*३.धर्माची अपूर्ण कार्यसिद्धी*
प्रिय मित्रांनो आणि भगिनींनो,
चातुर्मास्य वर्गाचा आज दुसरा दिवस आहे. प्रचारकांचे अध्ययन सुरू झाले आहे. आजच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचा देशाच्या विकासाशी संबंध असला पाहिजे.प्रार्थनेचा सुद्धा देशाच्या प्रवृत्तीशी काहीएक संबंध असतो. ज्या वातावरणात आम्ही राहतो त्याच्या प्रगतीत आम्हा सर्वांचा हात असला असतील त्या काढून फेकण्यासाठी मानवजातीचा प्रयत्न असला पाहिजे. मानवतेच्या विकासासाठीच धर्मसंस्थांपकानी आणि संत पुरुषांनी नाना रस्ते शोधले. परंतु त्या रस्त्याची जाणाऱ्याची गतिमंद राहिली. हिंदू ,मुसलमान, ख्रिस्ती, जैन आणि जगातले सारेच धर्म अशा प्रकारचा दावा करतात. परंतु अजून पर्यंत दहा टक्के लोकांची सुद्धा प्रगती झालेली दिसत नाही, कुटुंबातील अवघी माणसे जेव्हा कुटुंबाच्या प्रगतीचा मनापासून संकल्प करतात तेव्हा कुटुंबाची उन्नती थांबत नसते. मग जगातील सार्या धर्माचा असाच शुभ संकल्प असतांना मानव समाज असंस्कारी, अविकसित का? आजकाल राजकारणी लोकही विश्व शांतीसाठी प्रयत्नशील आहेत. विज्ञान त्या दिशेने वाटचाल करीत आहे. परंतु इतके सारे असूनही जेव्हा चांगली परिस्थिती पाहायला मिळत नाही तेव्हा या सर्वांच्या विचारात, मार्गात आणि प्रयत्नात काहीतरी गोंधळ झाला असला पाहिजे हे निश्चित आहे.
कोणत्याही संस्थेला विशिष्ट ध्येयवाद असावामानवतेच्या
उत्थानासाठी धर्माचा काही उपयोग होणार नसेल तर धर्माचे ताबडतोब उच्चाटन होईल. अन्य संस्थासुद्धा समाजाच्या भल्यासाठी जन्म घेत असतात. परंतु ज्या तत्त्वांवर हे धर्म आणि या संस्था निर्माण झाल्या ती तत्वे त्यांनी सोडून दिली आहेत. धर्म, राजकारण आणि सेवाभावी
संस्था या सर्वांचीच समाजाला आवश्यकता आहे . परंतु त्यांचा जनतेला सुखदुःखाशी निकटचा संबंध असला पाहिजे . केवळ थापा मारुन हे काम हाण्यासारखे नाही . धर्माच्या नावावर ढोंगाचा सुकाळ करुन मानवजात आपला विकास करु शकणार नाही . लोक निर्बद्ध आहेत तोपर्यंत हा ढोगीपणा पचेल परंतु देशाच्या , समाजाच्या विकासासाठी या सर्व संस्थांच्या सक्रीय सहकार्याची आवश्यकता असते . अशा वृत्तीच्या संस्था आणि संप्रदाय कितीही असल्या तरी चालतात .
भारत सेवक समाजाच्यावतीने समाजकार्य करणाऱ्या संस्थांचे एक अधिवेशन दिल्लीला घेतले गेले होते . तिथे मी म्हटले होते
प्रत्येक संस्थेने एक विशिष्ट कार्यक्रम हातात घेऊन जबाबदारी पूर्वक तो पार पाडला पाहिजे . अशा संस्थांना साह्य करणारी एखादी मध्यवर्ती संस्था असावी . अशी काही पुनर्घटना होईल तर या संस्था लोकजीवन सुंदर आणि संपन्न बनवू शकतील . संस्था केवळ शोभेची वस्तू नको , आपल्या क्षेत्रांतील उणीवांचे निर्मूलन करणारी ती एक प्रभावी शक्ती असावी . एखाद्या गावात पन्नास वर्षापासून शाळा चालत असूनही तिथली माणसे जर अंगठाछाप असतील तर ती शाळा त्या गावात असून नसल्यासारखीच मानावी लागेल . हाच नियम संस्थांना लागू आहे . संस्था आपल्या ध्येयवादाचा प्रभाव भोवतीच्या समाजात निर्माण करणार नसेल तर ती संस्था केवळ एखाद्या मढ्याच्या स्वरुपात जिवंत आहे असे मानावे लागेल . टीकात्मक वृत्तीचा त्याग आवश्यक
लोकांना एक वाईट खोउ आहे . प्रत्येकजण दुसऱ्यावर टीका करतो . स्वत : चे ते कधीच पाहत नाही . ही गोष्ट ठिक नाही . संस्थासुद्धा या वृत्तीला अपवाद नाहीत . त्यांनी परस्परांवर टीका - टिपणी करीत बसण्यापेक्षा कामाला
लागावे . प्रत्येक संस्थेच्या कामाचा संबंध सामाजिक विकासाशी असावा . संस्थेमुळे समाजामा प्रतेक विभाग विकसित व्हावा . हाच नियम सेवामंडळालाही लागु
आहे. सेवामंडळाच्या प्रार्थनेच्या आणि भक्तीच्या प्रक्रियेत सामाजिक विकासाचे दर्शन घडले पाहिजे . समाजाला कशाची गरज आहे आणि त्या गरजांची पूर्ति कोणत्या मार्गानी होणार आहे या गोष्टींचे चिंतन आमचा केंद्रबिंद असला पाहिजे . ही प्रेरणा आम्हाला प्रार्थनेने मिळेल . परमेश्वराला आम्ही आमच्या कामासाठी शक्ती मागतो . परंतु याचा अर्थ असा नाही की सारे देवाने करावे आणि आम्ही निष्क्रिय बनावे . आता आपला भारत स्वतंत्र आहे . इथे अनंत संप्रदाय असावेत आणि त्यांनी देशाचा कोपरान्कोपरा विकसित करावा . लोकांना सरळ मार्ग सांगावा . या देशाचे लोक अंध - श्रद्धेने कोणाच्याही मागे धावतात . देशातील एक कोटी हिंदू ख्रिस्ती झाले ते याच वृत्तीने प्रत्येक गोष्टीचा चांगला परिणात दिसून आला पाहिजे . प्रार्थनेचा सुद्धा तोल सुटू नये . लहान माणसाची प्रार्थना कराल तर लहान वस्तू हातात पडेल . डॉक्टरांची प्रार्थना कराल तर औषध मिळवाल , पहेलवानाची प्रार्थना कराल तर डावपेच शिकाल परंतु ईश्वराची प्रार्थना कराल तर सारी दुनिया तुमची होईल . प्रार्थनेमुळे आम्ही विकसित व्हावे . सत्याकडे ओढले जावे आणि वाईटाचे त्यागी बनावे . प्रार्थनेचा संबंध स्वत : च्या आणि समाजाच्या विकासाशी आहे . हे लक्षात ठेवून आम्ही प्रार्थना करु ती एक मोठी शक्ती बनेल . अशी शक्ती प्रत्येक संप्रदायाच्या . प्रत्येक संस्थेच्या आणि प्रत्येक संघटनेच्या संग्रही असावी . असे झाले म्हणजे मग या संस्था आणि संघटना समाजाला भाररुपात न वाटता आपल्या विकासाचे वाटाडे वाटतील . गुरुदेव सेवामंडळालाही हाच नियम लागू आहे.
१४-८-५८
सायंकाळ