*८ . वर्णाश्रम आणि समाजजीवन* 
माझ्या प्रिय मित्रानों आणि भगिनींनो ,
इथे आपल्यासमोर मी बौद्धिक देण्यासाठी बसतो . आपण विध्यार्थी होऊन माझ्यासमोर बसला . याचा अर्थ सांगणराची एकजात आणि ऐकणाराची दुसरी जात असा कोणी करू नये . हा प्रासंगिक भेद होय . जेव्हा मी भाषणसाठी येथे येतो तेव्हा माझ्यावर आलेली ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी येथे आलो असा याचा अर्थ आहे . जेव्हा दुसरा कोणी प्रचारक बंधूभाषण करण्यासाठी येथे उभा राहील ते मी विद्यार्थी होऊन समोर बसेन . आमच्यात ऐकणाराची व बोलणाराची अशा वेगळ्याजाती निर्माण होता कामा नये . यात धोका आहे . वर्णाश्रमपध्दति एका विशिष्ट कालात आवश्यकतेनुसार निर्माण झाली परंतु आज तिचे स्वरूप बदलून गेले आहे . वर्णाश्रमपध्दति आज चुकीच्या मार्गाने चालली आहे . कामाच्या सोयीसाठी भंगी , ब्राम्हण , क्षत्रिय आदी वर्ण निर्माण केले गेले परंतु पुढे जन्मानुसार वर्ण ठरले . गुणकर्मानुसार वर्णाश्रम निर्माण झाले पण आज त्याला जातीचे रूप आले . पुर्वी माणसाच्या मगदुराप्रमाणे सेवेची कामे
मिळत , धडधाकट माणसाला सरंक्षणाचे काम मिळे . विद्वान माणसाला धर्माधिकान्याचे आसन मिळे , योग्यतेनुयसार हा वर्ण बदलणे आवश्यक होते . एखादा क्षत्रिय ब्राह्मण होऊ शकतो . ब्राह्मणात क्षात्रतेज निर्माण होऊ शकते . भनंगी - व्यापारी कालांतराने व अभ्यासाने विद्वान होऊ शकतो . परंतु वर्णाश्रम पुढे जन्म व जातीवर स्थिर झाला . ही वर्णाश्रमाची अधोगती होय . कामाच्या विभागणी पर्यंत हे ठीक होते . परंतु माणूस जसजसी आपली योग्यता प्रगट करत जाईल तसतसा त्याचा वर्ग बदलत जाण्याची सोय , आवश्यक होती . जोपर्यंत सारा समाज ब्राम्हण होणार नाही - म्हणजे विद्वान होणार नाही , तोपर्यंत सर्व वर्णाच्या लोकांना प्रगतीसाठी वाव असला पाहिजे . सारा समाज ब्राह्मण झाल्यावर समाजाची कामे बंद पडतील . ही भीती या ठिकाणी व्यर्थ


आहे समाजाची कामे कधीच बद राहू शकत नाहीत . ब्राम्हाण्ये प्राप्त झाल्यावरही समाजाची पडतील ती कामे आम्हालाच करावी लागतील . मानसिक , बौद्धिक आणि आध्याथमिक विकासाचा कोणताही संबंध या कामांशी येत नाही, ज्या प्रमाणे खरा अभिनेता आपल्या भूमिका उत्तम प्रकारे वठवितो . त्याप्रमाणे माणसाचे झाले पाहिजे . एकाच मानसाला भग्यांची भुमीका वठविता आली पाहिजे , याचप्रमाणे त्याला ब्राम्हानाची भूमिकाही वठविता आली पाहिजे. कर्म हा त्याचा शारीरिक आविष्कर होय. गुणांची साधना हा त्याचा आध्यात्मिक आविष्कार होय,असे होईल तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल . जेव्हा समाजातुन जातीय उघाटन तेव्हा वर्ण श्रर्माचा  उच्च- नीच्च तेचा गर्वही जिरून जाईल .
त्याचबरोबर आम्हाला आनखी थोडा विचार करावा लागेल , भग्यांची आवश्यकता पडणार नाही असे शौचकूप बनवावे लागतील , वैश्याचे उद्याटन करण्यासाठी सहकारी पद्धतीने देवाणघेवाण करावी लागेल ,
मित्रहो , जी गोष्ट जबरदस्तीने दुस्त्यावर लादली जाते तिथे गुलामी निर्मान होते . ही मानव - जातीच्या प्रगतीची व्यवस्था नव्हे . ब्राह्मण धर्माचरणाच्या बाबीतील ब्राहाण असेल पण प्रसगांनुसार तो भंगी आणि क्षत्रीयही होऊ शकेल. मनुष्य प्रगत असो वा अधोगत असो . त्याचा वर्ण जन्मावर अवलंबून असणे हा वर्गाश्रम पद्धतीत फार मोठा धोका आहे . . . *वर्णाश्रम पद्धतीत परिवर्तन* 
आम्ही वैचारिक क्रांतीचे पुरस्कर्ते असू तर हा वर्णाश्रमाचा गेलेला तोल आम्हाला सावराला लागेल . जे प्रगत नसतील त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्थान द्यावे लागेल . प्रचारकाला या दृष्टीने सतत चिंतन मनन करावे लागेल प्रचारकाला केवळ प्रार्थना करुन चालणार नाही . त्याला प्रार्थनेबरोबर उत्तम भजन यावे लागेल . समाजाला आवश्यक असतील ती कामे करण्याची कुशलता मिळवावी लागेल . सरकारची मदत लोकांपर्यंत कशी पोचवावी याचा अभ्यास करावा लागेल . प्रत्येक गोष्टीचे एक तंत्र असते . या तंत्राला आजच्या युगात


अत्यंत महत्व आहे . जाणकारांकडून ही सारे तत्रे प्रचारकाला आत्मसात करून ध्यावी लागतील . या सर्व गोष्टी प्रचारकांनी आपल्या अंगी बाणवून घ्याव्यारे आग्रहपूर्वक सांगण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत . जर कोणाची काही चुक होत असेल तर सभ्यतापूर्वक ती त्याच्यासमोर आणली जावी . आम्ही गुरु आणि शिष्य या दोन्ही भूमिका उत्तमप्रकारे कराव्या अशी माझी इच्छा आहे या सर्व गोष्टींचा आम्ही जेव्हा अभ्यास करू तेव्हा हा समाज प्रगतिशील बनविण्यासाठी आम्ही काहीतरी भरीव काम करू शकू , सेवामंडळावे जे काही कार्यक्रम आम्ही अनुसरु त्याचा परिणाम सामाजिक विकासात झाला पाहिजे . आज आम्ही क्रांती करु इच्छितो . त्यासाठी लोकांना आजच्या अवस्थेतून वर उचलावे लागेल . याची जबाबदारी प्रचारकावर आहे . त्याने आपली जबाबदारी नीट सांभाळली पाहिजे .
मित्रहो , जेव्हा आपला समाज पूर्ण रुपाने विकसित होईल तेव्हा सेवकांची- प्रचारकांनी सुद्धा गरज राहणार नाही . सारा समाज सेवक - निवृत्त समाज बनेल . पुढचे युग अशाच प्रकारचे येणार आहे . कोणाचेही कशाने अड़गार नाही . शौचकूप भंगीमुक्त बनतील . आज युद्धावर आमचा केवढातरी मोठा खर्च होतो . समाज प्रगत झाल्याबरोबर या गोष्टी आपोआप कमी होतील . जपान देशाने आपले नागरिक प्रगत केले . तेथे आज अंतर्गत व्यवहारात पोलीसांची आवश्यकता नाही . आजचे प्रचारक मनःपूर्वक काही काळ काम करतील तर
उद्याचा भारतही असाच बनेल . पण त्यासाठी निष्ठापूर्वक प्रयत्नांची , प्रखर तपस्वी प्रचारकांची आवश्यकता आहे . ही शक्ती आपणास सामुदायिक प्रार्थना देऊ शकेल . 
१८ - ८ - ५८
सकाळ