*५ . सामुदायिक जीवनाची व्यापकता* 
माझ्या प्रिय बंधू  भगिनीनो ,
आपली सामुदायिक प्रार्थना म्हणजे सामुदायिक जीवनाचे ज्ञान मिळविण्याची शाळा आहे . जगात अनेक हेतूंनी अनेक शाळा चालविल्या जात
आहे . ब्रम्हविद्येच्या शाळा आहेत . व्यवहार - विद्येच्या शाळा आहेत . प्रत्येक विधेसाठी एकेक शाळा असते . त्यानुसार आपली सामुदायिक प्रार्थना हीही एक शाळा आहे . मंदिर आहे . अशा प्रकारची सामुदायिक भावना आम्हाला कशी मिळेल , सामुदायिकतेशी आमचा संबंध काय आहे . या गोष्टीचा विचार आम्हाला केला पाहिजे . एकांतात जीवन घालविणाऱ्या माणसाचाही सामुदायिक जीवनाशी संबंध येत असतो . मग समाजात राहणाऱ्या माणसाविषयी बोलण्याची आवश्यकता काय ? वर वर पाहता आम्ही कोणावर अवलंबून नाही असे आपल्याला वाटत असते . परंतु ही गोष्ट खरी नाही . आपल्या अंगावरील कपड्याचे आपण उदाहरण घेऊ . आपण म्हणतो , मी कपडा बाजारातून विकत घेतला पण जरा बारकाईने विचार केला तर कापूस पिकविणारा , वेचणारा , कातणारा , विणणारा , धुणारा असे कितीतरी लोक आपल्या समोर येतात . या सर्वांनी श्रम केले म्हणून आपल्या अंगावर कपडा आला . केवळ कपड्याप्रीत्यर्थ एवढ्या माणसांनी सहयोग दिला म्हणून माझ्या अंगावर कपडा आला . मी ज्या घरात राहतो त्या घरासाठी बेलदार , सुतार , लोहार , मजूर इत्यादी लोकांचा सहयोग मी घेतलेला असतो . या वरुन आपले जीवन परस्परावलंबी आहे हा सिद्धान्त निघतो . पण परस्परांच्या मदतीशिवाय , सहकार्याशिवाय आम्ही जगात राहूच शकणार नाही , परंतु जेव्हा आपले घर तयार होते किंवा कपडा अंगावर येतो तेव्हा आपण या अनंत उपकारकर्त्यांना विसरुन जातो आणि मी कोणाचे
काही घेतले नाही , मला कोणाचे काही देणे नाही असे म्हणतो . जीवनात आम्हाला अनंत वस्तूंची गरज असते . त्या अनंत वस्तू निर्माण करणारे कारागीर आमचे

*प्रार्थना आणि जीवन कला* 
आमच्या भारतीय कुटूंबात आम्ही चाळीस कोटी लोक आहोत. त्या सर्वाचा उत्पादनात हात असावा आणि प्रत्येकाने आपल्या कलेचा शक्तीचा विकास करावा . अन्नधान्याचे उत्पादन ही आजची प्रमुख गरज आहे. तिच्या  पूर्तीसाठी आपण रात्रंदिवस जागरुक असलो पाहिजे . याशिवाय आपल्या उत्पादन कार्यात कलात्मकताही असली पाहिजे . कुम्भार रात्रंदिवस खपून मातीची मडकी बनवतो . परंतु ती सारी ओबड - धोबड असल्यामुळे माणूस त्यांचा वापर करु इच्छित नाही . चिनी भांडी मातीचीच असतात . वस्तूच्या निर्मितीत कलेचा वापर अपरिहार्य असतो . कलात्मकतेशिवाय , सुंदरतेशिवाय उपयोगी वस्तु टाकाऊ ठरते आम्ही अशा प्रकारे कलाज्ञान आणि सौदर्यदृष्टी आत्मसात करणार नाही ,तर आम्ही निर्माण करू त्या वस्तू टाकाऊ ठरतील . सुरुवातीला खादीचा उपहास होत असे . परंतु आज तिच्यामधील कलात्मकतेमुळे , सुंदरतेमुळे खादीचा पोषाख एक सभ्य पोषाख मानला जातो . सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आमच्या साऱ्या कला विकसित व्हाव्या . आमचे सामुदायिक जीवन जसजसे उन्नत होत राहील तसतसा कलेचासुद्धा विकास होत राहील , आमचे विचार उदात्त असले । पाहिजे . आपण जी प्रार्थना करतो तीत या साऱ्या बाजू येऊन जातात . प्रार्थना म्हणजे चांगले विचार , चांगल्या भावना यांची जोपासना , प्रार्थना म्हणजे स्वच्छ घर , भरपूर उत्पादन , कलापूर्ण जीवन आणि शिस्तबद्ध अनुशासन , जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन वाढेल , जीवनपयोगी कला विकसित होईल तेव्हांच . आमची प्रार्थनाही खरी प्रार्थना होईल . नाहीतर प्रचारक सांगतील ,
 *प्रार्थना करा .  *आणि लोक म्हणतील * उद्याची चिंता डोक्यात आहे . कशाची आली प्रार्थना ?  *आम्ही प्रार्थनेत म्हणत असतो .
 *है पार्थना गुरूदेव से,यह स्वर्गसम संसार हो ।  अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो॥* ज्यावेळी देशात अन्न धान्याची समृधी होईल, उद्योगधंदे वाढतील,

उपकारकर्ते असतात . या दृष्टीने विचार केला तर कोणताही मानुस आपला कुटुंबाबाहेरचा आहे असे आपल्याला मानुन चालणार नाही . हे सारे आमच्या घरातले लोक आहेत . आमचे घर एक विशाल असे घर आहे . आम्ही विश्व कुटुंबातले एक नागरिक आहोत . 
 *पडलेल्यांना उचला* 
आमच्या कुटुंबात भंगी , चांभार , कुमार , ब्राह्मण सर्वच लोक येतात ही भावना एकदा स्थिर झाली की मग या लोकांच्या विकासाचा प्रश्न समोर येतो . जर आम्ही एका कुटुंबातले असू आणि आमच्यातील काहीजण अगदी पद - दलित आहेत . अज्ञानी आहेत . दुबळे - रोगी आहे . तर अशांना मदतीचाचा हात देऊन वर घेणे आमचे कर्तव्य ठरते . याच सोबत प्रत्येकामधील कलाकुसरतेचा विकासही आवश्यक आहे . ईश्वराच्या राज्यात सारे अविरोध वृत्तीने नांदत असतात . ही सारी सृष्टी ईश्वराची निर्मिती आहे तित अनंत प्रकार आहे . अनंत रंग आहेत . अनंत आकार आहेत . मुंगीपासून हत्ती पर्यंतअनंत प्रकारचे प्राणी आहेत . लव्हाळ्यापासून महावृक्षापर्यंत अनंत प्रकारच्या वनस्पती आहे . नानाविध आकार , नानाविध विकार आणि नाना प्रकार आहेत . प्रत्येकाचे रुप , रंग आणि आकार विभिन्न आहेत . असे का ? काय असावा याचा अर्थ ? या विशाल सृष्टीत अनंत रुपे . अनंत कला अनंत विचार अविरोध वृत्तीने वावरताहेत . यावरून आम्ही फार मोठा घडा शिकलो पाहिजे । आम्ही कोणत्याही विचाराचे असू कोणत्याही संप्रदायाचे असू परस्परांशी अविरोध वृत्तीने , सहकार्याच्या भावनेने वागू ,हा आमचा संकल्प असला पाहिजे . मानव। सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे . तो सर्वांचा संरक्षक व्हावा अशी त्याच्याबद्दल देवाची अपेक्षा असली पाहिजे . आपल्यापेक्षा जे मागासले आहेत . दलित दुखी आणि अपंग आहेत , रंजले - गांजले आहेत अशांना मदतीचा हात देऊन त्यांना उनंत करणे हे माणसाचे आद्य कर्तव्य होय. सुष्टीच्या व्यवहारावरून हे आपण सहजपणे ओळखले पाहिजे .

लोक चारित्र्यसंपन्न बनतील , अंगाअंगातून शौर्य मुसमुसू लागेल तेव्हाच सारा संसार स्वर्गासारखा होऊ शकेल . केवळ घंटी वाजवून आणि प्रार्थनेसाठी नाक दाबून हे होऊ शकणार नाही . मरणानंतरचा स्वर्ग आमच्या काही कामाचा नाही . आम्हाला जिंवतपणीच स्वर्गतुल्य जीवनाचा अनुभव हवा . पण हे सारे आमच्या सामुदायिक विकासातूनच होऊ शकेल . आमची प्रार्थना अशा प्रकारच्या स्वर्गतुल्य संसाराच्या निर्मितीचे एक साधन आहे . ज्या क्षणी आमचे सामुदायिक जीवन विकसित होईल , जीवनाची कला उन्नत होईल , देश समृदीने ओतप्रत भरेल त्याक्षणी आमची प्रार्थना यशस्वी झाली असे आम्ही समजू ,  

१५ - ८ - ५८ 
सायंकाळ