*७ . देवाच्या दरबारात मानवी कर्तव्य*
प्रार्थना प्रेमी बंधू - भगिनिनो .
आम्ही ज्यावेळी ईश्वराची प्रार्थना करीत असतो त्यादेको ईश्वरही आमची प्रार्थना करीत असाला , काल येथून एक सत्पुरुष
देवाधरी गेला आज सकाळी मी त्याची प्रार्थना करीत होतो . या सर्व गोष्टी प्रेमाने प्राप्त होतात , भगवान अणि भक्त यांचासुद्धा एक प्रेमसंबंध असतो . दोघेही परस्परांसाठी प्रार्थना करीत असतात . परंतु दोधांच्या प्रार्थनेत अंतर असते . माणसाची प्रार्थना देवाजवळ जाण्यासाठी असते आणि देवाची प्रार्थना सद् भक्ताताला जवळ देण्यासाठी असते . भगवत गीतेत भगवान म्हणतात .
*जो पुरुष मला अनन्य भावनेने शरण येतो त्याच्या योगक्षेमाची चिंता मी वाहतो . *असे सद्भभक्ताला परमेश्वराचे हे अभिवचन आहे . सामुदायिक जीवनातसुद्धा आम्ही जेव्हा समाजाच्या स्वाधीन होऊन निष्काम भावनेने सेवाकर्म करीत राहतो तेव्हा स्वाभाविकपणे समाज आमची चिंता वाहत असतो . सामुदायिक प्रार्थना म्हणजे ही वृत्ती आत्मसात करण्याची शाळा जेव्हा आम्ही स्वतःला ईश्वराचे मानतो तेव्हा आम्ही समाजाचे , सर्वाचे असतो . असा त्याचा अर्थ आहे . देव समाजाहुन वेगळा नाही , कारण तो सर्वात भरुन उरला आहे . त्याला धर्म , वंश , लिंग इत्यादी भेद मान्य नाहीत . जेव्हा आम्ही प्रार्थनेत मग्र होतो तेव्हा ईश्वराच्या या सर्व - व्यापकतेचा अनुभव घेतला पाहिजे . हा अनुभव म्हणजेच खरी प्रार्थना . आम्ही खऱ्या अर्थाने जेव्हा देवाला मानतो तेव्हा आपोआपच आमचा संबंध अखिल जगताशी प्रस्थापित होतो . ही धारणा जर प्रार्थना करतांना मनात स्थिर होत नसेल तर प्रार्थना हा एक मनोरंजनाचा प्रकार होईल . परमेश्वर प्राप्तीचे साधन होणार नाही . व्यवहारातसुद्धा आपण स्वतःला ज्या पक्षाचे मानतो त्या पक्षाचे सारे लोक आपले होत असतात . ज्या धर्माचे आम्ही अनुसरण करतो त्या धर्माचे सारे लोक असतात . त्याच न्यायाने
जेव्हा आम्ही परमेश्वराचे होऊ इच्छितो तेव्हा आमचे नाते देवाच्या प्रजेशी आपोआप जोडलेले असते .
*देवाच्या राज्यात देवाचे नियम*
_ _ अशा प्रकारच्या भावनेचा उच्चार करणे आणि त्यानुसार आचरण करणे या दोन भिन्न वस्तु आहेत . जर आम्ही देवाच्या सृष्टीशी संबंधित आहोत तर त्या सृष्टीचे सर्व नियम आम्हाला मन : पूर्वक मान्य करावे लागतील . त्या नियमांची ओळख करून घ्यावी लागेल . त्यानुसार आचरण करुवे लागेल . घर लहान असते म्हणून तिथले नियमही लहान असतात , विश्वव्यापी सृष्टीचे नियम विशाल असतात . जर आमची या गोष्टीवर श्रद्धा असेल तर त्यासंबंधीचे सारे नियमही आम्हाला अनुसरावे लागतील , आम्ही गुरूदेव सेवामंडळाला मानत असू तर त्याच्या नियमांना , विचारप्रणालीना , ध्येयवादालाही मानावे लागेल .
सामुदायिक प्रार्थनचा प्रमुख उद्देश्य आमची सारी दिनचर्या सभ्यतेने , समतेने , निर्मलतेने आणि निष्कामतेने व्हावी असा आहे . प्रार्थनेच्या जागी सारे समान आहेत . राष्ट्रपती आणि चपराशी किंवा विद्वान आणि मूर्ख यांच्या जागा
प्रार्थनेत वेगळ्या नसतात . प्रार्थना म्हणजे सभ्यता . प्रार्थना करणाराचे आचरण प्रार्थनेच्या विचारानुरूप असावे यात अस्वाभाविक असे काहीच नाही . सामुदायिक प्रार्थना समाज - जीवनाच्या विकासासाठी आम्ही करीत असतो . समाज जीवन अधिकाअधिक प्रगतिशील कसे होईल यांची चिंता आम्ही सामुदायिक प्रार्थनेच्या द्वारा करीत राहिलो पाहिजे .
देवाने ही सृष्टी निर्माण केली आहे . त्याने सारे काही व्यवस्थित केले आहे . त्याने त्यासाठी काही नियम ठरविले क्रमाने ऋतु येतात आणि
जातात . मानवी संख्या मर्यादेपेक्षा अधिक वाढली तर रोगराई येते . युध्द होतात . आणि अशाप्रकारे सृष्टीचे संतुलन कायम राहते . हीच व्यवस्था इतस्त्रही कायम असली पाहिजे . आम्ही मंदिरे निर्माण केली पण व्यवस्थेचे नियम विसरूनं . गेलो . धर्म स्विकारला पण धर्माचे आचार नजरेआड केले मनुष्य स्वभाव
सुस्कांरी बनवायचा असेल तर या साऱ्या गोष्टी नियमपूर्वक अनुसराव्या लागतील, तेव्हाच आम्ही देवाची प्रार्थना करू शकू. परमेश्वर या विशाल सुष्टीत वावरतो .मग तो मलाच कसा एका शरिराचा , एका गावाचा , एकाजातीचा होउ देईल?
मलाही त्याच्याच सारखा व्यापक अनुभव करावा लागेल. जिथुन चांगले मिळेल तिथुन ते घेतले पाहिजे .लोक म्हणतात तुमच्या प्रार्थनेला नमाजाचा वास येतो. चर्चचा भास होतो . मी म्हणतो * यात वाईट काय आहे ?
सर्व धर्माच्या लोकांना प्रार्थना आपलीशी वाटावी या पद्धतीला सदोष प्रार्थना पध्दती कसे मनता येईल ? आजच्या युगाची कोणतीही प्रार्थना ही सर्वधर्म संग्राहक असली पाहिजे . सर्व जाती धर्म वंशांच्या मानव समुहांना प्रेमाने जवळ घेणारी असली पाहिजे .
मित्रहो , कोणत्याही ठिकाणी मूळ स्वरूप एकच आहे . कोणत्याही देशात आणि भाषेत भाषा प्रेमाचा अर्थ द्वेष असा होत नाही . रडण्याचा अर्थ हसणेअसा होत नाही . ही विशाल सृष्टीच्या नियमांची एकरूपता होय तीआम्ही ओळखली पाहिजे , अनुसरली पाहिजे आणि आचरली पाहिजे . आमजी हुदये त्यामुळे दिवसानुदिवस अधिक व्यापक , अधिक विशाल झाली पाहिजेत.
आम्हाला या जगात येण्याची संधी मिळाली . जीवांच्या प्रगतीचा हा मार्ग सारखा पुढे पुढे चालला आहे . या जन्मात जी काही बरी वाईट कर्म आनच्या हातून होतील तीच आपची संचित संपत्ती ठरेल . तिची सोबत घेऊन पुढचा मार्ग आम्हाला आक्रमावा लागेल . अशा प्रकारच्या पुनर्जन्मवादावर धर्मा
धर्माचे मतभेद आहेत . परंतु कर्मानुसार फलप्राप्ती होते यावर सर्व धर्माचा विश्वास आहे. सर्व धर्मातले हे उदात्त तत्व एकत्र करून मानव जीवनाची ऊनत्ती साधणे ही ईश्वराला आमच्या कडून अपेक्षा आहे . आणि हे साधावयाचा एकमेव मार्ग सामुदायिक प्रार्थना हा आहे .
१७ - ८ - ५८
सकाळ