अल्पसंतोषी असते आणि त्यांची सुखाची कल्पनाही संकुचित असते.
(८६) स्वराज्याची खरी कळकळ असणे-मोठ्यांनी गरीबांना मदत करणे हे त्यांना भूषणावह आहे असे कित्येक समजतात, पण त्याबरोबरच त्यात दोघांनाही तेवढाच फायदा असतो.
(८७) मुनष्य आपल्या दृढनिश्चयाने वृद्धापकाळातही गुणग्राही होऊन विद्या व कला संपादू शकतो.
(८८) भित्र्या धनवंतांच्या करांतील सुवर्णभूषणां पेक्षा ( कडी) परोपकाराकरिता हातात पडलेले लोखंडी जंजीर अधिक भूषणावह आहे.

सुविचार-स्मरणी-
(८९) ज्या कुळात काही पिढ्यांपासून तरी सत्य-नैतिकता-अर्थात सदाचाराने वागण्याची दीक्षा चालू असते व दुसऱ्यांच्या सुखदुःखात मदत करण्याकरिता आपल्याप्रमाणेच लक्ष दिले जाते, त्या घराण्यास कुलवंत म्हणतात.
(९०) आपल्या दुर्बळ स्वभावाचे कुणाच्याही धाडसी मनावर दडपण घालून आघात करु नका.
(९१) सिंहाच्या छाव्यात हत्तीवर छापा घालण्याची उपजतच बुद्धी होत असते, तसेच कुलवान लोकांना शत्रूशी (दुर्जनाशी) झुंड खेळण्याची बुद्धी अगदी स्वाभाविक असते.
(९२) भीतीने काळे तोंड घेऊन अंधारात लपून बसणारापेक्षा उजेडात लोकहिताकरिता मरणारा तरुणच खरा अमर होत नाही का ?
(९३) ज्याप्रमाणे तरुणावर त्याच्या मातापित्याची सत्ता असते त्याप्रमाणेच त्यापेक्षाही लाखोपटीने अधिक त्याच्या देशाची सत्ता त्याच्यावर असते.
(९४) देश हा नागरिकांच्या संख्येवर मोठा गणला जात नसून, त्यातील थोर व नीतिज्ञ लोकांवर मौल्यवान ठरला जात असतो.
(९५) जेथील धर्मज्ञ (धर्मगुरु) व सत्ताधीश लोक मार्ग सोडून वागतात. तेथील प्रजेच्या सर्वस्वाचा न्हास अगदी जवळ आलेला असतो.
(९६) अगोदर तर्काचे डोंगर उठवीत बसण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाचा विचार करुन पुढे चालणारे लोकच खंबीर असतात.
(९७) देशातील कृषीत धान्याची निपज अत्यंत कमी होणे हे त्यातील लोकांच्या आलस्यादि पापाचेच द्योतक होय, असे मला वाटते.

सुविचार-स्मरणी
(९८) लोकांचे काम न करता फुकट खाणाऱ्या इज्जतदार आयतोबापेक्षा मालकाचा दरवाजा ईमानदारीने राखणारा कुत्रा अधिक प्रिय वाटतो.
(९९) दहा कुपुत्र असण्यापेक्षा एकटाच सुपुत्र असलेला अधिक बरा.
(१००) नीच विचाराने जगण्यापेक्षा सुशीलतेने मरणेही अधिक मौल्यवान् असते.
(१०१) आपले अंत:करण सर्वाकरिताच मोकळे ठेवण्याइतका मोठेपणा फारच थोड्या लोकांत मिळत असतो.
(१०२) मित्रांनो ! श्रेष्ठ पुरुषांच्या आश्रयास राहून कितीही विद्वत्ता संपादन केली असली, तरी जो स्वत:च्या पायावर उभा राहू शकत नाही, त्याची ती विद्या कुचकामाचीच समजावी.
(१०३) स्वत:च्या पायावर उभा राहुन आपल्या बुद्धिशक्तीने समाजात पुढे पाऊल टाकणारा पुरुष विद्वत्तेच्या दृष्टिने कमी वाटत असला, तरी त्याचे ज्ञान अनुभविक असल्यामुळे थोर व बहुमोल आहे, असे मी समजतो.
(१०४) मिळालेल्या धनावर मनसोक्त चैन भोगून दुसऱ्यारकडे लक्षच न देण्याइतका नीचपणा पशुपक्षी व कीटकां (कोल्हे, कावळे, मुंग्या इ.) मध्येही नाही.
(१०५) धर्म हा धंदा म्हणून आचरण्याचा विषय नव्हे, तर तो व्यष्टिसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो; आणि म्हणूनच त्याची मूलतत्त्वे अबाधित असतात.
(१०६) आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासमोर समाजाचा नाश इच्छिणारे लोक लांडग्याइतकेच विद्वान (!) समजले पाहिजेत.

सुविचार-स्मरणी
(१०७) या जगातील प्रत्येक वस्तू कोणाच्या ना कोणाच्यातरी  उपकाराकरिताच आपले जीवन वाहणारी आहे. मनुष्य जर त्या सर्वात श्रेष्ठ आहे तर त्याने याचे महत्व समजून स्वतःही
दुसऱ्यावर उपकार करण्याची बुद्धी आपल्यात बाळगणे हेच त्यास भूषणावह आहे.
(१०८) सृष्टीतील प्रत्येक वस्तूत, प्रत्येक कणात, सतत कार्यप्रवृत्ती खेळत आहे. जो निष्क्रीय (कार्यहीन) होऊन फिरेल देवाचा आणि समाजाचा गुन्हेगार ठरला जाईल, असा सृष्टीचा कायदा आहे.
(१०९) अनुभवाच्या उच्च शिखरावर गेलेले पुरुष, जगालाच प्रभुचे रुपक-किंबहुना प्रत्यक्ष स्वरुप-समजून प्रत्येक जीवाशी समरस होऊन वागण्यात गर्क झालेले असतात.
(११०) मित्रांनो ! जगात असा कोण साधू आहे की जो आपले कर्तव्यसोडून देवाच्या मागे लागल्यानेच देवाला मिळाला आहे ?
कुणीही नाही, जे भक्त झाले, त्यांचे कार्य पाहूनच देव
त्यांच्याकडे धावून आला आहे. मग लोक आपले सत्य
कार्य करुनच भक्त का बनत नाहीत ?
(१११) आपली स्वसत्कर्तव्यरतता अंतर्बाह्य एकरुप दाखवणे, या भक्तिमार्गासमोर जगातील कोणत्याही सन्मानाची मजल पोचली नाही.
(११२) आपले स्वत:चे सदाचारयुक्त नियुक्त कार्य सोडून केवळ भक्तीच्या मागे लागणे म्हणजे नाव सोडून नदी आवरण्याचा प्रयत्न करणेच आहे.
(११३) अंगाने पोटाकरिता कष्ट करुन भक्ती करण्याऐवजी लोकांवर आपले ओझे घालून भारती करीत राहणे म्हणजे उपकाराऐवजी देवावर अपकारच करणे आहे असे मला वाटते.

सुविचार-स्मरणी
(११४) संसार ही परमार्थाची शाळा असून परमार्थ हा संसाराचा उद्दिष्ट हेतू आहे.
(११५) आपल्या पूजेकरिता मंदिराची आवश्यकता असताना एखाद्या कारागीरास (शिल्पकारास) विनंती करण्यापेक्षा आधी स्वतःच कारागीर होऊन दुसऱ्यास उपकार दृष्टीने मकान बांधून देण्यातच देवाची पूजा अधिक होत असते, असे मला वाटते.
(११६) कष्टाळूपणे मजूरी करुन जे पद सद् भक्तांनी प्राप्त करुन घेतले, ते लक्षावधी रुपये घरी असता दान करुनही कुणी मिळविले असे क्वचितच आढळेल.
(११७) मित्रांनो ! या जगात अत्यंत गरम किंवा कोमल वस्तू जर कोणती असेल तर ती सज्जनाचे अंत:करण ! तसेच अत्यंत कठीण-कशानेही न दुरभंगणारे-असे जर काही असेल तर तेही एक सज्जनांचे अंत:करणच !!
(११८) सज्जन दयेच्या दृष्टीने अत्यंत कोमल,  निश्चयासाठी कठोर असतात.
(११९) आपल्यासमोर स्पष्ट वाईट दिसणाऱ्या कार्यास अत्यंत उत्तम बनविण्याकरिता झटणे म्हणजे आपल्यापरीने राष्ट्रसेवा करणेच समजावे.
(१२०) आपल्या राष्ट्राचा स्तुत्य, न्याय्य व सक्रीय अभिमान असणे म्हणजे देवासमोर कर्तव्याने चमकणेच होय.
(१२१) जो दुसऱ्याची करुण हाक ऐकू शकतो त्यालाच ईश्वराचा आवाज ओळखता येतो.

सुविचार-समरणी:
(१२२) मित्रांनो ! ईश्वरभक्तांना मोक्ष जसा हातचा मळ वाटतो तसाच उद्योगशील पुरुषांना संसार हा केवळ चेंडू प्रमाणे  क्रीडासाधन वाटत असतो.
(१२३) जो पुरुष उद्योगाला केवळ आपल्या उदरभरणाचे स्वरुप देतो तो बंधनात पडतो आणि जो आपल्या उद्योगाला राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरुप देतो तो उद्योगानेही मोक्षगामी होत असतो.
(१२४) ज्याची प्रेम-मुद्रा आपत्तीने मलीन होत नाही. तोच पुरुष मरणालाही लाजवीत असतो.
(१२५) जगाच्या सुखासाठी कारागृहात अडकलेल्या
तुटक्या कैद्यासमोर लक्षावधी रुपये कमावणाऱ्या नोकरांचे तेज़ पडू शकत नाही.
(१२६) सत्याच्या बाणेदारपणाला भरजरी पोषाख आणि सोन्याची आभूषणेही दाबू शकत नाहीत.
(१२७) गुलाम होऊन सुवर्णाच्या रत्नजडित पिंजऱ्यात पडण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात स्वतंत्रतेच्या हिरव्या चिल्हाटीकर राघू अधिक आनंदात दिसत असतात.
(१२८) जी गुलामी पशू, पक्षी नि वृक्षही सहन करुन शकत नाहीत, ती मनुष्याने भिऊन स्वीकारावी; यापेक्षा अधिक पतन ते कोणते असते ?
(१२९) पक्ष्यांच्या पंखांच्या भरारीपेक्षा मनुष्याच्या मानसिक भरारीत अधिक सामर्थ्य असते पण तपहीन मनुष्याच्या काल्पनिकभरारी पक्ष्यापेक्षाही निपट्टर (हीन) असते.
(१३०) मित्रांनो ! हा सर्व संसार वीर्यवान लोकांचा दास आहे. जे लोक वीर्यहीन, हतबल असतील त्यांनां जगात  कोल्हा कुत्राही तान मारू देणार नाही.

सुविचार स्मरणी
(१३१) तुम्हाला जर या संसाररुपी बागेचा सुख-सुगंध हवा असेल तर शुद्ध ब्रहाचर्य पाळा नि धमकीने जगात मिरवा.
(१३२) या जगात प्रत्येक साधन केल्याने जे तेज मिळणार नाही वा सिद्धता प्राप्त होणार नाही, ती सर्व सिद्धी आपले ब्रह्मचर्य सांभाळल्याने घरी चालून येऊ शकेल,
(१३३) जगात चकाकणारा हिरा मनुष्याजवळ जर कोणता असेल तर ते वीर्यतेजच होय ! ज्याचेजवळ ओजासहित ही वीर्यशीलता नसेल त्याला भुवनाचे राज्य जरी दिले तरी त्याचे मुख सुतकीच दिसणार.
(१३४) नैतिकतेने एकपत्नीव्रत घेणारे आणि त्यातही संयमनियम सांभाळणारे गृहस्थाश्रमी पुरुषही ब्रह्मचाऱ्याप्रमाणेच अधिकार प्राप्त करुन घेऊ शकतात.
(१३५) आपल्या वृत्तीने पवित्र राहून आपल्या मतीशिवाय कोणाही परपुरुषांस आडव्या डोळ्याने-भोगदृष्टीने न पाहणारी सती
आपल्या पतीच्या सेवेत महान तपस्वी ऋषीचे सामर्थ्य
मिळवू शकते.
(१३६) त्यागी माणूस स्वप्नात देखील मोहक वस्तूला शिवणार नाही.
(१३७) माझा आग्रह, आहे की, कुणीही ब्रह्मचर्याचा आव आणून लग्नाशिवाय राहू नये. पण त्यातही नियमाने वागणे म्हणजे ब्रह्मचर्य पाळण्याचेच फळ घेण्यासारखे आहे.
(१३८) मन प्रवृत्तिशिवाय लग्न करणे म्हणजे संसाराचा तमाशा करणेच होय.

सुविचार-समरणी
(२५१) मित्रांनो ! मनुष्य आपल्या आवाक्याबाहेरच्या वैचित्र्यालाच आश्चर्याने चमत्कार मानतो व नम्र होतो. पण विचारीत नाही की हे काय व कसे असेल ?
(२५२) मित्रांनो ! मनुष्यास नेहमी खरे जीवन जगण्यास तीन बलांची जरुरी असते, पहिले आत्मबल, दुसरे बुद्धिबल व तिसरे शरीरबल, या तिन्ही बलांनी मनुष्य जगात अमरत्व प्राप्त करु शकतो.
(२५३) जसे दुसऱ्याचे असमाधान करुन जबरीने स्वतः करीता राजरोसही लुटलेले द्रव्य चोरीच ठरते त्याचप्रमाणेच अन्यायाने व अमानुषतेने कोणाही राष्ट्रावर आघात करुन, असंतोष निर्माण करुन संतसज्जनांच्या जीवनांचा नाश करुन जे द्रव्य
मिळविले जाते, तीही एक मोठी चोरीच असते. असल्या
तस्करवृत्तीने ऐश्वर्यवान झालेले धनिक व राजेही दुसऱ्याच्या हातून तसेच पिळले जात असतात. कारण ही मनुष्याच्या पूर्णत्वाची बुद्धीच नव्हे. 
(२५४) मनुष्याने आपल्या सहजस्थितीचे दिग्दर्शन करणे म्हणजे खरा मोठेपणा अंगी येण्यास वाट करुन देणेच होय. तो त्या अवस्थेत लाज आणि मोठेपणा ठेवीतच नसतो.
(२५५) दिवा ज्याप्रमाणे दुसऱ्याला स्वाभाविकपणेच प्रकाश देत राहतो, त्याप्रमाणेच सत्यमार्गनिच वागणारा मनुष्यही आपल्या वागणुकीचा प्रकाश सहजच जगावर टाकीत असतो.
(२५६) स्वतः प्रिय ( प्रेमरुप) झाला की, लोक त्याला
प्रियत्वानेच पहात असतात.

सुविचार-स्मरणी
(१३९) प्रिय मित्रांनो ! मनुष्याचा जन्म फक्त खेळ करून वेळ गमाविण्याकरिता नाही, तर त्यापेक्षा लाखोपट कामाकरिताच ईश्वराने मनुष्यजन्म दिला आहे.
(१४०) आपले विचार लपवून ठेवून काही दिवसांनी सांगने म्हणजे भिऊन  स्वार्थ साधण्यासारखेच अनेकदा ठरते.
(१४१) दुसऱ्याचे खोटे सहन करीत वर्चस्व लादून घेण्यापेक्षा अलग स्वतंत्रतेने उपवासीही राहून
सत्यतेने चमकणे काय वाईट ?
(१४२) मनुष्याने पहिली लक्ष्मी (स्त्री) असताना दुसरी करणे म्हणजे आपली इभ्रत आपल्या हाताने घटवण्यासारखेच आहे. कारण त्यात समानता सहसा रहात नसते.
(१४३) कोणत्याही अबलेजवळ एकांतात बसणे म्हणजे आपले हात भुताच्या स्वाधीन करण्यासारखेच आहे.
(१४४) स्त्री-सहवासापेक्षाही स्त्रैण लोकांची संगती अधिक विषय करणारी असते, असे भगवद्वचन आहे.
(१४५) मित्रांनो ! लग्नाचा अर्थ-मनमाने विषयोपभोग घेऊन आपली शिकार करुन देणे, हा नव्हे. आपल्या आदर्श जीवन परस्परांस मदत मिळावी आणि सद्गुणांचे बीज वाढते रहावे म्हणून पवित्र भावनेने संतान निर्माण करण्यापुरतेच विषयसेवन
करावे, एरव्ही दोघांनीही ब्रह्मचर्यव्रताने राहून आपले उचित आश्रमकार्य मिळून करावे, एवढाच त्याचा हेतू आहे.
(१४६) अतिविषयोपभोग घेणाऱ्या माणसापेक्षा पशू कितीतरी श्रेष्ठ म्हटले पाहिजेत की जे बीजारोपणाच्या वेळेशिवाय स्त्रीजातीकडे ढुंकूनही पहात नाहीत.

सुविचार-स्मरणी
(१४७) मनुष्याचा लौकिक सुंदरपणाने किवा वस्त्रलंकाराने वाढत नसतो, तर कर्तव्याच्या आणि उदारतेच्या जोरावरच वाढत असतो.
(৭४८) मित्रांनो ! आपल्या शत्रूचेही प्राणांतसंकट आपल्या तटस्य डोळयानी पाहू नका त्याला मदत करा न आपला मित्र करून घ्या.
(१४९) जे लोक अन्याय नसताही तुमच्यावर कुरघोडी करु इच्छित असतील, त्यांचे स्पष्ट शब्द शांततेने ऐका आणि ते आपली दुष्ट बुद्धी ज्या योगाने सोडतील अशा मानवी प्रयत्न करुन निर्वेर भावाने त्यांना आपलेसे करा तसे ते वळत नसतील तर चार समंजस माणसांच्या मदतीने त्यांवर परिणाम करा, एवढयानेही नच जुळल्यास सत्याचा आग्रह धरुन आपला
भार न्यायी लोकांवर सोपवा, म्हणजे क्रोधाने वा दुष्टतेने
बदला घेण्याचे कारणच उरणार नाही. भविष्यकाळ सर्व ठीक करील असे माझे मत आहे.
(१५०) "माझ्याविषयी दुर्बुद्धी ठेवूणाऱ्या लोकांना सदा सुखी ठेव आणि त्यांच्या कार्याचा परिणाम त्यांच्या पश्चातापात होऊ दे नि त्यांच्या बुद्धीस कल्याणमार्ग दाखव" ईश्वराजवळ मागत असावे.
(१५१) मनुष्याने आपल्या अधिकाराचा उचित फायदा लोकांना देणे म्हणजे आपली कीर्ती अमर करणेच असते.
(१५२) फळ मिळत नाही म्हणून आपले सत्कार्य सोडणे हे महान मूर्खत्व होय.
(१५३) श्रेष्ठ पुरुष आपल्या सरळपणाला व सज्जनतेला कधीही विसरत नसतो.

सुविचार-स्मरणी
(৭५४) दुसऱ्यावर उपकार करताना आपल्या सुखावर लाथ मारणारेच पुरुष सदैव यशस्वी आणि लोकपूज्य होत असतात.
(१५५) पूर्वजांच्या नावांवर आपला लौकिक वाढवून अभिमान करणे व्यर्थ असते. वास्तविक आपल्या कर्तव्याचाच अभिमान जगात टिकावू मान मिळवून देतो.
(१५६) उत्तम कार्याकरिता आपला केव्हाही नकार दर्शवू नये.  सत्कार्यास सदैव तत्पर असणे हेच भल्याचे लक्षण होय.
(१५७) प्रिय मित्रा ! जीवनाच्या गंभीर प्रवाहावर उन्नत विचार उत्कृष्ट कर्माचा उज्ज्वल दीप चमकत असता, त्याचा प्रकाश तारांगणात जसा चंद्र तद्वत् जनलोकांत आपला प्रभाव पाडणारा असतो.
(१५८) सत्कर्माशिवाय किंवा सतचिंतनाव्यतिरिक मन जेव्हा रिकामे असते तेव्हा त्यात विषयविकारादि भूतांचा नगां नाच सुरु होत असतो.
(१५९) आपल्या शरीराला, कुटुंबपरिवाराला आणि आपल्या देशाला हितकारी किंवा आवश्यक असणार्या सर्व नैतिक कर्माना मी सत्कर्मच समजतो, आणि जी अनावश्यक असलेली कामे किंवा व्यसने मनुष्याला लागलेली असतात किंवा जो अन्यायाने दुसऱ्यास दुखवून प्राप्त केलेल्या भोगसामुग्रीवर
मोठेपणाने जगण्याची खटपट चालू असते त्या सर्व कार्यास मी कुकर्मच समजतो.
(१६०) ज्याप्रमाणे वृक्षांना चिकटले असताना फुलाचे सौंदर्य शोभून (खुलून) दिसत असते, त्याप्रमाणेच आपल्या कर्तव्याला चिकटून रहाणाराच मनुष्य उत्तमप्रकारे चमकत असतो. एरव्ही
त्याला पडलेल्या फुलाची अवकळा येते.

सुविचार-स्मरणी
(१६१) मनुष्य निर्विषयवृत्तीचा मस्त असावा. कसल्याही आसक्तीचा नशीला (कैफ चढलेला) नसावा.
(१६२) मनाला सुंदर वाटेल अशा ठिकाणी रमू देण्यापेक्षा जे विचारांनी उत्तम ठरेल त्याचेच सौंदर्य मनाला पटवणे फार उत्तम असते.
(१६३) जे आवडेल ते खाण्यापेक्षा काय केल्याने शरीर व्यवस्थित राहील याचा विचार करुन खाणे फारच उत्तम असते.
(१६४) सार्वजनिक कार्यप्रसंगी नेहमी सर्वाच्या पुढे (आधी) सेवा करण्याची तयारी असली पाहिजे.
(१६५) स्वावलंबनाने मरण्यापेक्षा भीक मागून आपले अपमानित जीवन कंठीत रहाणे शतपटीने नादान आहे.
(१६६) मार खाऊनही आसक्ती न सोडणे हे मानवी पशूचे लक्षण समजावे.
(१६७) मित्रांनो !मनुष्य, देव आणि असुर हा भेदभाव फक्त गुणांच्या दैवी-आसुरी वगैरे प्रकारावरुन निर्माण झाला आहे. मनुष्य हा मध्यस्थित आहे. जे आसुरी कर्मानी राक्षस होतात, तेच लोक दैवी गुणांनी देव ठरतात नि सर्व लोकसमाजांत पूजिले जातात.
(१६८) सर्व भक्तिभावाच्या किंवा कर्मधर्माच्या मार्गानी जाणाराला अगोदर शुद्धाचरण आणि स्वावलंबन हा पहिला पाठ घेतलाच पाहिजे.
(१६९) मनुष्य बोलण्यात चांगला आहे. म्हणून वागणूक उत्तम असेलच, असे गृहित धरु नका.
(१७०) कांही गुण उत्तम आहेत म्हणून सर्वच अंग (स्वभाव) उत्तम असेल, असे समजू नका.

सुविचार-स्मरणी.
(१७१) आपल्याला आवडलेले गुण कोठूनही घेतल्याशिवाय राहु नका.
(१७२) पूर्ण तपासल्याशिवाय आपले अमूल्य जीवन कोणालाही वाहु नका.
(१७३) तिकडेच लक्ष द्या, जिकडे लक्ष दिल्याने तुमच्यातील दुबळे विचार नष्ट होऊन सत्कार्याकरिता उत्साह वाढेल.
(१७४) दुसऱ्याच्यासद्वर्तनाकडे पाहून तल्लीन होण्यापेक्षा आपले वर्तन जास्त उज्ज्वल करणे अधिक चांगले.
(१७५) मित्रांनो ! प्रत्येक माणूस आपल्यासमोर कोणता तरी आदर्श ठेवूनच पुढे पाऊल टाकीत असतो आणि त्याप्रमाणेच आपले मन रंगवीत असतो; व त्यातच आपले वैभवही मानीत असते.
(१७६) आपल्या आदर्शाचे यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय त्यात मन रममाण करणे हे कधी कधी धोका देण्यासच कारण होत असते.
(१७७) जसे मार्ग चोखाळून पाय टाकणे उत्तम तसेच ओळखून सहवास करणेच बरे !
(१७८) दुराचारी मित्र केल्यास काही न करताही परिणाम भोगपण्यास पात्र होणे भाग पडते.
(१७९) पुरुषाची निराशा किंवा उत्सुकता (उल्हासितपणा) जवळच्या लोकांवर परिणाम करणारी असते.
(१८०) साधूंच्या समागमाशिवाय तीर्थाला विशेष महत्व नाही.
(१८१) अश्रद्धावानास महातीर्थही पावन करु शकत नाही कारण मनुष्याची श्रद्धाच या सर्व गोष्टींची स्वामीनी आहे.
(१८२) अश्रद्धावान लोकांना संताला बोध किंवा त्यांच्या कल्पनाशक्तीच्या आवाक्याबाहेरचे दृश्य अथवा भयंकर चमत्कारीक अपघात हे श्रद्धावान बनवू शकतात. परंतु तर्कट लोकांना कुणीच श्रद्वावान बनवू शकत नाही.

सुविचार-स्मरणी
(१९१) ज्याच्या मनोधारणेत कार्य करण्याची शक्ती नसेल,असा तरुणही मला वृद्धाप्रमाणेच वाटतो, आणि ज्याच्या मनाचे उद्रेक सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतील, असा वृद्धही खरा तरुणच होय, असे मी समजतो.
(१९२) मनुष्याने सज्जनांच्या सहवासाकरिता देवदर्शनाच्या तळमळीपेक्षाही सुजनांचा सहवास अधिक व्याकुळ राहिले पाहिजे. कारण
सुजनांचा सहवास देवाचा प्रीतिबोध कार्यरुपाने अंगात भिनवित असतो.
(१९३) आपले कार्य सोडून उगीच देव देव करीत भटकू नका, तर कामातच इतके निमग्र रहा की, काम तोच असतो असे वृत्तीला वाटू द्या; म्हणजे त्याचे मिळणे (भगवत्प्रापी) अनुभवास आलेच असे निश्चित समजा.
(१९४) मित्रांनो ! आपल्याकरिताच आपण जिवंत रहाणे म्हणजे किड्यामाकोड्याप्रमाणे आपले मनुष्यत्व समजणे होय, आणि परोपकाराकरिता जगणे म्हणजेच खरे मानव्याकरिता जगणे होय.
(१९५) आपल्या सुखोपभोगाकरिता लोकांचे काम करणे सोडून.लोकांच्या सुखाकरिता आपले जीवन असा असे सक्रीय चिंतणेच ईश्वराचे खरे भजन करणे आहे.
(१९६) ईश्वरा ! मी बोलतो तेवढे तरी आचरण्याचे धाडस मला दे अशी भावना प्रकट व दृढ करणे, हे महामंत्र जपल्यासारखे आहे.
(१९७) मनुष्याची विचारसरणी त्याच्या ठरलेल्या स्वभावानुरोधानेच वहात असते. अधिक विचार वाढ़वणे त्याला दुसऱ्याच्याच्या सहवासावरच अवलंबून ठेवणे भाग पडते.

सुविचार-रमरणी
(१९८) पुष्कळदा मनुष्य समजण्याइतका पुढे चालू शकत नसला म्हणून त्याने आपली समज (जाणीव) आदर्शवत् ठेवूच नये, असे कोण म्हणेल !
(१९९) दुसऱ्याच्या सद्ग्रंथाइतका किंवा बोधाइतका आपला स्वभाव उत्कृष्ट झाल्याशिवाय आपण उन्नत होऊ शकत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आपल्यांपरीने आपण सत्यनिष्ठ तसेच उन्नत होणे होय.
(२००) कोणत्याही कार्याचे महत्त्व समजून घेण्याच्या आधीच त्यामध्ये उड़ी घेणे वेडगळपणाचे व धोक्याचे असते.
(२०१) ज्याप्रसंगी मनुष्याची विचारसरणी दोन चक्रांच्या मध्ये सापडते, अशा वेळी विचाराने कोणताही एक निश्चित निर्णय झाल्याशिवाय पाय पुढे घेऊ नये. त्याला वेळ लागला तरी चालेल.
(२०२) मित्रांनो ! कुणाचेही रडणे ऐकल्यावर त्याला समाधानाचा मार्ग कळकळीने सांगा, आणि कुणाच्याही हाकेत दुःख असेल तर त्याला हाक ऐकताच धावून जाऊन मदत करा.
(२०३) कधी समाज साहित्याने पुढे ढकलला जातो तर कधी त्याची वाढ कुंठित केली जाते, आणि बरेचदा साहित्य समाजाच्या प्रतिबिंबामागेच ओढले जात असते.
(२०४) ज्या वाङ्मयाचा संबंध आपल्या जीवनाशी व समाजाच्या उच्च धारणेशी नसून, केवळ मनोरंजनार्थ हसविण्या, रडविण्यात, विषयलोलुप शृंगार वाढविण्यात किंवा केवळ सृष्टिसौंदर्याचे कथानक घडविण्यातच ज्याची शक्ती खर्ची पडलेली असते, ते वाङ् मय वाचणे म्हणजे हल्लीच्या लागलेल्या समाजरोगाचा प्रकोप करून समाजास मृत्युमुखी पडलेला पाहणेच होय.

सुविचार-स्मरणी
(२०५) कवी हा प्रसंगाचे वर्णन करणारा असण्यापेक्षा आर्दशाची मशाल जगाला दाखवणाराच असावा लागतो. यातच श्रेष्ठत्व असते.
(२०६) सुखाने गादीवर पडून करुणरसात्मक गायन ऐकणे रसिकपणा नसून उपवासी असलेल्या गरीबांची करूण हाक ऐकून कळवळून धावून जाणे, हेच खरे रसिकतेने काव्य ऐकणे आहे.
(२०७) प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा परिणाम सहृयतेने किंवा दयाभावनेने अनुभवणेच त्या काव्यरसाचा आस्वाद किंवा आनंद होय.
(२०८) कथेने विरहाकुल किंवा भाववश झालेले लोक प्रत्यक्षपणे तशा परिस्थितीत कामी पडतीलच असा अनुभव बहुधा येत नाही.
(२०९) सेना सत्तेच्या पाठिंब्याशिवाय जय पावू शकत नाही.
(२१०) मित्रांनो ! प्रत्येक मुनष्य ज्या भावनेत रहातो आणि ज्या भावनेने लोकांशी संलग्न होतो, त्या भावनेतून जन्मलेली त्याची गद्य किंवा पद्यवाणीच (सहज भाषाच) कवित्व होय.
परंतु जे लोक साधारण लोकांना आपली वाचाशक्ती संगीतमय करुन विशिष्ट आदर्शात्मक भावनेत रंगवून दाखवितात, त्यांना लोकांत *कवी* म्हणविण्याची योग्यता येत असते
(२११) संतांची बोधवचने अनेकदा त्यांच्यासमोरील प्रसांगाला उद्देशूनही असू शकतात, म्हणूनच त्यांचा उपयोग करणारांनी नेहमीच्या काळात तसाच करू नये. जी वचने अभंगतत्वांना अनुसरुन असतात, तीच सर्वदा बोध करू शकतात. हे न जाणणारे कित्येक साप्रंदायीक लोक प्रसंगभेद न ओळखता केवळ शब्दास धरून कर्मठ बनतात आणि समाजालाही प्रगत होऊ देत नसतात.

सुविचार-स्मरणी
(२१२) ग्रंथांचे पारायण अर्थाकडे लक्ष न देता कितीही भराभर केले,तरी त्याचा परिणाम *तो वेळ उत्तम गेला* असे म्हणण्यापलिकडे आधिक होऊ शकत नाही; कारण उन्नतीचा संबंध अंत करणाच्या तीव्र भावनेशी व शब्दबोधाच्या लक्ष्यार्थाशीच असतो.
(२१३) सर्व लोक सर्वच जाणत नसतात. ज्यांना ईश्वरभक्ती किंवा ईश्वरी तत्त्व कळले त्यांना संसाराचे संपूर्ण ज्ञान असावयाला पाहिजे, असे नाही. कदाचित काही लोक तेही उत्तम प्रकारे जाणतील, तथापि आपण हट्ट करुन *सर्व कामे भक्तांनीच
सांगितली पाहिजे* असे मानू नये.
(२१४) पावित्र्य किंवा अश्लीलता आणि सौंदर्य किंवा बीभत्सता हे सर्व प्रकार नैसर्गिक वस्तूमध्ये स्वाभाविकपणे मूळचेच नसून हा वैचित्र्यभाव मनाच्या श्लीलअश्लीलतेवरच अवलंबून असतो. साधू तिला प्रकृती मानतो, विषयी पुरुष सौंदर्य समजतो आणि सभ्य पुरुषास तेच वस्तुचित्र बीभत्स दिसते.
परंतु वास्तविक तो एक स्वाभाविक निसर्गच खरा असतो.
(२१५) मंदिरासारख्या पूजा स्थानीही आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन म्हणून नग्न चित्रे काढून कलावंतांनी लोकांच्या डोळ्यांत धूळ झोकली आहे, आणि भक्तीच्या मार्गात बेमालूमपणे भोगविलास
रंगविला आहे, हे केवढे पतन आहे बरे !

सुविचार- स्मरणी.
(२१६) पवित्र स्थानात किंवा स्थानमहात्म्यात निराळेच शृगांरीक रुपक निर्माण करणे हे बाजारु प्रदर्शनच आहे व याचे कारण लोकाची भोगप्रवृत्तीच होय.
(२१७) काही कथा मनुष्याला रडविण्या किंवा हसविण्याकरिता लवकर प्रभावी ठरतात, याचे कारण त्यात तिन्ही काळाचे चित्र व फळ तो लगेच पाहू शकतो आणि तन्मय होतो. परंतु स्वत:चे जीवन पाहताना मनुष्याला सदैव वर्तमानच पहावे लागते, म्हणून त्याचे नवल त्याला आकलन करता येत नाही. पण त्याचे जीवनही एक उत्कृष्ट कथानकच आहे. जर तो तसे
रंगवील तर त्याचे जीवन भावी काळातील लोक कौतुकाने सांगतील नि त्याची गुणकथाच गातील.
(२१८) मित्रांनो ! सृष्टिसंग्रहातील प्रत्येक वस्तू साहित्यरूप किंवा काव्यमय आहे. परंतु अप्रसंगी किंवा अस्थानी सौंदर्यही बीभत्स दिसणे, हा या साहित्याचा स्वभावच आहे.
(२१९) जगातील सुंदर वस्तु दाखविणे याला आज किंमत नाही, तर वस्तूतील अगम्य सौंदर्य दाखविणे किंवा *अमक्या वस्तुंना मिळवून अमुकप्रकारे जुळविले असताही वस्तू तयार होते*, अशी संगती वैचित्र्यपूर्ण दृष्टीने दाखविणे याला जगात विशेष महत्त्व आहे.
(२२०) मित्रांनो ! आपले चरित्र प्रत्यक्ष वर्तमानकाळी आपण स्वत: लिहिण्याचा किंवा दुसऱ्याकडून लिहिले जाण्याचा प्रघात पूर्वी नसल्यामुळे थोरांच्या चरित्रांना व उपदेशांना मागाहून लिहिणाऱ्या लोकांनी व्यवस्थित कथास्वरुपात लिहिले असावे आणि ती लिहिण्याची पद्धती काल्पनिक कादंबरीप्रमाणे (तात्रिंक) असावी, असे मला काही ग्रथांच्या विशेष शृगांरपुर्ण किंवा अलंकारात्मक रचनेवरून वाटते.

सुविचार-स्मरणी
(२२१) लोकात प्रत्यक्ष भाषा बोलण्यात आणि बोलणे लिहिण्यात जो फरक नेहमी दिसन येतो, तसाच वागण्यात आणि वर्णन करण्यात काही अंशाने शृंगारामुळे (अलंकारिकतने) तरी फरक पडतोच.
(२२२) आमच्या लोकात काव्याची परंपरा ही मागील ऐकलेल्या (गतानुगतिक) शब्दांवरच चालत आलेली दिसत असल्यामुळे सर्वानीच त्याचा अनुभव घेतला असावा असे मला वाटत नाही.
(२२३) निवृत्तिमार्गाची धारणा बसविणाऱ्या संतांचीही कार्यप्रवृत्ती अधिक असल्यामुळे, निवृती म्हणजे कार्यविहीन होणे (कर्मत्याग करणे) असा त्याचा अर्थ होत नाही.
(२२४) मित्रांनों ! काव्याचा रसास्वाद आपल्या मनोधारणेवरही अवलंबून असतो. ज्यांना भावना नाही त्यांच्याकरिता काव्य जन्मालाच आले नाही.
(२२५) आपल्या सात्विक सौंदर्यपिपासू नेत्रास आल्हादकारक आणि भावना-शांतीस पोषक अशा आश्रयाकरिता अदृश्य असणाऱ्या परब्रह्माला कलेचे सुंदर रुप देऊन, त्यावर आपल्या मनोधारणेची बैठक बसविण्याच्या शुद्ध विचाराने ही मूर्ति-उपासनेची पद्धती संतमहंतानी सर्व लोकांत प्रचलित केलेली आहे.
(२२६) सार्वजनिक संस्कृतीच्या सुदृढतेकरिता आणि टिकाऊ सघंटनेकरिता काही कळकळीच्या थोर लोकांनी सामुदायिक उपासनेचे उत्सव रूढ केलेले दिसतात. परंतु त्यातही कथानके घुसवून आपापल्या जातीय आणि साप्रंदायीकतेच्या भिन्नत्वाने त्या मूळ उद्देशात फरक पडला आणि आज *सण **जयंती* पुण्यतीथी हा भोजनाचा उत्तम दिवस * एवढाच अर्थ शिल्लक राहीला आहे ही चूक आमची आहे.

सुविचार-स्मरणी.
(२२७) उपवासामुळे शरीरातील जीर्ण द्रव्यांचा नाश होऊन जठराग्नी पुन्हा प्रदीप्त होतो. त्यामुळे रक्ताचे ठिकाणी योग्य परिणाम होऊन नवचैतन्य खेळू लागते व विचारधारा आपल्या भावनाशक्तीला मदत करुन भक्ती करण्याकारिता उद्युक्त होते. त्याचबरोबरच अंत: करण उत्तम संस्कारी बनून रोग औषधाशिवाय नष्ट होतात आणि रक्त उत्पन्न करण्याची शक्ती
वाढून आयुष्य आल्हादपुक्त सुखाचे जाते. म्हणूनच संतांनी उपवासाचे महत्व गायिले आहे.
(२२८) तो देव होता असे म्हणतांना लोकांत जी भावना निर्माण होते, तो आदर्श पुरुष होता, म्हणून त्याला लोक देव मानीत होते असे म्हणताना का उत्पन्न होऊ नये ? तसे म्हणणे का रुजू नये.
(२२९) प्रसन्न मनाच्या ज्ञानसंपन्न कवीला आपल्या
मोडक्या झोपडीतही सौंदर्य व संतोष यांचे साम्राज्य दिसत असते.
(२३०) लोकांत सत्य बोलण्याची प्रवृत्ती वाढवणे म्हणजे हा मनुष्यलोक स्वर्गमय करणेच होय.
(२३१) आपली नित्यक्रमाची प्रार्थना स्थिर चित्ताने करणे हे उत्तम भोजनापेक्षा तुष्टी देणारे (तृप्तिदायक) असते.
(२३२) कोणतीही नशीली वस्तू (मादक पदार्थ ) खाऊन बुद्धीला गहाण ठेवून पापांचे भागीदार होऊ नका.

सुविचार-स्मरणी
(२३३) अचानक नावाजलेल्या पुरुषाचा फूर (स्फुरण किंवा कीर्तिरुपी पूर) फारच थोड्या दिवसांत ओसरत असतो.
(२३४) स्वार्थाच्या आशेवर मनुष्य धोक्यात येणे पुष्कळदा संभवनीय असते.
(२३५) लोभी मनुष्य गळ्याला तात लागल्याशिवाय हातातून किल्ली सोडीत नसतो, अर्थात मालकीचा त्याग करीत नसतो.
(२३६) प्रिय मित्रांनों ! आज तरी जग नाशवंत ही समाजात दृढमूल झालेली भावना काढून टाकून जग हे तुम्हाला सोडूच शकत नाही आणि तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला- हे शरीर टाकले तरी दुसऱ्या शरीरासमोर- निश्चयाने आणून देतेच असे ठासून सांगणारे पुरुषसिंह निर्माण होण्याची अत्यंत जरुरी आहे.
(२३७) खरे सौंदर्य वस्तूच्या मीलनापेक्षा वृत्तीच्या विरहातच असते.
(२३८) जाहीर साधू आपला मान सांभाळीत असतात. आणि खरे सज्जन गाजावाजा न करिता साधुत्व प्राप्त करीत असतात, असे माझ्या निदर्शनात आले आहे.
(२३९) सज्जन लोकांत जे साधुत्व मिळेल, ते साधू म्हणविणाऱ्या लोकांत मिळणे दुर्लभ आहे.
(२४०) कला व कौशल्याने रंगणे निराळे आणि साधुत्व प्राप्त करणे निराळे असते.
(२४१) आपल्या दृष्टीस कुणीही बिमार पडो, त्याला
आपल्यापरीने अवश्य मदत करा. तो त्याचा प्रारब्धभोग
समजून स्वस्थ बसु नका. ती सेवेची संधी ईश्वराने तुम्हास दिलेली आहे.

सुविचार-स्मरणी
(२४२) कोणाचेही स्वच्छ घर पाहणे असेल, तर त्याच्या देवपाटापेक्षा त्याचे शौचगृह व भोजनगृह स्वच्छ आहे की नाही है पहा.
(२४३) आपणास जीवनदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या वस्तुशिवाय शौक वाढवू नका; उगीच व्यसने लावू नका.
(२४४) मित्रांनो ! तुमच्या सर्व इस्टेटीवर त्यांची सदैव मालकी आहे की जे तुमच्यासहित सर्व गरीबांचे रक्षण करण्याची नि:स्वार्थ वृत्तीने अखंड कळकळ बाळगतात.
(२४५) मनुष्यजीवनाचा उद्देश सत्यसुख व स्वातंत्र्य हाच आहे आणि याकरिताच हजारो साधने करावी लागतात.
(२४६) मनुष्य आपल्या उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा स्वभावानेच जगात तसतसा अधिकार मिळवून त्या त्या स्थानी चढत असतो. मग द्वेष नि मत्सर कशाला ?
(२४७) ज्याची वागणूक जगात जेवढी उत्तम दर्जा मिळवील तेवढेच त्याचे ज्ञानबल आहे असे समजावे.
(२४८) जो पुरुष आपल्या मनसिक कल्पनांचा (विकारांचा) दास झाला तो कधीही उदार नि श्रेष्ठ होऊ शकत नाही.
(२४९) प्रिय मित्रांनो ! आपल्या असामान्य व अमर्यादित हृदयाला आकुंचित स्वरुप देऊन त्याला आपले घर एवढेच विश्व असा संस्कारात बद्ध करण्याएवढे पाप जगात काही दुसर आहे काय ?
(२५०) मित्रांनो ! आपत्तीचा प्रसंग येणार हे ऐकून जेवढे भय वाटते, तेवढे तो प्रसंग आला असता वाटत नाही. कारण मनुष्य त्यावेळी त्या प्रसंगातुन पार पडण्याच्या प्रयत्नात, पराक्रमात गढलेला असतो.

सुविचार-समरणी
(२५१) मित्रांनो ! मनुष्य आपल्या आवाक्याबाहेरच्या वैचित्र्यालाच आश्चर्याने चमत्कार मानतो व नम्र होतो. पण विचारीत नाही की हे काय व कसे असेल ?
(२५२) मित्रांनो ! मनुष्यास नेहमी खरे जीवन जगण्यास तीन बलांची जरुरी असते, पहिले आत्मबल, दुसरे बुद्धिबल व तिसरे शरीरबल, या तिन्ही बलांनी मनुष्य जगात अमरत्व प्राप्त करु शकतो.
(२५३) जसे दुसऱ्याचे असमाधान करुन जबरीने स्वतः करीता राजरोसही लुटलेले द्रव्य चोरीच ठरते त्याचप्रमाणेच अन्यायाने व अमानुषतेने कोणाही राष्ट्रावर आघात करुन, असंतोष निर्माण करुन संतसज्जनांच्या जीवनांचा नाश करुन जे द्रव्य
मिळविले जाते, तीही एक मोठी चोरीच असते. असल्या
तस्करवृत्तीने ऐश्वर्यवान झालेले धनिक व राजेही दुसऱ्याच्या हातून तसेच पिळले जात असतात. कारण ही मनुष्याच्या पूर्णत्वाची बुद्धीच नव्हे. 
(२५४) मनुष्याने आपल्या सहजस्थितीचे दिग्दर्शन करणे म्हणजे खरा मोठेपणा अंगी येण्यास वाट करुन देणेच होय. तो त्या अवस्थेत लाज आणि मोठेपणा ठेवीतच नसतो.
(२५५) दिवा ज्याप्रमाणे दुसऱ्याला स्वाभाविकपणेच प्रकाश देत राहतो, त्याप्रमाणेच सत्यमार्गनिच वागणारा मनुष्यही आपल्या वागणुकीचा प्रकाश सहजच जगावर टाकीत असतो.
(२५६) स्वतः प्रिय ( प्रेमरुप) झाला की, लोक त्याला
प्रियत्वानेच पहात असतात.

सुविचार-स्मरणी
(२५७) स्वार्थविवश माणसाच्या बोलण्यावर मुळीच विश्वास नका आणि विषयान्ध माणसाच्या प्रामाणिकतेवर केव्हाही घर सोपवून जाऊ नका.
(२५८) तरुण मुलांनी शृंगाररसाचे गाणे ऐकून कदापि वाईट चितुं नये. वाईट चिंतन म्हणजे आत्मघातच होय !
(२५९) मोठ्यांच्या वजनानेच चांगली आदत (सवय) लागून उत्तम गुण अंगी येत असतात.
(२६०) एकांत हा माणसाच्या विचाराला पुष्टी देणारा भावी परिस्थितीचे स्वप्न दाखविणारा असतो.
(२६१) लोकापवादांचे ओदझे सहन केल्याशिवाय कोणीही नवीन सुधारणा घडवून आणू शकत नाही.
(२६२) गावाची सुधारणा श्रीमंतीच्या बळावरच होत नसते त्याकरिता लोकप्रियताच असावी लागते.
(२६३) बंडखोरपणाने लोकांवर खरे वजन पडत नसते, तर त्याने उलट त्यांच्यात प्रतिकाराची शक्ती उत्पन्न होत असते.
(२६४) निव्यळ भाषणानेच टिकावू लोकमत केव्हाही मिळत नसते तर लोकांच्या कामी पडल्यानेच वास्तविक लोकप्रिय होता येते.
(२६५) पुराणादि ग्रंथाच्या किंवा संतांच्या भाषेत नेहमी दोन प्रकार असतात एक कल्पनाशृंगार आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्षानुभवाचे कथन अनुभवाचा बोध वृत्ती (बुद्धी) करीता असतो व त्यांची जाणीवही तिलाच होत असते आणि कल्पनाशृंगार हा कल्पनेचेच रंजन करणारा असतो.
(२६५) मनुष्याचा पूर्ण विकास त्याच्या कार्यप्रणालीने होत ज़ात असतो. केवळ आत्मनुसंधानानेच होणे शक्य  नाही.

सुविचार-स्मरणी
(२६७) मितरांनो । विषयवासना संपूर्ण जागृत झाल्यावर कोणीही पुरुष तिला रोखू शकत नाही कारण त्यावेळी विचार बुदीच नष्ट झालेली असते.
(२६८) ज्ञानसंपन्न साधकलोक मोहप्रसंगी लगेच विषयभावनेची प्रवृत्ती मोडून दुसरा प्रसंग विवेकाने निर्माण करितात.
(२६९) वाघ शिकारीच्या युक्तीने वाघ होत असतो तसाच साधू संयमाच्या अभ्यासानेच साधू होत असतो.
(२७०) गावातील कुतुहल मानणाऱ्या-कौतुक करणाऱ्या बहुसंख्य लोकांपेक्षा समजदार आणि लोकसंग्रही अशा एका माणसाचे शब्दसुद्धा बहुमोलाचे असतात.
(२७१) जसे शरीर बनण्याकरिता रोजचा नियमित व्यायाम कारणीभूत होतो. तद्वतच मानसिक शक्तीची उत्तम मूस बनण्याकरिता रोजची प्रार्थनाच महत्त्वाची ठरते.
(२७२) समाजातील एकाच व्यक्तीजवळ अत्यंत द्रव्य असणे, हे देवाचे देण नसून, समाजाच्या बौद्धिक दुर्बलतेचेच द्योतक होय, असे मला वाटते.
२७३) कोणत्याही विशिष्ट वृत्तींचा उदय सहवासाशिवाय होतच नसतो ज्याला ज्या मार्गाने जावेसे वाटेल, त्याच मार्गाच्या पुरुषाची संगती केली पाहिजे. हे म्हणणे फुकट आहे की,आम्ही आपणहूनच शहाणे होऊ.
(२७४) व्यवहारात इमानीपणा व करारीपणा असणे हेच लोकप्रिय होण्याचे खरे बीज आहे.
(२७५) स्वत:ला उपयुक्त व आवश्यक असणारी वस्तु दुसऱ्याच्या कामी लावणे, म्हणजेच त्याग करणे होय. निरूपयोगी, टाकाऊ वस्तु देणे म्हणजे दान करणे नव्हे. अधिक सामुग्री असुनही दुसऱ्यास जरुर ते साह्य न करणे, म्हणजे ते प्रत्यक्ष पापच सग्रंहून ठेवणेच होय.

सुविचार-स्मरणी
(२७६) संसारात जो आपल्या स्त्रीला लक्ष्मी म्हणून  लक्ष्मीसारखेच वागवतो आणि सलोख्याने मिळूनच स्वत: ही वागतो, तो लौकिक जगात जरी श्रीमंत दिसत नसला तरी तो असल्यापरीने राज ऐश्वर्यच भोगीत असतो. परंतु घरात विषमता  निर्माण झाली की दारिद्रय शिरलेच म्हणून समजा.
(२७७) साहसी मनुष्यच इच्छित वस्तूबर आपला ताबा करू शकतो.
(२७८) आपल्या सत्याच्या मार्गात मिळालेले चणेही  अमृतवत् असतात आणि पारतंत्रतेच्या मार्गातील पुरणपोळीही दु:खकारक असते.
(२७९) जगाला असत्य म्हणण्यापेक्षा जागतिक वस्तूंवर आसक्त होऊन फसणारे लोकच स्वतः असत्य आहेत, असे म्हणणे बरे.
(२८०) जग हे असत्याचे व सत्याचे ज्ञान देणारे उत्कृष्ट विद्यामंदिंर आहे, परंतु कोणते ज्ञान घ्यावयाचे हे मात्र घेणारावरच अवलंबून राहणार आहे.
(२८१) दुसऱ्याला मूर्ख व आपणास शहाणे समजणारे लोक शहाणे नसतात, तर दुसऱ्यातील मूर्खत्वाची वृत्ती घालवण्याची कोशीश करणारे व नम्रतेने वागणारेच शहाणे समजले जातता
(२८२)सामाजिक योग्यतेच्या दृष्टीने, मंत्र म्हणून देवता प्रसत्न करणाऱ्या इतकाच उत्तम जोडा शिवून लोकांची सेवा करणाराचाही अधिकार. परंतु त्याकडे धद्दांच्या दर्जाच्या भावनेने पाहिल्यामुळेच राष्ट्र भिकेला लागले आणि वर्णव्यवस्था बिघडून समाजमंदिर व धर्मध्वज ढासळुन पडला, असे मला वाटते.

सुविचार-स्मरणी
(२८३) मित्रांनो ! जो स्वावलंबनाने आपल्या पोटाची व्यवस्था लावू शकत नाही, तो मोक्षाची वाटही पाहू शकत नाही. मोक्षाच्या वाटेने जे पोट भरण्याची इच्छा करितात ते जगातून आणि देवद्वारातूनही हाकून दिले जातात.
(२८४) या जगात त्यांचा जन्म व्यर्थ आहे, जे लोक भितीला बळी पडून आपल्या कर्तव्यास मुकतात किंवा आसक्तीस वश होऊन मागे सरतात.
(२८५) ईश्वरावर भरवसा ठेवणारे लोक ईश्वरासारखेच उदार, न्यायप्रिय व कर्तबगार असतात. आळशी लोकांचा ईश्वर मात्र ईश्वर नसून तो एक रोगच असतो आणि ते त्याचे भक्त असतात.
(२८६) आजच्या काळात ग्रामोद्योगाला तेवढेच महत्व आहे, जेवढे सत्ययुगात यज्ञादिकाना होते. जे लोक यास महत्त्व देत नाहीत ते समाजाचे हितचिंतक, भाविक, ज्ञानी किंवा महात्मेही होऊ शकत नाहीत, असे मला वाटते.
(२८७) भिकाऱ्यांना द्रव्यदान करून नाव गाजविण्यापेक्षा त्यांना त्याच पैश्यांनी उद्योगास लावून अखंड नाव कमावलेले बरे !
(२८८) सर्व बलांची पूर्ण तयारी असूनही जर माणसात आत्मबल नसेल तर प्रसंगी सर्व कुचकामाचे ठरेल. आत्मबलामुळेच मनुष्याला सर्व बल मिळू शकते. आत्मविश्वासच सर्व बलांचा राजा होय.

सुविचार-स्मरणी
(२८९) मला तो साधु आवडतो, ज्याचा सदाचार व्यवहाराला सत्य, सुख व स्वातंत्र्य यांची जोड देऊन अध्यात्मावर आपली बैठक दृढ़ करितो नि शेवटी आत्म्यातच विलीन होतो अर्थात जो अनासक्तीने कर्मयोगी राहतो नि आपले स्वरुप ओळखून जगात वावरतो.
(२९०) मनुष्याची मनोचारणा नेहमी श्रेष्ठतम असल्याशिवाय
कोणत्याही प्रयत्नांनी श्रेष्ठ होत नाही. यासाठी आपले विचार सदैव आदर्शवत ठेवावेत. वाईट विचारांना सतत
फटकारल्याशिवाय सयंम साधत नाही आणि संयमाशिवाय माणूस माणूसही होत नाही, मग श्रेष्ठ कोठून होणार ?
(२९१) सज्जनांच्या सदुपदेशाचा जो उलट परिणाम करुन घेतो त्याची बुद्धी नाशाचीच मार्गप्रतिक्षा करीत आहे असे समजावे. म्हणूनच थोरांचे वचन नम्रपणे ऐकण्याची वृत्ती ठेवावी.
(२९२) हेकेखोरपणा विनाशकालीच उत्पन्न होत असतो. मग तो राजा असो वा नोकर असो, त्याची न्यायबुद्धी मेलेली असते.
(२९३) लोकांनी सत्कार्याकरिता दिलेल्या पैशांचा जो चांगला विनियोग करीत नाही, त्याचे पुढे येण्याचे पाऊल ढिले पडून खाण्याला मौताज होण्याचे दिवस आले आहेत असे समजावे.
(२९४) मनुष्याचे मानसिक विचार ज्या स्थानी अंतर्मुख होऊन रंगतात, ते स्थान देवालयासमानच होय. ज्या देवळात किवा क्षेत्रातसुद्धा मनुष्यास आपले उचित विचार प्रगट करता येत नाहीत (किंवा उच्च भावना निर्माण होत नाहीत) ते देऊळही पडित खंडाऱ्याप्रमाणेच मी समजतो.
(२९५) तोपर्यंत मनुष्याची सर्व कमाई धुळ (मातीसमान) आहे.
जोपर्यंत तो आपल्या मरणाला ताब्यात आणीत नाही.

सुविचार-स्मरणी
(२९६) या जगात (कीर्तिरुपाने) जगण्याकरिताच जो मरतो तो अमर होत असतो आणि (केवळ) करण्याकरिताच जो जगतो तो फजीत होत असतो.
(२९७) शूरांच्यावरील आपत्ती त्यांच्या उज्वलतेलाच कारणीभूत होत असतात म्हणून वीरलोक आपल्या मार्गातील आपत्तीची पर्वा न करता सिंहासारखे पुढेच सरकत असतात.
(२९८) साधुत्वाचा बाणा कष्टांच्या कळसावर मिळत असतो, लौकिकात नव्हे ! लौकिकात मिळणारा साधुपणा साधुत्वाला बाध आणणारा राक्षस होय.
(२९९) जगात मनाला स्वच्छ धुवून काढणारी साबण जर कोणती असेल तर पश्चात्तापाने ईश्वराची भक्ती करीत असता जे करुणेचे अश्रू डोळ्यांतून पडतात तीच ! मनाच्या गलिच्छपणाला लौकर धुऊन साफ करण्याचे तेवढे शोधन सामर्थ्य योगातही नाही व म्हणूनच संतलोक प्रेमभक्तीच अधिक श्रेष्ठ समजत असतात.
(३००) संसारात श्रेष्ठ, माननीय कोण ? असे मला विचाराल तर मी सांगेन-जो जगाला आणि देवाला सारखाच प्रिय आहे तोच खरा माननीय ! कारण, देवाला प्रिय निष्कामतेशिवाय होत नाही आणि जगाला प्रिय नि:स्वार्थतेशिवाय होत नाही, असे मला वाटते.
(३०१) सर्व संसारात उत्तम खेळाडू जर कोणी असतील तर तेच होत की जे संसाराला खिलोण्या (खेळणी) प्रमाणे समजून, येणाऱ्या सुखदुःखाला न जुमानता निर्भय वृत्तीने सर्व सहन करुन आपले परमध्येय जे ब्रह्माधिष्ठान ते सोडीत नाहीत तसेच निर्भयतेने व आत्मौपम्यदृष्टीने जगात राहतात.

सुविधार स्मरणी
(३०२) ज्यांना लोकांतात एकांत साधता येत नाही त्यांना एकांतातही लोकांतच प्राप्त होत असतो.
अशा वेळी मोठ्या प्रयासाने ती गोष्ट करावी लागते कारण मनाच्या वृत्ती उदासीन झाल्याशिवाय कोठेही एकांत प्राप्त होत नसतो. हे जाणुन भक्तांनी संसारातच एकात साधावा.
(३०३) मित्रानो ! ज्याच्यात करण्याची धमक नाही त्याच्या बोलण्यात तरी काय अर्थ आहे ? करकरणारे यंत्र बेकाम होऊ लागले असेच शहाणे समजत असतात.
(३०८) सदाचरणाच्या वागणुकीने वाणीमध्ये अद्भुत शक्ती प्रकट होते आणि शद्ध अत्यंत तेजस्वी, परिणामकारक व आकर्षक करुन घेणारे होत असतात.
(३०५) स्वार्थी प्रेमियाच्या घरची पुरणपोळीही मला बरी वाटत नाही पण उलट निष्कामप्रेमी पुरुष भाकरीचे वाळले तुकडे तरीही ते अमृतासारखे रुचकर वाटतात.
(३०६) जग खोटे समजणारे लोक स्वतःच गेले की त्यांनी जगाचा नाश केला ? वास्तविक पाहता जगाचा नाश तर त्यांनी केलाच नाही, पण उलट आपले सारे चरित्र जगात ठेवून ते गेले.
(३०७) मित्रांनो ! परमेश्वर सर्वांना एकेकदा ज्याच्या त्याच्या अधिकारानुरुप वैभव देतो. पण त्याचा उपयोग जर त्याने समाजाकरिता केला नाही तर त्याची हीन वृत्ती पाहून त्यास लाजवतो आणि पुन्हा त्याची दारिद्रयावस्था त्यास परत देतो. मग मात्र तो भोग लवकर चुकत नसतो, ही गोष्ट सुखी लोकांनी पूर्ण ध्यानात ठेवावी.

सुविचार-स्मरणी
(३०८) संसारास तुच्छ ठरवून व माणसांना उदास बनवून भिकेस लावण्याचा जो उपदेशकाचा मार्ग आहे तो अत्यंत चुकीचा आहे असे मी समजतो. जर त्यांना योग्य ज्ञान देणे असेल तर व्यवहारात निष्णात करुन त्यातच उदासीन वृत्तीने प्रभुभजन करण्यास सांगावे, असे मला वाटते.
(३०९) आमच्या समाजातून उपदेश घेतलेले कितीतरी लोक कर्तव्यशून्य होऊन *पोट यथोचित भरणे हाच आमचा भक्तिमार्ग आहे* असे समजत आहेत आणि त्या ध्येयापुढे नाना तीर्थातही त्यांना दुसरे काहीच उरलेले दिसत नाही. हा दोष कुणाचा ? बुवांचाच, असे मी निश्चयाने म्हणतो.
(३१०) सत्य आणि पावित्र्य यांच्या संवर्धनाने ज्ञान मिळत असते.
आणि हे तिन्ही मिळाल्याशिवाय जगदीशाचे दर्शन कुणालाही होऊ शकत नाही. जगातील प्रत्येक जीवाकडे निष्काम भावनेने पाहणे (किंवा ओळखणे) म्हणजे परमेश्वर दर्शनाला पात्र होणेच होय.
(३११) ब्रह्मचर्याचे बळ जो यथासांग आचाराने संपादन करितो त्याला पर्वत कोसळून पडत असला तरी भय वाटत नाही. मग तो जगातील चोर, डाकू नि गुंडांना तर भिऊच शकणार नाही हे उघडच आहे. पण ते नियम नित्य प्रयत्नशील व विचारमय अशा जीवनाशी आणि ईश्वरोपासनेशी संमिलित झालेले असावे लागतात, हे विसरु नये.
(३१२) पवित्रतेचा पुढारी तोच की, ज्याला आपल्या गावातही घाण साचलेली बरी वाटत नाही आणि त्याकरिता जो हस्ते-परहस्ते खटपट करुन व स्वतःही लाज न ठेवता गाव स्वच्छ करितो नि सर्वांना पवित्रतेचा-स्वच्छतेचा धडा (पाठ) देतो.

सुविचार-स्मरणी
(३१३) स्वत चे कपड़े स्वच्छ असले म्हणजे झाले,
असे दंभाभिमान्याला वाटत असते. असले संकुचित विचार म्हणजे मानसिक मलीनताच होय.
(३१४) प्रत्येक मनुष्य जन्मत: च परिपूर्ण होऊन येत नसतो तसे जर असते तर जन्मच घेणे असंभवनीय झाले असते वास्तविक पूर्वीचे थोडेबहुत संस्कार असतात नि त्या आधारावर तो आपल्या प्रयत्नाने पूर्ण विकास पावून अनुभवाला प्राप्त होतो नि मग मुक्त होत असतो. मग तो संत असो, अवतार असो वा चोर असो.
(३१५) मित्रांनो ! आपले नित्यक्रमाचे उठणे, जेवणे, झोपणे, काम करणे, वाचणे, उपासना करणे, लोकहिताकरिता झटणे इत्यादि जे नियम आहेत त्यांत अंतर पड़ देऊ नका. शस्त्र हे नेहमी घासल्यानेच स्वच्छ नि धारदार रहात असते. तसाच मनुष्यही नेहमीच्या (उत्तम व संयत) दिनचर्यनेच पवित्र आणि सावधान राहतो.
(३१६) मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी त्याचे वर्तन वा त्याची दिनचर्या समाजाला पोषक अशाच नियमांनी युक्त असावयाला पाहिजे आणि ज्ञानी पुरुष तशी ठेवतोच. पण फुकट बोलणारे लोक हे न जाणून आळसाने ग्रासलेले असतात आणि ते सर्व लपवण्याकरिताच ते वेदांताची बतावणी करीत असतात, हे मला आवडत नाही.
(३१७) मित्रांनो ! माझ्या हातूनही असा व्यसनाचा अन्याय घडलेला आहे पण प्रभूने मला जागे केले नि मी त्यापासून सावध झालो. माझी चूक मी कबूल करीत आहे की, मी काही काळ व्यसने माझे काय करू शकतात?  असे म्हणत होतो पण ते सर्व चुकीचे आहे.

सुविचार- स्मरणी
(३१८) मनुष्याने कोणत्याही संप्रदायात किंवा कोणत्याही धर्मातील गोष्टींचे निरीक्षण करुन गुणग्राही झाले पाहिजे. त्याकरिता आपल्या संप्रदायातील लोक नाराज झालेले पत्करले पण उत्तम तत्त्व कोठूनही अवश्य घ्यावे. परमेश्वरावर विश्वास दाखवूनही चोरुन पापे करणारापेक्षा नास्तिक असून नीतीने
वागणारा काय वाईट ?
(३१९) आपल्या मातृभाषेत तरी मनुष्याला आपले भाव प्रगट करीता आले पाहिजेत, तरच तो मनुष्यत्वाच्या मार्गाला लागू शकतो.
(३२०) अखिल जगातील तत्ववेत्यांचे मत शोधून पाहिल्यास हेच दिसून येते की, सुखाचा शोध जर कोठे लागला असेल तर तो प्रत्येकाच्या आत्म्यातच ! असाच संतमहंतांचा अनुभव आहे नि मलाही तसेच वाटत आहे.
(३२१) जसा नावेवरुन पार जाणारा माणूस नाव फोडून टाकीत नाही, तसाच या जगापासून सर्व ज्ञान संपादून पुढे चालणारा ज्ञानी जगाला तुच्छ लेखू शकत नाही, तर ते *परिवर्तनशील आहे एवढेच म्हणू शकतो. *जग हे तुच्छ आहे* असे समजणारा माणूस व्यक्तिभावानेच तसे समजत आहे किंवा बोललेला आहे, असे मला वाटते.
(३२२) *संसार असत्य आहे* असे समजावून दुसऱ्याचे धन आपण गोळा करण्यापेक्षा स्पष्ट चोरी करुन घर भरलेले काय वाईट? कारण त्या योगाने शास्त्रांची उगीच फरजीती न होता हा स्वतः अन्यायी ठरू शकेल, हे बरे.

सुविचार-स्मरणी
(३२३) मित्रांनो ! सुखाच्या पायऱ्यांची परंपरा आपल्या
आत्मस्थानापर्यंत पोहोचली आहे; आणि *आत्म-प्राप्ती
शिवाय सुख कोठेही नाही* हाच अनुभव सर्व ऋ्रषिमुनींनी कथन केला आहे.
(३२४) फक्त मूर्तिपूजा करणे आणि तिलाच सर्वस्व समजणे किंवा अंतिम मानणे हे मला आवडत नाही.
(३२५) आपल्या ध्येयवस्तूच्या प्राप्तीकरिता साधनस्वरुप मूर्ती समोर ठेवून तिच्या मुख्य वर्तनाचे (आदर्श चरित्राचे) चितंन करून तसेच गुण अंगी बाणवणे ही मूर्तिपूजा मला अत्यंत आवडते. 
या योगाने मनाचा संकल्प दृढ होऊन वृत्ती ध्येयस्वरंगी
तदाकार होते.
(३२६) प्राप्त वस्तूची प्राप्ती करुन घेण्याचे महत्त्व मानण्यापेक्षा प्राप्त करण्यास अयोग्य अशी वस्तू प्राप्त करुन घेण्याची वृत्ती  आवरावी लागते. म्हणजे सत्य हे मुळातच मिळते.
(३२७) जसे अलंकारांत भिन्नत्व भासत असले तरी मूळ धातु एकच असते त्याप्रमाणेच नामरुपात भिन्नता भासत असली तरी मुळ तत्त्व जो ईश्वर तो सर्वात एकच असून त्याला समजणेच (जाणणेच) धर्म होय.
(३२८) जो पुरुष आपले तर्कज्ञान स्वाभाविक अनुभवानेच वाढवतो त्याला शास्त्रांची जरुरीच पडते असे नाही, तरीपण आपल्या वृत्तीला शास्त्रप्रमाण (किंवा शास्त्राची कसोटी) लावणे ही ऋषींची सामाजिक धारणा आहे.
(३२९) मनुष्य ईश्वराजवळ फक्त भजनभावानेच जाऊ शकत नही, तर तो कर्तव्यतत्परतेने आणि आत्मतयारीनेच जाऊ शकतो.

सुविचार-स्मरणी
(३३८) दुसऱ्याची फजीती करताना आपल्या अंगातील दुर्गुणांचा अवश्य विचार करावा.
(३३९) आपणास निर्माण करणारा बाप तोच खरा बाप, असे नसून ज्याने आपल्यात मनुष्यपण आणून दिले तोच श्रेष्ठ बाप होय, असे समजावे.
(३४०) गर्भावस्थेत आपले रक्षण करणारी जन्मदात्री ही माता खरी, पण जिने पालनपोषण करुन आपल्याला सावधानीने सन्मार्गाला लावले तीच माता श्रेष्ठ आहे.
(३४१) आपले कान फुंकणारे गुरु हे गुरु खरे, पण ज्याच्या ज्ञानाने मनुष्य देवपणाला प्राप्त होईल तोच गुरु
श्रेष्ठ समजावा.
(३४२) कार्याच्या संघर्षणानेच मनुष्याचे स्वभाव आणि त्याचा अधिकार प्रगट होत असतो.
(३४३) कोणाशीही बोलण्याच्या अगोदर त्याचा (भावी) परिणाम जाणून नंतर बोलणेच बरे असते.
(३४४) बोलण्यात कोमलपणा असणे ही एक जादू आहे.
(३४५) मनुष्याने आपली आदत तशीच ठेवावी की, कोणाच्याही समोर गेले असता (ज्यायोगे) लाज वाटणार नाही.
(३४६) ज्याच्या मनात मोठेपणा असतो तोच मोठा होतो.
(३४७) प्रतिज्ञा तेवढीच करावी की जी पूर्ण केल्याशिवाय राहवणार नाही. (भावनेच्या भरात वाहून जाण्यात अर्थ नाही.)
(३४८) प्रिय मित्रांनो ! आपण विद्याभ्यास करुन विद्वान व्हा. विद्वत्ता राज्यापेक्षाही श्रेष्ठत्तर असते. कारण, राजा हा आपल्या देशात श्रेष्ठ मानला जातो पण विद्वान सर्व देशात पूज्य मानला जात असतो आणि विद्वत्तेने राज्यसुद्धा प्राप्त करता येते.

सुविचार-स्मरणी
(३४९) संघटित रानकुत्रेही जर व्याघ्राला फाडून खाऊ शकतात तर संघटित माणसांचा जमाव काय करु शकणार नाही ? जे इच्छिल ते करील ?
(३५०) जी संस्था लोकांच्या उपकारांकरिताच सत्याने आणि नीतीने वागते तिचा नाश राजाही करु शकत नाही.
(३५१) प्रेमसूत्राचा संबंध जेवळ्या लौकर तुटतो तेवढ्या लौकर जुळू शकत नाही, शिवाय गाठ ही राहतेच.
(३५२) नाल्याचा पूर जितक्या लौकर चढतो तितक्याच वेगाने उतरतो. तसाच चंचल वृत्तीचा माणूसही तेवढ्याच त्वरेने वाढतो आणि पडतोही !
(३५३) समुद्र जसा आपला समतोलपणा केव्हाही सोडीत नाही. तसाच थोर पुरुषही आपला सम-स्वभाव कधीही बिघडू देत नाही. कार्यकारणपरत्वे दोन्हीही उल्हासात येतात पण फिरुन पहाल तर सारखेच !
(३५४) खतावरच जसे वृक्षाचे जीवन (वाढ किंवा शक्ती) अवलंबून असते तसेच विद्याभ्यास आणि सहवासावरच मुलांचे जीवन अवलंबित असते.
(३५५) वीर पुरुष आपल्या कीर्तीचा ध्वज मरणाच्या मैदानात उभा असलेला पहात असतो.
(३५६) भक्त देवाची सहानुभूती (कृपा) आपल्या प्राणोत्क्रमणात(देखील) पहात असतो.
(३५७) मित्रांनो ! प्रथन बलवान आणि श्रद्धावान बना व नंतर आपल्या विवेकबुद्धीने कोणत्याही मार्गाने चालू लागा; तुम्हाला यश मिळेल.

सुविचार-स्मरणी
(३६४) कुणाशी बोलताना उच्छेदक शब्दांनी बोलणे म्हणजे आपली किंमत करवून घेणेच होय.
(३६५) कोणत्याही भाषेची, वस्तूची वा मनुष्याची तंतोतत माहिती सांगणे यालाही शील व धोरण अवश्य लागत असते. अवास्तव बोलून आपला शहाणपणा दाखविणारे लोक शहाणे नसतात. बोलताना आपल्या विकृत किंवा दूषित कल्पनांची छाया त्यावर पडण्याचा फार संभव असतो यासाठी फार जपले पाहिजे.
(३६६) आपली पंचज्ञानेंद्रिये व त्यांच्या पंचविषयांची आसक्ती ताब्यात ठेवण्याएवढा श्रेष्ठ शूरपणा जगात कोणताही नाही.
(३६७) जगात आपले प्रेमी सर्वच असतील, पण खरे प्रेमी तेच की जे आपली वाईट वाट सोडून आपणास सरळ चालविण्याचा प्रयत्न करीत राहतात.
(३६८) मनुष्याने रात्री दहा वाजता झोपून नेहमी चार वाजता उठलेच पाहिजे आणि झोपताना व उठताना आपल्या उद्दिष्ट तत्त्वाचे किंवा मूर्तीचे चिंतन करुनच कार्याला लागले पाहिजे.
(३६९) जो मनुष्य सूर्योदयापूर्वी उठून आपले प्रातर्विधी आणि व्यायाम आटोपून बाहेरची स्वच्छ व मोकळी हवा घेत नाही त्याचे अंग रोगग्रस्त होऊन बुद्धीही मलीन होईल, हे निश्चित आहे.
(३७०) मित्रांनो ! तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे वा धर्माचे असा पण दुसऱ्याशी वागताना तुम्हाला सत्यतेने आणि मोकळ्या मनानेच वागले व बोलले पाहिजे. जसा बापाचा बंधु माननीयच असतो तसेच परमार्थाच्या बाबतीत प्रभूकरिता निर्माण झालेले सर्वाचे सप्रंदाय माननीयच समजले पाहीजेत..

सुविचार-स्मरणी
(३७१) साधू कोणत्याही धर्माचा वा संप्रदायाचा असो, त्याला प्रत्येक प्रेमी माणासाने मान दिलाच पाहिजे. पण तो साधूच असावा. एवढे मात्र खरे !
(३७२) आपल्याशी द्रोहबुद्धीने वागणाऱ्या शत्रूचेही सद्गुण आपण गौरविले पाहिजेत. कारण, द्रोह हा अवगुणांचा असतो, सद्गुणांचा नव्हे !
(३७३) अन्यायाने कुरघोडी करु पाहणाऱ्याकरिता आपण नेहमी सज्ज असावयाला पाहिजे आणि ज्या मागनि तो सरळ होईल तसा प्रयत्न करुन त्याला आपलासा केला पाहिजे.
(३७४) सत्य वागणाऱ्याला परमेश्वर मार्ग दाखवीत असतो, त्याला पुस्तके किंवा थोरांचा उपदेश ऐकण्याची आवश्यकताच आहे, असे मला वाटत नाही. जिथे त्याचे नडेल तिथे त्याची श्रद्धाच गुरुरुपाने मार्ग दाखवील !
(३७५) लज्जेचे बुजगावणे समोर ठेवून सत्याने वागणे होत नाही. एक लाज व दुसरा अभिमान यांचा शत्रुच सत्य होय. जे थोर होतात ते यांना अगोदर हाकून देत असतात.
(३७६) जो आपल्या कामाची हयगय करीत असून दुसऱ्याचे काम करीन अशी हमी देतो, तो धोका देणारा आहे, असे मला वाटते.
(३७७) जो स्वतः स्वच्छ नाही त्याचे घर स्वच्छ राहूच शकत नाही व त्याची ती अस्वच्छता मनावरही परिणाम केल्याशिवाय राहणार नाही.
(३७८) अगोदर घरात उजेड करावा आणि नंतर देवळात दिवा लावावा, आधी भक्ताचे स्नान नंतर देवाचे!

सुविचार-स्मरणी
(३७९) बुद्धिमान लोकानी उद्योगाला हात लावला नाही तर मजूर हे गबाळे होऊन पतन पावतील आणि कला कौशल्याचा नाश होईल.
(३८०) उदार लोक जसे धनाने तसेच प्रणानेही उदार असतात.  त्यांच्यापुढे मरणे वा गरीब होणे (त्यांचे बुजगावणे) टिकू शकत नाही.
(३८१) जो व्यवहारी पुरुष मिळकतीपेक्षा कधीही खर्च वाढवीत नाही, तो केव्हाही संसारात आपत्तीने तंग होत नाही.
(३८२) जो पुरुष भाग्यावरच भरवसा ठेवून निकष्टी राहतो, त्याचे भाग्य कधीही उदयास येत नसते.
(३८३) ज्याला सद्गुणांची खाण पाहिजे असेल त्याने आपले दुर्गुण अगोदर टाकावेत, म्हणजे झाले.
(३८४) जो सल्लागार आपत्तीच्या प्रसंगी धावून येत नाही त्याची सल्ला कोत्या मनाचीच असते आणि मित्रही होऊ शकत नाही.
(३८५) लोकसंग्रह करुन सर्वांना एकाच मार्गावर आणणे ही एक कलाच आहे.*लोकांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावे,* असे जर वाटत असेल तर स्वत कष्टून लोकांत ती धारणा निर्माण करावी लागेल. ती धारणा धोरणानेच जुळत असते.
निव्वळ कष्टांनी नव्हे.
(३८६) सुशील माणसाचे चिन्ह त्याच्या पाच पावलांवरुनही ओळखायला येत असते.
(३८७) चंचल माणसाची ओळख त्याचे डोळेही करुन देऊ शकतात. पण हे ओळख करणारावरच अवलंबून आहे.

सुविचार-स्मरणी
(३८८) सर्वांना साधूची ओळख करुन घेणे कठीण असते पण ती सहवासाने सहज होते.
(३८९) सुंदर फुले जशी माळेत ओवता-ओवताही कोमेजून जातात तसेच कोमल वृत्तीचे तरुणही कसोटीच्या मार्गात पाय मागे ओढीत असतात. ते कार्याच्या यश साधनाला
पुरत नसून मध्येच गळून पडत असतात. परंतु त्यातूनही छानणारे फुलारी शिवाजी प्रमाणेच असावे लागतात.
(३९०) ज़र तुम्हाला सर्वाशी प्रसन्नतेने वागणे असेल तर  तुम्हांला त्यांचे स्वभाव आणि त्यांचि रुचि ओळखण्याची कलाच आपलीशी केली पाहिजे; आणि त्यातून जर त्यांना बोध करावयाचा असेल तर कोमल आणि नम्र वाणीनेच करावा लागेल, हे विसरु नका.
(३९१) दुर्बलाच्या पात्रावर हात मारणे म्हणजे बलवानाकडून सर्वस्व गमाविणेच आहे. हे कधीही विसरु नये.
(३९२) सज्जनाच्या मनालाही कोणी दुखविणे ईश्वराला खपत नसते आणि त्याचे प्रत्यंतर निसर्गत: च अनुभवास येते.
(३९३) पूजनीय लोकांची पूजा फुले वाहुन होत नाही तर सन्मानाने *या* म्हटल्यानेच ती होत असते; पण आपली नम्रता सरळ मात्र पाहिजे.
(३९४) स्वार्थाकरिता थोरांना मान देणे म्हणजे त्यांच्या
अंगात काट्यांचे सुंदर वस्त्र चढविणेच होय, तसेच साधूच्या इच्छेविरुद्ध त्यांना जबरीने काही देणे म्हणजे त्याचे पाय संसारात ओढण्यासारखेच आहे.

सुविचार - स्मरणी
(३९५) मनुष्याने नेहमी खुशमस्करेपणा किंवा विनोदवर्तन ठेवणे योग्य नसते. त्याने मनुष्य आपला मान हलका करुन घेतो व लोक महत्त्वाची गोष्टही मस्करीच समजत असतात. मस्करी योग्य प्रसंगीच शोभा देत असते.
(३९६) सुंदर बोलण्याची ढब येणे-उत्तम बोलण्याने लोकांना वश करता येणे ही एक कला आहे. ही कला जो मनुष्य संपादन करीत नाही तो धनिक आणि बलवान असला तरी समाजाकरिता निकामी आहे; कारण, तो आपले भाव समाजापुढे उत्तम तऱ्हेने मांडू शकत नाही. उत्कृष्ट बोलता येणे हे मनुष्याचे भूषण आहे.
(३९७) हजारो लोकांत मनस्वी व्याख्यान ठोकण्यापेक्षा कष्टाने पाच मुले चांगली करुन सोडणे अधिक महत्त्वाचे आहे. .
(३९८) समाजावर ताबा फक्त बोलण्याइतकाच करता येतो पण जवळच्या मुलांवर मनुष्य वागण्यापूरताही ताबा करु शकतो व त्यामुळेच भरीव कार्य करता येते.
(३९९) प्रसंगाने जी गोष्ट थोडक्यात साजरी करता येते ती अप्रसंगी मोल खर्चूनही उत्तम होत नसते.
(४००) वेळेचे महत्त्व समजणे म्हणजे कार्याचे महत्त्व समजण्यासारखे आहे.
(४०१) जातीय अस्पृश्यांना हात लावण्यापेक्षा प्रत्यक्ष दुराचाऱ्यांच्या सावलीत उभे राहणेच महापाप आहे.
(४०२) जातीय अस्पृश्यता ही रुढीने लावलेली आहे पण दुराचाऱ्याची अस्पृश्यता तर देवानेही मानली आहे.
(४०३) अंधारात जो अंधाराला पाहतो तो पाहणारा कोण, याचा जो अंत घेतो तोच आकाशाचा अंत लावू शकतो.

सुविचार- स्मरणी
(४०४) प्रत्येक श्वास घेणे म्हणजे नवीन दुनियेची उत्पत्ती असते पण जो पूर्वदमात आपली वृत्ती वासनेतून मुक्त करीत नाही त्याला ती ( सृष्टी) तशीच (शिळी) वाटते आणि जो निर्वासन असतो त्याला प्रत्येक प्रवास नव्याने आनंद देणारा भासत असतो. म्हणूनच योगी व स्थितप्रज्ञ सदा आपणातच आनंद पहात असतात.
(४०५) दुर्जनाचा हास्यविनोदही त्याचे दुर्गुण प्रगट करीतो आहे सज्जनाचे रडणेही मनाला उन्नत करणारे गुणच प्रगट करीत असते.
(४०६) अस्पृश्यतानिवारण करणे म्हणजे पापाचरणी बनणे नव्हे; दुराचारी लोकांना जवळ करणे म्हणजे पापाचरणी होणे आहे.
(४০७) समाजातल्या भंग्याला त्याचा धंदा हीन म्हणून जर आपण अलग केले, तर आपला मळ साफ करणाच्या मातेला आपण किती दिवस दूर ढेवतो ?
(४०८) समाजातील भंगी जर अलग झाले तर तुम्ही तुमच्यातील झाडणारे किती भंगी देऊ शकाल नि त्यांना अलग राहू द्दाल.
(४०९) मनुष्यमात्रांत स्पर्शास्पर्शभेद मानणे म्हणजे आपली मानव बुद्धी परंपरेला बळी देणे आहे.
(४१०) संतांचे सर्वच कार्य बोध घेण्यासारखे असताना त्यांचे समत्त्व, सद्व्यवहार, समदर्शींपणा, निस्पृहता, विश्वसेवा इत्यादी सोडून संगतीचा अभिमान व मिष्टान्नभोजन एवढेच आपण घ्यावयाचे काय ?

सुविचार-स्मरणी
(४११) जनाबाईचा भव्तिभाव जर आपण मनोभावाने श्रेष्ठ मानतो तर तिने जन्मभर *गोवरऱ्या* वेचून जीवन कंठले हे आताचे भक्त ध्यानात का घेत नाहीत ?
(५१२) मनुष्याचे आवडते विषय काही काळ गेल्यावर त्याच्या जीवन सत्यासारखेच त्याला वाटत असतात, कारण त्याची ज्ञानदृष्टी लोपलेली असते.
(४१३) मनुष्याने लहानाजवळ-अल्प ज्ञान्याजवळ-आपली पंडिताई (पांडित्य) कधीही दाखवू नये.
(४१४) समाजातील साधारण मनुष्याबरोबरही जो सरळ बोलून चालून सत्याने व्यवहार करितो तोच मानी व इमानी माणूस समजावा. अन्यथा, मामुली माणसाशी बोलणे ज्याला अपमानकारक वाटते तो महान घमंडी (घमेंडखोर, गर्वष्ठ) मनुष्य लोकांत अप्रिय होतोच. 
(४१५) वाईट वागणुकीच्या माणसाला त्याच्या इष्टमित्रांसमोर किंवा त्याच्या जातीय लोकासमोर हिणवून किवा उच्छेदून बोलणे चांगले नसते, तर त्याला एकांतातच बोध केल्याने उत्तम परिणाम होणे शक्य असते. लोकांत आपली गोष्ट न घेता त्याचा तो उगीच उलट परिणाम करुन घेत असतो.
(४१६) मोठ्या मनाची माणसे हसूनही कुणाला शिवीगाळ करीत नसतात तसेच रागावूनही शिवीला शिवत नसतात तर योग्य शब्दांनी परिणाम करण्याची त्यांच्यात धमक असते. दुसऱ्याला अपशब्द बोलून मान मिळविणारे लोक बाष्कळ असतात.
(४१७) या जगात माणसांच्याही चार खाणी आहेत १) आपलपोटे, २) प्रपंचस्वार्थी, ३) जातिपक्षीय आणि ४) समाजपक्षीय. या सर्वात मोठा माणुस तो म्हणावा की जो सुर्यचंद्राप्रमाणे सर्वांकडे आपलेपणाने पाहतो आणि अखिल मानवाच्या सुखाला आपले सुख समजतो.

सुविचार-स्मरणी
(४१८) मनुष्यमात्राच्या उन्नती करीता आपल्या धर्माच्या सांघिक प्रार्थनेशिवाय जेवढे पंथ वा संप्रदाय निर्माण होतात तेवढे सर्व समाजाचे शत्रूच समजावेत. कारण, त्याने व्यक्तिमहत्व वाढून तत्वज्ञानाचा लोप होतो आणि तत्त्वज्ञान लोपू लागले की देशाचा न्हास होतो.
(४१९) सात्विक, ज्ञानी महापुरुष जरी आपले महत्त्व वाढवित नसले तरी, त्यांनी आपल्या भोवताली जमलेल्या लोकांना समाजधर्म न शिकविल्यामुळेच त्यांच्यानंतर विशिष्ट संप्रदाय निर्माण होतो आणि वैयक्तिक प्रेमामुळे तत्त्वाचा लोप होऊन नंतर
त्या योगाने देशाचा न्हास होतो.
(४२०) आपले वैयक्तिक संशोधन करुन अनुभव घेणे, निराळे आणि मनुष्यमात्रांना *आपला अनुभव हाच सत्य आहे* असे सांगून तत्वांत भेद पाडणे निराळे !
(४२१) भाविकतेने आत्मोन्नती करणे उत्तम असले तरी ते निराळे आहे. अर्थात, त्या भरात राष्ट्राला पोषक नसलेले विचार समाजात मांडून सर्वांचा अनधिकार करुन (कर्तव्यभ्रम निर्माण करुन) भेद पाडणे हे पाप आहे.
(४२२) दैववाद सांगणाऱ्या व ऐकणाऱ्या लोकांना दैववाद तत्त्वतः पूर्ण कळत नसल्यामुळे देशात आळस आणि निष्क्रीयता वाढत असते आणि त्याने पुढच्या पिढीला दुःख भोगणे प्राप्त होते, या जबाबदारीची जाणीव ज्ञान सांगणाऱ्यांनी अवश्य ठेवायला पाहिजे. नाही तर *दैवात नाही *म्हणून उपाशी राहणे व *कर्मात आहे म्हणून चोरी करणे असे व्हायचे, परंतु ते बरे नव्हे.

सुविचार-स्मरणी
(४२३) भारतात जेवढी चातुर्वर्णयण्यवस्था मानण्याची  आवश्यकता आहे, तेवढीच चातुर्वर्णाच्या गुणक्रिया वाढविण्याचीही आवश्यकता आहे. परंतु ते जोपर्यंत वाढविले जात नाही तोपर्यंत चातुर्वण्याचा अभिमान किंवा आग्रह धरणे ढोंग आहे.
वर्ण मानणाऱ्याकरिता गुणांची आवश्यकता आहेच.
(४२४)क्रियाहीन शब्दज्ञान्यापेक्षा कार्यप्रवण डाकू काय वाईट ? कारण त्यांनाही निर्भयता धारण करावी लागते आणि प्राण हातावर घेऊन शिकार खेळावी लागते. पण हे क्रियाहीन लोक मोठे तत्वज्ञान सांगून उलट आळशी व भित्रेच असतात आणि फुकट खाण्याचे पाप माथी घेतात.
(४२५) ज्या समाजात विवाहाची इच्छा असणान्या विधवेचा विवाह केला जात नाही तो समाज अत्यंत पाप वाहणारा मी समजतो. कारण, मनाने किंवां लपून छपून दोषाचरण करण्यापेक्षा तसा नैतिक व्यवहार कधीही दोषी ठरु शकत नाही.
(४२६) ज्या विधवेला आपल्या पहिल्याच पतीची निष्ठावंत राहून
कार्यपूर्तता करणे असेल तिला बोझ घालने (विवाह करण्याचा आग्रह करणे.) हे तेवढेच दोषमय आहे, असे मला वाटते.
(४२७) देशसेवा करणे म्हणजे स्वतः आचरणाने मलीन राहून मोठयांचे मत सांगणे, असे होत नाही, त्याला स्वत:ही तसेच त्यागी व्हावयास पाहिजे असते. आणि जर कोणी स्वत: न वागता तसेच करीत बसेल तर तो त्या संस्थेचा दोष दाखविणारा होईल तिला उन्नत करणारा नव्हे !

सुविचार- स्मरणी
(४२८) माझा भारतदेश शब्दपांडित्याला मान देणारा नसून तो बोलेल तसे वागणाऱ्याला नम्र होणारा आहे, हे पुढाऱ्याला विसरुन चालता येणार नाही. जो तसे वागणार नाही त्याची प्रसंगी लोक छी: थू: करतील, हे लक्षात असू द्यावे.
(४२९) थोर म्हणून कामाची लाज बाळगणारापेक्षा हीन म्हणून काम करणाराच अधिक उत्तम होय.
(४३०) भक्ताची भक्ती भजनाने वाढत नसून मानसिक बोधनिष्ठेनेच वाढत असते. जर तसे नसते तर बहुरुपी कां भक्त झाले नसते ? याचा अर्थ, भजन करु नये, असा नसून त्याबरोबर भावही निर्माण झाला पाहिजे. भावहीन वृत्ती केवळ शब्दांनीच वाढत नसते.
(४३१) कोणावरही स्वार्थी प्रेम करणारापेक्षा क्रोधाने घुरत (घुमसत) असलेला माणूस बरा ! कारण, त्याच्यावर लोक भाळून बळी पडत नाहीत व त्यामुळे तो कुणाचा विश्वासघातही करु शकत नाही.
(४३२) आपल्या उपकारांची परतफेड करुन घेण्याची इच्छा आपण कधीही करु नये.
(४३३) अविचाराचा मार्ग फार मोठा आणि धोपट असतो पण विचाराचा मार्ग कोठेही अरुंदच ! कारण त्या मार्गाने जाणारे लोक फार कमी असतात. म्हणून जिकडे लोक जास्त जातात तिकडे जाताना विचारच करुन गेले पाहिजे; *लोक जातात म्हणून आपण जातो, असे करु नये.
(४३४)तरुणांच्या कर्तबगारीवरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. देश हा तरुणांच्या रक्तावरच जगत असतो. ज्या देशातील तरुणांची संघटना विस्कळीत असेल तो देश पाताळी जाणारच आणि ज्याची जिथे माळ गुफंली जात असेल तो देश उन्नत होणारच, असे निश्चित समजावे.

सुविचार- स्मरणी
(४३५) पतीच्या आज्ञेत वागणे हा जसा स्त्रीधर्म आहे. तसाच आपले पती अन्यायाच्या मार्गाने जात असता त्यांना न्यायाचा आणि उज्ज्वलतेचा मार्ग दर्शविणे हाही स्वीचाच धर्म किंवा अधिकार आहे ते पतीने न मानणे म्हणजे संसारात अपयश प्राप्त करुन घेऊन आपला नाश करणे आहे. संसारात तेच स्वर्गसुख समजावे की ज्या घरी पती-पत्नीचे लक्ष्य एकरुप आहे.
(४३६) मनुष्याने आपल्या जरुरीपेक्षा अधिक ऐषआराम वाढविणे म्हणजे पापकर्मास आव्हान देणेच आहे आणि कमीतकमी वस्तूंचा उपयोग करुन साधे राहणे म्हणजे सत्यत्वाला गुरु करणेच आहे, असे मला वाटते. ऐष आरामाची सवय लागण्याच्या अगोदरच विचार करावा, म्हणजे पुढे तेवढे कठीण जात नाही.
(४३७) लोकांचे ऐश्वर्य पाहून मनात झुरण्यापेक्षा वीरांचे कर्तव्य पाहून मनात झुरणे (हेच करणे) बरे ! म्हणजे त्या योगाने मन तसेच वागण्याचा विचार करीत असते.
(४३८) मनुष्याच्या मनाची परीक्षा ऐश्वर्याच्या उत्कर्षातील लीनतेने किंवा आपत्तींच्या आघातातील प्रसन्नतेतच लवकर होण्यासारखी असते.
(४३९) लोक आपल्या धर्माएवढाच मान दुसऱ्याच्या धर्माला देत नाहीत ते आपला धर्म पाळूनही अधार्मिकच राहतात, कारण, त्यांना आपला धर्म वाढविण्याची आवड नसते. कोणाचाही धर्म हा अन्याय शिकवीत नाही, तर त्यातील दुष्ट लोकच धर्माच्या नावाखाली अधर्माने वागत असतात.

सुविचार-स्मरणी
(४४०) परमेश्वराला तोच धर्म प्रिय आहे की, ज्यांच्या तत्वात कोणाचाही उच्छेद केलेला नसून सरळ व्यवहारापासून तो मोक्षापर्यंतचे नैतिक मार्ग आखले असतात आणि ज्यात मनुष्यमात्राचे सर्वागीण हित इच्छिलेले असते.
(४४१) ऋषि लोकांनी धर्माचीही गर्जना मनुष्याच्या सरळापणाकरिताच (निसर्गास) अनुसरन वागून सत्यहित साधता यावे याकरिताच केलेली असून, ज्या योगाने समाजापासून तो व्यक्तीपर्यंत सर्वांनाच व्यवहारापासून तो मुक्तीपर्यत (सर्वांगीण) आरोग्य आणि सुख लाभेल, त्यालाच धर्म असे संबोधिले आहे आणि त्याची आखणी न्यायशास्त्राला अनुसरन केलेली आहे.
(४४२) धर्माने स्पृश्य व अस्पृश्य हा जातीय भेद पाडला नसून पवित्र-अपवित्रतेचीच आखणी केली आहे. असे- कायिक, वाचिक व मानसिक अशा सर्वागांनी जे पवित्र असतील वा होत असतील तेच स्पृश्य आणि जे मलीन वागणुकीचे असतील ते दुराचारी अस्पृश्य ! मग ते कोणीही असोत !
(४४३) तीच माता धन्य आहे की, जिने आपल्या मुलाला सद् वर्तनी करण्याकरिता वाटेल तसे कष्ट व प्रयत्न केले आणि आपला मुलगा वीर बनवून राष्ट्राकरिता अर्पण केला!
(४४४) तोच पिता धन्य आहे की, ज्याने आपल्या मुलापासून स्वतःच्या स्वार्थाची अपेक्षा न करिता त्याच्या यशाचीच अपेक्षा केली आहे!

सुविचार-स्मरणी
(४४५) त्या तीर्थाची आज जरूरी नाही की ज्या तीर्थात देवाच्या नावावर धंदा चालवून किंवा भिक्षा मागून लोक जगतात आणि परंपरेचा फायदा घेऊन कर्तव्यहीन बनतात व आपल्या स्वार्थाकरिता लोकांना वाटेल तसा मार्ग सांगून पोट भरतात. तसेच धर्माच्या नावावर आलेल्या पैशांचा वाईट विनियोग करतात.
(४४६) त्या क्षेत्राकरिता प्रत्येकाने प्राण द्यावे की ज्यात संतांच्या बोधमय उदगारांचा स्वाध्याय शिकविला जातो आणि जे पवित्र स्थान महात्म्यांच्या वचनाप्रमाणेच काम करीत आहे. तसेच जेथचा आदर्श गुण मनुष्याच्या अंगी समाजाच्या धारणेची दृष्टी बाणवितो आणि केवळ अंधरुढींना जेथे जागाच मिळत नाही!
(४४७) मित्रांनो ! साधूपासून सदबोध घेण्याशिवाय कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या मनाला दुखविणेच आहे आणि सदबोध न मागणे म्हणजे त्याची दुरून मौज पाहणेच आहे.
(४४८) जो दुसऱ्याचा उपदेश ऐकण्याकरिता सदा तत्पर असतो त्यावर सज्जन आपोपाप कृपा करितात, परंतु तो बोध ऐकून गुण ग्रहण करणारा मात्र असावा. जे लोक चर्चा करूनही तसे वागत नसतात आणि त्यांच्या बोलण्याचा जगावर काहीच परिणाम होत नसतो.
(४४९) या सर्व जगात जर जिवलग मित्र कोणी असेल तर ते ब्रह्मचर्य! जो ब्रह्मचर्याला आपलासा करील तो कोणालाही बसर (हार) जाऊ शकत नाही पण ते ब्रह्मचर्य इंद्रियांसहित मनाचे ही असावे लागते. ब्रह्मचर्य पाळतो म्हटल्याने पाळले जात नसते.
तर त्याला उत्तम कर्तव्याची जोड आणि दुराचार-वृत्तीचा त्यागच करावा लागतो, म्हणजेच ते टिकू शकते.

सुविचार-स्मरणी
(४५०) मनुष्याच्या विचारांची प्रक्रिया काही अंशाने खाण्यापिण्यावरही अवलंबून असते आणि अभ्यास व संगतीवर तर ती पूर्णपणेच  अवलंबून असते त्याचे पोषक द्रव्य उल्हास आणि नैतीकता हेच आहे.
(४५१) सज्जनाची भेट त्यांच्या सद् वचनांच्या प्रेमाने ( प्रेमाच्या रूपाने) होत असते, शरीराने नव्हे! तसेच साधूचे दर्शन त्यांच्या उपदेशासाठी नम्र झाल्यानेच होते, मस्तक पायावर ठेवल्याने  नव्हे !
(४१२) देहाला सत्य समजून त्याच्याकरिता दुसऱ्याची आहुती घेणारे लोक अज्ञानी असतात आणि देह जगविण्याएवढीच त्याची काळजी वाहुन जे त्याच्यापासून स्वहिताचे व लोकहिताचे कार्य करुन घेतात तेच ज्ञानसंपन्न होतात.
(४५३) मनुष्याच्या कुवती (अधिकारा) प्रमाणेच त्याची शरीराप्रकृती, त्याची धारणा आणि इद्रिंये परमेश्वर त्याला देतो वास्तविक हे सर्व परमेश्वर त्याला दान करीत नसून त्याची मनोइच्छाच घेऊन येत असते.
(४५४) मनुष्याने रिकामा काळ घालविणे म्हणजे आपल्यावर वासनेची कुरघोडी करुन घेणे आणि आयुष्याची नासाडी करणे आहे.
(४५५) संवादात अर्थनिष्पत्ती न होणे म्हणजे बाष्कळ बडबडण्या सारखेच (शक्ती व आयुष्य यांचा व्यर्थ व्यय करणारे) असते.
(४५६) लाख शब्द खोटे बोलून पांडित्य दाखाविण्यापेक्षा एक सत्य बोलणे अधिक मोलाचे व मानाचे असते. (केवळ बुद्धीची कवायत करून खोट्यास खऱ्याचे रूप देणे याला उन्नतीच्या दृष्टीने कवडीचीही किमंत नाही).

(४५७) स्टेजवर उभे राहून साफसफाईच्या फुकटच भपकेबाज गोष्टी सांगण्यापेक्षा आपल्या घराची स्वच्छता केल्याने अधिक लोक धडा घेतील, असे मला वाटते.
(४५८) देवादिकांनाही अवतार मानणे हे त्यांच्या क्रियेवरुनच ठरते. तसेच जगातील कोणत्याही मनुष्याचा दर्जा वाढणे त्याच्या क्रियेवरच अवलंबुन असते, फक्त बोलून नव्हे !
(४५९) मोठ्या परंतु घाणेरड्या अशा महालापेक्षा गवताची स्वच्छ आणि व्यवस्थित झोपडी आरोग्याला व मनालाही हितकर म्हणून मला अधिक श्रेष्ठ वाटते. तसेच रोजचे कोरे (निर्धूत) रेशमी सोवळे-अन्नाने खराब झालेले असताही- नेसण्यापेक्षा रोज स्वच्छ केलेले खादीचे उत्तम धोतर मला अधिक पसंत पडते.
(४६०) मनुष्याने आपली बुद्धिमत्ता, एखाद्या मुर्खापुढे मांडणे जसे व्यर्थ तसेच आपले धैर्य मृत्यूपुढे दाखवून उगीच पहाडाखाली उडी टाकून मरणेही व्यर्थच. बुद्धीचा उपयोग मात्र पाहून तसाच धैर्याचा उपयोग प्रसंग पाहूनच केला पाहिजे.
(४६१) उत्तम माणसे आपले जगणे जगण्याकरिताच राखीत नसून महत्त्वाच्या कामाकरिताच राखीत असतात आणि प्रसंगी प्राण देऊनही कार्य संपूर्ण करितात.
(४६२) मनुष्याच्या विद्येच्या अध्ययनापेक्षा सरळ व्यवहारही ज्ञान शिकवावयाला समर्थ आहे. पण ते चांगल्याच्या सहवासानेच व्यवस्थित होते.

सुविचार-स्मरणी
(४६३) अज्ञानी लोक वस्तूच्या स्थितिपरिवर्तनाला मृत्यू समजून दुःख मानतात, पण ज्ञानी *हा मृत्यू म्हणजे नवीन रुपाने कार्याची योजना करण्यास संधी देणारा देवदूत समजून दुःख मानीत नसतो व म्हणूनच त्याला मरण कस्पटाप्रमाणे भासत असते.
(४६४) त्याचेच मरणे उत्तम आहे की, जो जिवंतपणीच वासनांचा त्याग करुन आपली मुक्ती करुन घेतो. अर्थात जीव परब्रम्हात विलीन करितो.
(४६५) मनुष्यात सदवर्तनाची तयारी असल्याशिवाय तो सत्पुरुषाची भाषा समजू शकत नाही आणि जो बोध समजू शकत नाही तो कृपेलाही पात्र होऊ शकत नाही. असे जर नसते तर महात्म्यांनी सर्व मानवांवर एकदमच कृपा केली असती. कारण ते समदर्शी असतात.
(४६६) सामाजिक योग्यतेच्या दृष्टीने पुराण सांगणारा व जोडे शिवणारा सारखाच, परंतु हे मर्म विसरल्यानेच राष्ट्रांची अवनती झाली आहे. अजूनही हा भेदभाव काढून प्रत्येकाचे महत्त्व सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने तेवढेच आहे* असे समजणारा समाज
जर निर्माण झाला तर हा देश पुन्हा पुर्ववत उन्नतिशिखरावर चढल्याशिवाय राहणार नाही.
(४६७) काही सत्पुरुष वाचेने जेवढे कार्य करु शकतात तेवढेच मानसिक वृत्तीनेही करु शकतात; पण ही वृत्ती त्यांच्यात निर्माण होण्याकरिता आपल्यात मात्र तशी (सजातीय) भावना जागृत असावी लागते. ती जर नसेल तर साधू कृपाळू असूनही काही करु शकत नाहीत, हे मी त्यांच्या प्रमाणांनी व अनुभवानेही सांगू शकेन.

सुविचार-स्मरणी
(४६८) विष्णूची भक्ती करुन लक्ष्मीचा (संपत्तीचा) अभिलाष धरणे उचित नाही. म्हणूनच भक्त लोकांनी शेवटपर्यंत आपले काबाडकष्ट न सोडता पोटाची चिंता स्वतःच मिटवून हरिभक्ती केली आणि ते त्यामुळेच जगात व देवद्वारातही प्रिय होऊन गेले.
(४६९) सत्पुरुषावर चमत्काराकरिताच ज्यांची श्रद्धा असेल ते लोक सत्पुरुषांचे मार्गही जाणू शकत नाहीत, मग त्यांना ओळखणे तर दूरच ! चमत्कारावरच सत्पुरुषत्व अवलंबून असते तर त्यांच्या काळी कोणी मेलाच नसता. त्यांचे सर्व करणे-धरणे चमत्काररुपच झाले असते.
(४७०) संतांच्या चमत्कारात जर काही तत्त्व असेल तर, त्यांच्या शुद्ध अंत:करणात उत्पन्न होणारे भाव दैवी सामर्थ्याने युक्त असल्यामुळे ते जगात लौकरच उमटतात; आणि त्यांची वाणी सत्याचे दिग्दर्शन करते, पण ती कल्पनारहितच असते. जाणून जर ही कृती असती तर त्यांनाही आम्ही गारुडीच म्हटले असते.
(४७१) पोटाकरिताच गुलामी पत्करणे म्हणजे जिवंतपणी नर्कवास पत्करणेच होय.
(४७२) स्वातंत्र्याने जगणे व समाजास जगविणे म्हणजे जिवंतपणीच स्वर्गसुख भोगणे होय.
(४७३) पूर्वजांच्या धनाचा अभिमान करणे हे आळसी गिधाडाप्रमाणे जगण्यासारखे आहे आणि स्वतःच्या बळावर अभिमानाने जगणे म्हणजे थोर (वाघ-सिंह) होऊन राहण्यासारखेच आहे.

सुविचार-स्मरणी
(४२३) भारतात जेवढी चातुर्वर्णयण्यवस्था मानण्याची  आवश्यकता आहे, तेवढीच चातुर्वर्णाच्या गुणक्रिया वाढविण्याचीही आवश्यकता आहे. परंतु ते जोपर्यंत वाढविले जात नाही तोपर्यंत चातुर्वण्याचा अभिमान किंवा आग्रह धरणे ढोंग आहे.
वर्ण मानणाऱ्याकरिता गुणांची आवश्यकता आहेच.
(४२४)क्रियाहीन शब्दज्ञान्यापेक्षा कार्यप्रवण डाकू काय वाईट ? कारण त्यांनाही निर्भयता धारण करावी लागते आणि प्राण हातावर घेऊन शिकार खेळावी लागते. पण हे क्रियाहीन लोक मोठे तत्वज्ञान सांगून उलट आळशी व भित्रेच असतात आणि फुकट खाण्याचे पाप माथी घेतात.
(४२५) ज्या समाजात विवाहाची इच्छा असणान्या विधवेचा विवाह केला जात नाही तो समाज अत्यंत पाप वाहणारा मी समजतो. कारण, मनाने किंवां लपून छपून दोषाचरण करण्यापेक्षा तसा नैतिक व्यवहार कधीही दोषी ठरु शकत नाही.
(४२६) ज्या विधवेला आपल्या पहिल्याच पतीची निष्ठावंत राहून
कार्यपूर्तता करणे असेल तिला बोझ घालने (विवाह करण्याचा आग्रह करणे.) हे तेवढेच दोषमय आहे, असे मला वाटते.
(४२७) देशसेवा करणे म्हणजे स्वतः आचरणाने मलीन राहून मोठयांचे मत सांगणे, असे होत नाही, त्याला स्वत:ही तसेच त्यागी व्हावयास पाहिजे असते. आणि जर कोणी स्वत: न वागता तसेच करीत बसेल तर तो त्या संस्थेचा दोष दाखविणारा होईल तिला उन्नत करणारा नव्हे !

सुविचार- स्मरणी
(४२८) माझा भारतदेश शब्दपांडित्याला मान देणारा नसून तो बोलेल तसे वागणाऱ्याला नम्र होणारा आहे, हे पुढाऱ्याला विसरुन चालता येणार नाही. जो तसे वागणार नाही त्याची प्रसंगी लोक छी: थू: करतील, हे लक्षात असू द्यावे.
(४२९) थोर म्हणून कामाची लाज बाळगणारापेक्षा हीन म्हणून काम करणाराच अधिक उत्तम होय.
(४३०) भक्ताची भक्ती भजनाने वाढत नसून मानसिक बोधनिष्ठेनेच वाढत असते. जर तसे नसते तर बहुरुपी कां भक्त झाले नसते ? याचा अर्थ, भजन करु नये, असा नसून त्याबरोबर भावही निर्माण झाला पाहिजे. भावहीन वृत्ती केवळ शब्दांनीच वाढत नसते.
(४३१) कोणावरही स्वार्थी प्रेम करणारापेक्षा क्रोधाने घुरत (घुमसत) असलेला माणूस बरा ! कारण, त्याच्यावर लोक भाळून बळी पडत नाहीत व त्यामुळे तो कुणाचा विश्वासघातही करु शकत नाही.
(४३२) आपल्या उपकारांची परतफेड करुन घेण्याची इच्छा आपण कधीही करु नये.
(४३३) अविचाराचा मार्ग फार मोठा आणि धोपट असतो पण विचाराचा मार्ग कोठेही अरुंदच ! कारण त्या मार्गाने जाणारे लोक फार कमी असतात. म्हणून जिकडे लोक जास्त जातात तिकडे जाताना विचारच करुन गेले पाहिजे; *लोक जातात म्हणून आपण जातो*, असे करु नये.

(४३३) अविचाराचा मार्ग फार मोठा आणि धोपट असतो पण विचाराचा मार्ग कोठेही अरुंदच ! कारण त्या मार्गाने जाणारे लोक फार कमी असतात. म्हणून जिकडे लोक जास्त जातात तिकडे जाताना विचारच करुन गेले पाहिजे; लोक जातात म्हणून आपण जातो, असे करु नये.
(४३४)तरुणांच्या कर्तबगारीवरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. देश हा तरुणांच्या रक्तावरच जगत असतो. ज्या देशातील तरुणांची संघटना विस्कळीत असेल तो देश पाताळी जाणारच आणि ज्याची जिथे माळ गुफंली जात असेल तो देश उन्नत होणारच, असे निश्चित समजावे.

सुविचार- स्मरणी
(४३५) पतीच्या आज्ञेत वागणे हा जसा स्त्रीधर्म आहे. तसाच आपले पती अन्यायाच्या मार्गाने जात असता त्यांना न्यायाचा आणि उज्ज्वलतेचा मार्ग दर्शविणे हाही स्वीचाच धर्म किंवा अधिकार आहे ते पतीने न मानणे म्हणजे संसारात अपयश प्राप्त करुन घेऊन आपला नाश करणे आहे. संसारात तेच स्वर्गसुख समजावे की ज्या घरी पती-पत्नीचे लक्ष्य एकरुप आहे.
(४३६) मनुष्याने आपल्या जरुरीपेक्षा अधिक ऐषआराम वाढविणे म्हणजे पापकर्मास आव्हान देणेच आहे आणि कमीतकमी वस्तूंचा उपयोग करुन साधे राहणे म्हणजे सत्यत्वाला गुरु करणेच आहे, असे मला वाटते. ऐष आरामाची सवय लागण्याच्या अगोदरच विचार करावा, म्हणजे पुढे तेवढे कठीण जात नाही.
(४३७) लोकांचे ऐश्वर्य पाहून मनात झुरण्यापेक्षा वीरांचे कर्तव्य पाहून मनात झुरणे (हेच करणे) बरे ! म्हणजे त्या योगाने मन तसेच वागण्याचा विचार करीत असते.
(४३८) मनुष्याच्या मनाची परीक्षा ऐश्वर्याच्या उत्कर्षातील लीनतेने किंवा आपत्तींच्या आघातातील प्रसन्नतेतच लवकर होण्यासारखी असते.
(४३९) लोक आपल्या धर्माएवढाच मान दुसऱ्याच्या धर्माला देत नाहीत ते आपला धर्म पाळूनही अधार्मिकच राहतात, कारण, त्यांना आपला धर्म वाढविण्याची आवड नसते. कोणाचाही धर्म हा अन्याय शिकवीत नाही, तर त्यातील दुष्ट लोकच धर्माच्या नावाखाली अधर्माने वागत असतात.

सुविचार-स्मरणी
(४४०) परमेश्वराला तोच धर्म प्रिय आहे की, ज्यांच्या तत्वात कोणाचाही उच्छेद केलेला नसून सरळ व्यवहारापासून तो मोक्षापर्यंतचे नैतिक मार्ग आखले असतात आणि ज्यात मनुष्यमात्राचे सर्वागीण हित इच्छिलेले असते.
(४४१) ऋषि लोकांनी धर्माचीही गर्जना मनुष्याच्या सरळापणाकरिताच (निसर्गास) अनुसरन वागून सत्यहित साधता यावे याकरिताच केलेली असून, ज्या योगाने समाजापासून तो व्यक्तीपर्यंत सर्वांनाच व्यवहारापासून तो मुक्तीपर्यत (सर्वांगीण) आरोग्य आणि सुख लाभेल, त्यालाच धर्म असे संबोधिले आहे आणि त्याची आखणी न्यायशास्त्राला अनुसरन केलेली आहे.
(४४२) धर्माने स्पृश्य व अस्पृश्य हा जातीय भेद पाडला नसून पवित्र-अपवित्रतेचीच आखणी केली आहे. असे- कायिक, वाचिक व मानसिक अशा सर्वागांनी जे पवित्र असतील वा होत असतील तेच स्पृश्य आणि जे मलीन वागणुकीचे असतील ते दुराचारी अस्पृश्य ! मग ते कोणीही असोत !
(४४३) तीच माता धन्य आहे की, जिने आपल्या मुलाला सद् वर्तनी करण्याकरिता वाटेल तसे कष्ट व प्रयत्न केले आणि आपला मुलगा वीर बनवून राष्ट्राकरिता अर्पण केला!
(४४४) तोच पिता धन्य आहे की, ज्याने आपल्या मुलापासून स्वतःच्या स्वार्थाची अपेक्षा न करिता त्याच्या यशाचीच अपेक्षा केली आहे!

सुविचार-स्मरणी
(४४५) त्या तीर्थाची आज जरूरी नाही की ज्या तीर्थात देवाच्या नावावर धंदा चालवून किंवा भिक्षा मागून लोक जगतात आणि परंपरेचा फायदा घेऊन कर्तव्यहीन बनतात व आपल्या स्वार्थाकरिता लोकांना वाटेल तसा मार्ग सांगून पोट भरतात. तसेच धर्माच्या नावावर आलेल्या पैशांचा वाईट विनियोग करतात.
(४४६) त्या क्षेत्राकरिता प्रत्येकाने प्राण द्यावे की ज्यात संतांच्या बोधमय उदगारांचा स्वाध्याय शिकविला जातो आणि जे पवित्र स्थान महात्म्यांच्या वचनाप्रमाणेच काम करीत आहे. तसेच जेथचा आदर्श गुण मनुष्याच्या अंगी समाजाच्या धारणेची दृष्टी बाणवितो आणि केवळ अंधरुढींना जेथे जागाच मिळत नाही!
(४४७) मित्रांनो ! साधूपासून सदबोध घेण्याशिवाय कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या मनाला दुखविणेच आहे आणि सदबोध न मागणे म्हणजे त्याची दुरून मौज पाहणेच आहे.
(४४८) जो दुसऱ्याचा उपदेश ऐकण्याकरिता सदा तत्पर असतो त्यावर सज्जन आपोपाप कृपा करितात, परंतु तो बोध ऐकून गुण ग्रहण करणारा मात्र असावा. जे लोक चर्चा करूनही तसे वागत नसतात आणि त्यांच्या बोलण्याचा जगावर काहीच परिणाम होत नसतो.
(४४९) या सर्व जगात जर जिवलग मित्र कोणी असेल तर ते ब्रह्मचर्य! जो ब्रह्मचर्याला आपलासा करील तो कोणालाही बसर (हार) जाऊ शकत नाही पण ते ब्रह्मचर्य इंद्रियांसहित मनाचे ही असावे लागते. ब्रह्मचर्य पाळतो म्हटल्याने पाळले जात नसते.
तर त्याला उत्तम कर्तव्याची जोड आणि दुराचार-वृत्तीचा त्यागच करावा लागतो, म्हणजेच ते टिकू शकते.

सुविचार-स्मरणी
(४५०) मनुष्याच्या विचारांची प्रक्रिया काही अंशाने खाण्यापिण्यावरही अवलंबून असते आणि अभ्यास व संगतीवर तर ती पूर्णपणेच  अवलंबून असते त्याचे पोषक द्रव्य उल्हास आणि नैतीकता हेच आहे.
(४५१) सज्जनाची भेट त्यांच्या सद् वचनांच्या प्रेमाने ( प्रेमाच्या रूपाने) होत असते, शरीराने नव्हे! तसेच साधूचे दर्शन त्यांच्या उपदेशासाठी नम्र झाल्यानेच होते, मस्तक पायावर ठेवल्याने  नव्हे !
(४१२) देहाला सत्य समजून त्याच्याकरिता दुसऱ्याची आहुती घेणारे लोक अज्ञानी असतात आणि देह जगविण्याएवढीच त्याची काळजी वाहुन जे त्याच्यापासून स्वहिताचे व लोकहिताचे कार्य करुन घेतात तेच ज्ञानसंपन्न होतात.
(४५३) मनुष्याच्या कुवती (अधिकारा) प्रमाणेच त्याची शरीराप्रकृती, त्याची धारणा आणि इद्रिंये परमेश्वर त्याला देतो वास्तविक हे सर्व परमेश्वर त्याला दान करीत नसून त्याची मनोइच्छाच घेऊन येत असते.
(४५४) मनुष्याने रिकामा काळ घालविणे म्हणजे आपल्यावर वासनेची कुरघोडी करुन घेणे आणि आयुष्याची नासाडी करणे आहे.
(४५५) संवादात अर्थनिष्पत्ती न होणे म्हणजे बाष्कळ बडबडण्या सारखेच (शक्ती व आयुष्य यांचा व्यर्थ व्यय करणारे) असते.
(४५६) लाख शब्द खोटे बोलून पांडित्य दाखाविण्यापेक्षा एक सत्य बोलणे अधिक मोलाचे व मानाचे असते. (केवळ बुद्धीची कवायत करून खोट्यास खऱ्याचे रूप देणे याला उन्नतीच्या दृष्टीने कवडीचीही किमंत नाही).

सुविचार-स्मरणी
(४५७) स्टेजवर उभे राहून साफसफाईच्या फुकटच भपकेबाज गोष्टी सांगण्यापेक्षा आपल्या घराची स्वच्छता केल्याने अधिक लोक धडा घेतील, असे मला वाटते.
(४५८) देवादिकांनाही अवतार मानणे हे त्यांच्या क्रियेवरुनच ठरते. तसेच जगातील कोणत्याही मनुष्याचा दर्जा वाढणे त्याच्या क्रियेवरच अवलंबुन असते, फक्त बोलून नव्हे !
(४५९) मोठ्या परंतु घाणेरड्या अशा महालापेक्षा गवताची स्वच्छ आणि व्यवस्थित झोपडी आरोग्याला व मनालाही हितकर म्हणून मला अधिक श्रेष्ठ वाटते. तसेच रोजचे कोरे (निर्धूत) रेशमी सोवळे-अन्नाने खराब झालेले असताही- नेसण्यापेक्षा रोज स्वच्छ केलेले खादीचे उत्तम धोतर मला अधिक पसंत पडते.
(४६०) मनुष्याने आपली बुद्धिमत्ता, एखाद्या मुर्खापुढे मांडणे जसे व्यर्थ तसेच आपले धैर्य मृत्यूपुढे दाखवून उगीच पहाडाखाली उडी टाकून मरणेही व्यर्थच. बुद्धीचा उपयोग मात्र पाहून तसाच धैर्याचा उपयोग प्रसंग पाहूनच केला पाहिजे.
(४६१) उत्तम माणसे आपले जगणे जगण्याकरिताच राखीत नसून महत्त्वाच्या कामाकरिताच राखीत असतात आणि प्रसंगी प्राण देऊनही कार्य संपूर्ण करितात.
(४६२) मनुष्याच्या विद्येच्या अध्ययनापेक्षा सरळ व्यवहारही ज्ञान शिकवावयाला समर्थ आहे. पण ते चांगल्याच्या सहवासानेच व्यवस्थित होते.

सुविचार-स्मरणी
(४६३) अज्ञानी लोक वस्तूच्या स्थितिपरिवर्तनाला मृत्यू समजून दुःख मानतात, पण ज्ञानी *हा मृत्यू म्हणजे नवीन रुपाने कार्याची योजना करण्यास संधी देणारा देवदूत समजून दुःख मानीत नसतो व म्हणूनच त्याला मरण कस्पटाप्रमाणे भासत असते.
(४६४) त्याचेच मरणे उत्तम आहे की, जो जिवंतपणीच वासनांचा त्याग करुन आपली मुक्ती करुन घेतो. अर्थात जीव परब्रम्हात विलीन करितो.
(४६५) मनुष्यात सदवर्तनाची तयारी असल्याशिवाय तो सत्पुरुषाची भाषा समजू शकत नाही आणि जो बोध समजू शकत नाही तो कृपेलाही पात्र होऊ शकत नाही. असे जर नसते तर महात्म्यांनी सर्व मानवांवर एकदमच कृपा केली असती. कारण ते समदर्शी असतात.
(४६६) सामाजिक योग्यतेच्या दृष्टीने पुराण सांगणारा व जोडे शिवणारा सारखाच, परंतु हे मर्म विसरल्यानेच राष्ट्रांची अवनती झाली आहे. अजूनही हा भेदभाव काढून *प्रत्येकाचे महत्त्व सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने तेवढेच आहे* असे समजणारा समाज
जर निर्माण झाला तर हा देश पुन्हा पुर्ववत उन्नतिशिखरावर चढल्याशिवाय राहणार नाही.
(४६७) काही सत्पुरुष वाचेने जेवढे कार्य करु शकतात तेवढेच मानसिक वृत्तीनेही करु शकतात; पण ही वृत्ती त्यांच्यात निर्माण होण्याकरिता आपल्यात मात्र तशी (सजातीय) भावना जागृत असावी लागते. ती जर नसेल तर साधू कृपाळू असूनही काही करु शकत नाहीत, हे मी त्यांच्या प्रमाणांनी व अनुभवानेही सांगू शकेन.

सुविचार-स्मरणी
(४६३) अज्ञानी लोक वस्तूच्या स्थितिपरिवर्तनाला मृत्यू समजून दुःख मानतात, पण ज्ञानी *हा मृत्यू म्हणजे नवीन रुपाने कार्याची योजना करण्यास संधी देणारा देवदूत समजून दुःख मानीत नसतो व म्हणूनच त्याला मरण कस्पटाप्रमाणे भासत असते.
(४६४) त्याचेच मरणे उत्तम आहे की, जो जिवंतपणीच वासनांचा त्याग करुन आपली मुक्ती करुन घेतो. अर्थात जीव परब्रम्हात विलीन करितो.
(४६५) मनुष्यात सदवर्तनाची तयारी असल्याशिवाय तो सत्पुरुषाची भाषा समजू शकत नाही आणि जो बोध समजू शकत नाही तो कृपेलाही पात्र होऊ शकत नाही. असे जर नसते तर महात्म्यांनी सर्व मानवांवर एकदमच कृपा केली असती. कारण ते समदर्शी असतात.
(४६६) सामाजिक योग्यतेच्या दृष्टीने पुराण सांगणारा व जोडे शिवणारा सारखाच, परंतु हे मर्म विसरल्यानेच राष्ट्रांची अवनती झाली आहे. अजूनही हा भेदभाव काढून *प्रत्येकाचे महत्त्व सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने तेवढेच आहे* असे समजणारा समाज
जर निर्माण झाला तर हा देश पुन्हा पुर्ववत उन्नतिशिखरावर चढल्याशिवाय राहणार नाही.
(४६७) काही सत्पुरुष वाचेने जेवढे कार्य करु शकतात तेवढेच मानसिक वृत्तीनेही करु शकतात; पण ही वृत्ती त्यांच्यात निर्माण होण्याकरिता आपल्यात मात्र तशी (सजातीय) भावना जागृत असावी लागते. ती जर नसेल तर साधू कृपाळू असूनही काही करु शकत नाहीत, हे मी त्यांच्या प्रमाणांनी व अनुभवानेही सांगू शकेन.

सुविचार-स्मरणी
(४६८) विष्णूची भक्ती करुन लक्ष्मीचा (संपत्तीचा) अभिलाष धरणे उचित नाही. म्हणूनच भक्त लोकांनी शेवटपर्यंत आपले काबाडकष्ट न सोडता पोटाची चिंता स्वतःच मिटवून हरिभक्ती केली आणि ते त्यामुळेच जगात व देवद्वारातही प्रिय होऊन गेले.
(४६९) सत्पुरुषावर चमत्काराकरिताच ज्यांची श्रद्धा असेल ते लोक सत्पुरुषांचे मार्गही जाणू शकत नाहीत, मग त्यांना ओळखणे तर दूरच ! चमत्कारावरच सत्पुरुषत्व अवलंबून असते तर त्यांच्या काळी कोणी मेलाच नसता. त्यांचे सर्व करणे-धरणे चमत्काररुपच झाले असते.
(४७०) संतांच्या चमत्कारात जर काही तत्त्व असेल तर, त्यांच्या शुद्ध अंत:करणात उत्पन्न होणारे भाव दैवी सामर्थ्याने युक्त असल्यामुळे ते जगात लौकरच उमटतात; आणि त्यांची वाणी सत्याचे दिग्दर्शन करते, पण ती कल्पनारहितच असते. जाणून जर ही कृती असती तर त्यांनाही आम्ही गारुडीच म्हटले असते.
(४७१) पोटाकरिताच गुलामी पत्करणे म्हणजे जिवंतपणी नर्कवास पत्करणेच होय.
(४७२) स्वातंत्र्याने जगणे व समाजास जगविणे म्हणजे जिवंतपणीच स्वर्गसुख भोगणे होय.
(४७३) पूर्वजांच्या धनाचा अभिमान करणे हे आळसी गिधाडाप्रमाणे जगण्यासारखे आहे आणि स्वतःच्या बळावर अभिमानाने जगणे म्हणजे थोर (वाघ-सिंह) होऊन राहण्यासारखेच आहे.

सुविचार-स्मरणी
(४७४) आयत्या धनाच्या श्रीमंत मनुष्यापेक्षा मोलमजूरी करुन कमविणारा व स्वावलंबनाने खाणारासुध्दा मला अधिक श्रीमंतवाटतो. कारण त्याला नेहमी शिकार करुन ताजेच खावे लागते.
(४७५) या जगातील सर्व ऐश्वर्यावर हक्काने त्यांची मालकी आहे. की, जे लोक स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या व बाहुबलाच्या धमकीने (सामर्थ्याने) जगतात व नेहमी नवीन ऐश्वर्य भोगतात. (अर्थात, या जीवनकलहात आपण मागे पडता कामा नये.)
(४७६) मनुष्यांत तोच मनुष्य मर्द समजावा की, ज्याने आशेवर आपला ताबा केला असेल आणि तिला विवेकाची जोड देऊन जो आत्म्यातच रत झाला असेल !
(४७७) आपल्याला माहीतच असेल की, मनुष्य जन्मला तेव्हाच मरणाचे आमंत्रण घेऊन आला आहे, अर्थात, हे जो विसरतो तोच व्यर्थ फजीत होतो आणि जो जाणतो तोच आपले कर्तव्य ओळखतो व यशस्वी होतो.
(४७८) मित्रांनो ! मरण तेच बरे की, जे आपल्या सत्कर्तव्याच्या धुंदीत येते. त्या मरणानेच मनुष्य जगात अमर होतो आणि जन्मल्याचे सार्थक होते.
(४७९) त्या मनुष्याच्या जगण्यात काय अर्थ आहे की, ज्याला या जगात जगणेही मुष्किल झाले असून शिवाय जगण्यासारखे| कामही होत नाही. (त्याने एखाद्या अमर वस्तूच्या मोबदल्यात देह देणेच बरे !)
(४८०) जो पुढारी आपल्या स्वार्थाकरिता समाजाचा सूड आणि आपला तोरा मिरवितो तो याच जन्मी पतन पावून लोकांच्या तिरस्काराला पात्र होतो व आपला नाश करून घेतो.

सुविचार-स्मरणी
(४८१) जो पुरुष संप्रदायाचे बंधन लादून घेऊन स्वतंत्र विचार न करीता केवळ त्याच्या तावडीतच राहतो तो जन्मात कधीही खरा भक्त होत नसून मतिहीन होतो- आपली बुद्धी गहाण करतो- असे मला वाटते.
(४८२) ज्या सुशिक्षिताला आपले काम करण्याची लाज वाटते तो या जन्मात तरी लोकांच्या पुढारी होऊ शकत नाही; जरी झाला असला तरी त्याचे पाय त्याला खालीच ओढतील, असे समजावे.
(४८३) जो नोकर प्रसंगी मालकाचे हित कशात आहे हे न सांगता फक्त पोटाचा पाईक बनून निव्वळ हुकूमाप्रमाणे वागतो तो इमानाचा पैसा न खाता, हराम खातो, असे मला वाटते.
(४८४) या जगातील सर्व सिद्धी त्याच्याच पायी लोळतील की, ज्याचे मन आपोआप कोण्याही इंद्रियामध्ये आसक्तीने प्रवेश करीत नाही.
(४८५) ज्या पुरुषाचे जीवन कष्ट न करिता, दुसऱ्यावर अवलंबून आहे. त्याने या जगात जिवंत राहून मजा नाही. त्याने मरण पत्करावे किंवा स्वतंत्र उद्योगी होण्याचा तरी प्रयत्न करावा. तसे जर स्वतंत्र होता येत नसेल तर मोलमजुरी करुन उजळ चेहऱ्याने दुसऱ्याकडे पहावे, हे सुध्दा मला बरे वाटते.
(४८६) राष्ट्राचा सर्व पैसा त्याच्याचजवळ राहू शकतो. जो आपले जीवन स्वत:करिता समजत नसून ते लोकहिताकरिताच आहे, असे समजतो व कमीतकमी खर्च करुन जगतो.

सुविचार-स्मरणी
(४८७) ज्या देवळातील प्रमुख लोक पतितांच्या उद्घाराकरिता देवळे मोकळी करीत नाहीत तेथील प्रमुख लोकांनी देवाची माणसासारखीच किंबहुना त्याच्याहूनही निपट्टर (हीन) अशी कल्पना केलेली असावी. म्हणूनच त्यांचा देव हरिजनांच्या  योगाने बाटतो, असे म्हणावे लागते.
(४८८) मनुष्याच्या खाजगी देवघरात आणि देवळात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. देवघर व्यक्तीची मालकी सांगते आणि धार्मिक देऊळ हे मनुष्यमात्राची मालकी दाखविते. *जगातील कोणत्याही धर्माच्या कोणत्याही मनुष्याने तेथील पवित्रतेचे आखलेले नियम पाळावेत. आपली मनोकामाना पूर्ण करुन उद्धार करुन घ्यावा, *हाच तेथे नियम असावयास पाहिजे.
(४८९) देवळाच्या नियमाप्रमाणे जर कोणी पतित असतील तर ते हिंसक, अस्वच्छ, अविचारी व दुराचारी हेच ठरु शकतात. जे असल्या हीन प्रवृत्तीना सोडण्याची इच्छा करतील ते देवळाच्या आत येण्याचे अधिकारी असावेत, असे मला वाटते.
(४९०) जगाचे अस्तित्व मनुष्याच्या मनावरच अवलंबून आहे. मनाचे अस्तित्व बहिर्मुखतेवर अवलंबून आहे. बहिर्मुखतेचे अस्तित्व (सुक्ष्मपणे विचार केल्यास) ज्ञानावर अवलंबून आहे आणि ज्ञानाचे अस्तित्व आत्म्यावर अवलंबून आहे. आत्म्याचे अस्तित्व मात्र स्वयमेव आहे ! तो कोणाच्याही अस्तित्वावर
अवलंबून नाही, उलट सर्व त्याच्यावरच अवलंबून आहेत. तोच सर्वांचा आधार आहे व विषय ( ध्येय) आहे.

सुविचार-स्मरणी
(४९१) मनाच्या पूर्ततेने जगाची पूर्तता होते पण जगाच्या पूर्ततेने मनाची पूर्तता मात्र होत नाही. जसे, सार्वभौमत्व मिळाले तरी मन शांत होत नाही पण मन शांत झाल्यावर झोपडीही ऐश्यवर्यवान वाटत असते.
(४९२) मनाची पूर्तता अभ्यासानेच (त्यागाने, निष्ठेने, ज्ञानाने व अनुसंधानानेच) होते, एरवी होऊ शकत नाही.
(४९३) मित्रांची वा जिवलगांची परीक्षा संकटाच्याच वेळी होत असते, मेजवानीच्या वेळी नव्हे !
(४९४) शीलवान लोक आपल्या उपकाराचा मोबदला घेणे महान पाप समजत असतात आणि अभिमानी लोक आपल्या उपकाराची आठवण न विसरता नेहमी उपकृत लोकांना नमवीत असतात.
(४९५) शरीरसुखाची इच्छा नेहमी कर्तव्यहीन लोकच करीत असतात, कर्तव्यवंतांना त्याची आसक्ती राहत नाही. ते नेहमी विचारात गर्क असून शांत असतात.
(४९६) दुसऱ्याची चहाडी खाणारे लोक स्वतः चहाडीनेच नाश पावतात आणि अधोगतीला जातात. दुसऱ्याची चहाडी खाणे आणि एखाद्याची अवास्तव स्तुती करणे ह्या कृति सारखेच फळ देणाऱ्या असतात. कारण अवास्तवात स्वार्थ भरपूर‌असतो आणि तो न साधला म्हणजे निंदेला सुरुवात असते.
(४९७) महात्म्याचा समदर्शीपणा आत्मतत्त्वासच अनुलक्षून असतो  वास्तविक ते गाढवाला घोडा म्हणताना आढळत नाहीत; एवढेच की जगाचा भेद द्रोहयुक्त असतो आणि त्यांचा भेद न्यायरूप असतो. तसेच प्रत्येक प्राणीमात्राला आपलेपणाने उत्तम बनविण्याचीच त्यांची बुद्धी असते व दुष्टामधे सूड घेण्याची बुद्धी असते.

सुविचार-स्मरणी
(४९८) ईश्वरावर भरवसा ठेवणाऱ्या धृवाने राज्याला लाथ मारून वयाच्या कोवळेपणी देखील अरण्यवास पत्करला परंतु तो अन्याय सहन करु शकला नाही.
(४९९) साधुसंतांच्या विदेहीपणाचे लोक जेवढे वर्णन करिता तेवढ्या प्रमाणात आजही विदेही नाहीत. लोकांचा ओळखण्याचा दृष्टिकोन बाहेरच्या इंद्रियांवरच अवलंबून आहे, पण वास्तविक विदेही तसेच असतात असे जर (संतांचे मत) असते तर राजा जनक विदेही ठरलाच नसता, ती एक निराळीच स्थिती असू शकते आणि खरोखर ओळखणारे सज्जन *कोणी चमत्कार करितात म्हणूनच ते विदेही* समजत नाही.
(५००) मनुष्य उत्तम धारणेने इच्छा करील ते प्राप्त करु शकतो किंबहूना ईश्वरही होऊ शकतो- म्हणजे आपले मूळ स्वरुप प्राप्त करुन घेऊ शकतो- आणि मलीन धारणेने मनुष्याचा क्रियादृष्टीने पशू किंवा भूत होऊ शकतो, अप्रिय असा होतो.
(५०१) गोरक्षणाचे महत्त्व वाढविणे हे मरकाड ( मरतुकड्या) गायी जमवून ठेवणे यात नसून अशक्त गायीला उत्तम नमुनेदार बनवून दुधाळ करुन ठेवणे आणि तिच्यापासून उत्तम बैल निर्माण करुन त्यापासून लोकांना धडा देणे यातच ते आहे.
(५०२) हा देश कृषिप्रधान असल्यामुळे ऋषिमुनींनी व देवादिकांनीही *गायीला आम्ही जवळ करणारेm म्हणून दाखविले आहे. त्यात *आपले उपासकही गायी उत्तम प्रकारे पाळून त्यांचा उपयोग करतील *हाच त्यांचा उद्देश असावा.