*४ . श्रीगुरुदेव सेवामंडळाचे रहस्य*
बंधूंनो आणि भगिनींनो .
गुरुदेव सेवामंडळाचे कार्य आम्ही का करीत आहोत याचे ज्ञान प्रचारकांना असणे आवश्यक आहे . गुरुदेव सेवामंडळ म्हणजे गुरुतत्व आणि गुरुशक्ती मान्य असणाऱ्या सज्जन सेवकाचे मंडळ , ज्यांचा गुरु शक्तीवर विश्वस असेल आणि सेवा हे ज्यांचे ध्येय असेल तेच या सेवामंडळाचे सेवक राहतील . आता गुरुत्व म्हणजे काय हे समजणेही आवश्यक आहे . प्रत्येक वस्तूत जे ज्ञान असते , श्रेष्ठपण असते त्याला आम्ही गुरुपण मानतो . एखाद्या हाडामासाचा पुरुष म्हणजे गुरुदेव अशी आमची व्याख्या नाही . परंतु ज्याच्या हृदयाकाशात अशा श्रेष्ठ , विश्वव्यापक शक्तीचा प्रकाश फाकला आहे , ज्याचा आत्मानुभव सर्व प्रकारच्या पुस्तको ज्ञानाच्या पलिकडचा आहे , व्यापक आहे , अशा आत्मज्ञानपरिपूर्ण महापुरुषाला आम्ही गुरूदेव समजतो . असे महापुरूष नित्य निर्माण होत असतात . त्यांच्या मार्गदर्शनावर आमचा विश्वास आहे . मार्गदर्शनाशिवाय कोणाचीही उन्नती होऊ शकत नाही . म्हणून अशा महापुरूषांचे मार्गदर्शन सेवामंडळाला आवश्यक आणि अपेक्षित आहे ही एक बाब झाली . आम्ही गुरुदेव देशकालातीत मानतो , ते साऱ्या विश्वाचे असतात . आणि त्यांचे सारे व्यवहारही सर्वांसाठी असतात . ही सर्वांगीण परीपूर्णता , विशाल धारणा । ज्या महापुरूषाच्या संग्रही असेल ती आमची गुरूदेवशक्ती होय . जगाच्या कल्याणासाठी कोणाला कोणत्या रस्त्यावर आणले पाहिजे याचे ज्ञान त्या महापुरूषाला आधीच झालेले असते असा आमचा विश्वास आहे .
बह्म सत्य आणि विश्व मिथ्या मानणारे महापुरुषही येथे होऊन गेले . आम्ही त्यांच्यावर टीका करू इच्छीत नाही परंतु त्यांची जगमिथ्या दृष्टी
त्या काळात भोगवादाचे निर्दालन करण्यासाठी आवश्यक होती.
परंतु आजही आम्ही तोच विचार जसाच्या तसा लागू करू आणि जग मिथ्या आहे असे म्हणू तर जगाचा आणि आमचा संबंधच संपून जाईल . मग त्याला दुरूस्त करण्याचा प्रयत्न कसा करता येईल ? आम्ही सेवा मंडळाच्या तत्वज्ञानाप्रमाणे या विचाराला जरा वळण देऊ इच्छितो . मानवसेवेच्या भावनेतून आजच्या साधकाने आपली साधना पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे आणि अशा प्रकारची प्रेरणा देणाऱ्या गुरूदेवशक्तीवर आमचा विश्वास आहे .
*खऱ्या सेवकाचे कार्य*
आपला महत्वाचा एक शब्द आहे सेवा . मी आणि समोरचा एकरूप आहोत या जाणिवेने परस्परांसाठी निष्काम कर्म करीत रहावे याचा अर्थ मी सेवा समजतो . प्रतिष्ठा , सन्मान आणि लोभ या सर्वांच्या विरहित भावनेने जे काही चांगले केले जात असेल ती सेवा होय . जिथे म्हणून काही त्रुटी असेल तिच्या पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सेवा होय . उदाहरणार्थ एक माणूस जंगलात जात आहे , त्याला रस्त्यावर पडलेला दुसरा माणूस दिसतो . त्याला पाहून पहिल्या माणसाच्या मनात अशी प्रेरणा निर्माण होते की त्याला योग्य ती मदत करावी . मग ते मदतीचे काम तो कोणत्याही प्रलोभनाशिवाय पूर्ण करतो . असे काम कर्तव्य समजून केले जावो अथवा अंत : करणपूर्वक दयार्द्र भावनेने केले जावो , दोन्हीचा अर्थ सेवा हाच होतो . आजकाल प्रत्येकजण सेवेच्या नावावर जगण्याचा प्रयत्न करतो . म्हणतो , आधी माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा , मग मी सेवा करतो . या वृत्तीला सेवा म्हणता येईल का ? ती सेवावृत्ती नसून ढोंग आहे . नोकरी ही कधीच सेवा होऊ शकत नाही . परंतु ज्यावेळी माणूस आपली नोकरी सांभाळून निष्काम - भावनेने जास्तीचे काम करतो तेव्हा ती सेवा होऊ शकते . नोकरसुद्धा सेवक मानले जाऊ शकतात . परंतु त्यासाठी अधिकारी वृत्तीपेक्षा सेवेच्या भावनेने लोकांची कामे करावी लागतील . समजा , एखादा नोकर आपल्या कामासाठी रस्त्याने निघाला आहे . रस्त्यांत एखादा

दगड बाजूला करून रहदारी सुरळीत चालू करण्याची आवश्यकता आहे . त्यावेळी नोकरी वृत्तीचा माणूस त्या कामात सहभाग होणार नाही . उलट म्हणेल हे काही माझे काम नाही . सेवाभावी माणूस दुसऱ्याच्या प्रगतीसाठी तळमळत असतो . ज्याच्या मनात दुसऱ्याच्या विकासासाठी धडपडण्याची प्रेरणा जागृत होते तेच खरे सेवक होत . जो विश्वात्म्याला आपल्या प्रयत्नांनी प्रसन्न करतो जो परस्परांशी सहकार्याची भूमिका घेतो , जो प्रत्येक जीवमात्राच्या विकासासाठी धडपडतो त्यालाच आपण सेवाभावी पुरुष मानले पाहिजे .
*सेवेचा दुरुपयोग*
दुसऱ्याला सुखी बनविण्याचा आणखी एक नमुना समोर येतो , दारुड्या जर गयावया करीत असेल आणि म्हणत असेल मला रोज दारू पिण्याची सवय आहे . आज मला ती मिळाली नाही . आपण कुठून तरी माझी व्यवस्था करा , अशा माणसाला दारू पाजणे हे पुण्यकर्म सेवाकर्म होऊ शकेल काय ? कुमार्गाने जाणाऱ्यांना केलेली मदत सेवा हाऊ शकत नाही . सेवा मानवाला सभ्य व उन्नत मार्गानीच नेऊ शकते , आज सेवेचा खरा अर्थ लक्षात न आल्यामुळे अथवा खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कितीतरी चांगली कामे वाईट होत चालली आहेत . अन्नदान अशाच कामापैकी एक होय . ज्या अन्नदानाने देश परागतीला पोचेल ते अन्नदान श्रेष्ठ होय . परंतु आज आपण काय पाहत आहोत ? कालीकमलीवाल्या बाबांनी एक निधी बनवून एक हजार साधुसंतांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली आहे . परंतु आज त्या । ठिकाणी चोर , डाकू भगवे कपडे घालून वावरतांना दिसतात . एक चांगली । गोष्टसुद्धा परिणामांचा विचार न करता चालू ठेवली तर किती वाईट होऊ शकते . याचा हा एक नमुना आहे . आज पंढरपूर , काशी , गया , प्रयाग सारखी । पवित्र तीर्थस्थानेसुद्धा लुटमारीचे अड्डे बनले आहेत . धर्माच्या नावावर , विश्वशांतीच्या नावावर आज सारे जग संघर्षाला प्रवृत्त झाले आहे . धर्माचे नाव
घेऊन लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे . सांगण्याचे तात्पर्य एवढे की सेवेसारखी , धर्मासारखी चांगली वस्तूसुद्धा परिणामांचा विचार न करता उपयोगात आणली तर कुमार्गाला प्रवृत्त बनविते . हा धोका बाजूला सारणे हे सेवकांचे आद्य कर्तव्य आहे . भक्ती किंवा धर्माच्या नावावर लोक दिशाभूल करतात . ही स्थिती बंद झाली पाहिजे . गुरुदेव सेवामंडळ यासाठी मन : पूर्वक प्रयत्न करु इच्छिते . .
आम्ही भाग्यवान आहोत . महापुरुषांच्या सहवासामुळ थोर थोर ग्रंथाचे आणि शास्त्रांचे सार आम्हाला त्यांच्या वाणीतून ऐकायला मिळते . त्यातून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो . अशा थोर थोर विचारवंतांच्या आणि संत सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाच्या आधारावरच सेवामंडळाची निष्काम सेवेची भावना टिकून आहे . या आधारावरच सेवामंडळ उभे आहे .
१५ - ८ - ५८
सकाळ