*१०. नव्या समाजाची निर्मिती* 
प्रिय मित्रांनो आणि भगिनींनो,
एका नव्या मानव समाजाच्या प्रस्थापनेसाठी आम्ही क्रांति करू
इच्छितो. तो मानव समाज कोणत्याही जाती-धर्म पक्षाशी संबंधित नसेल
वेगवेगळ्या मानवी- समूहात ऐक्य भावनेची जाणीव रहावी आणि परस्परांच्या
कल्याणात परस्परांचे कल्याण असावे असा या पाठीमागे आमचा ध्येयवाट
आहे.
क्रांतीचा अर्थ दुसऱ्यांवर आक्रमण असा आम्ही करीत नाही. परंतु ।
जगात ज्या गोष्टी ज्या हेतूंनी निर्माण झाल्या आहेत त्याच हेतूने त्यांचा वापर
व्हावा अशी आमची इच्छा आहे. असे करण्यात जुने स्वरुप थोडेसे बदलले
जाईल परंतु असे होणे अपरिहार्य आहे.
आपला भारत एक खंडतुल्य देश आहे. त्याचे सांस्कृतिक रक्षण
करावयाचे असल्यास अनेक गोष्टींची दुरुस्ती करावी लागेल. भूतकाळावर लक्ष
ठेवणारे लोक नेहमी संस्कृतीची प्रतिष्ठा गात असतात. परंतु बाहेरच्या माणसाला
तसे काहीच दर्शन येथे होत नाही. येथील प्राचीन संस्कृति विस्कटलेली आहे.
असा त्याला अनुभव येतो. आज विद्वान आणि धर्माधिकारी यांच्या मनात
आपल्यापेक्षा कनिष्ट जातीसंबंधी चांगल्या भावना नाहीत. प्रत्येकजण खालच्या
जातीला आपल्या सेवेत राबविण्याचा प्रयत्न करतो. ही समाजाची विकृत अवस्था
होय. ती बदलली पाहिजे. जाति, धर्म, संप्रदाय या वस्तू आम्हाला हव्या आहेत. ।
परंतु त्या आधी दुरुस्त करुन घेतल्या पाहिजेत. ही दुरुस्ती म्हणजेच क्रांती.
ही क्रांती शांततामय मार्गाने , त्याग व तपश्चर्येच्या आधाराने आपणास ।
करावयाची आहे.
 *आदर्श समाज चित्र* 

जर आम्ही नवा समाज निर्माण करण्याचे स्वप्न रंगवीत असू जुन्या


सामाजिक संस्थांनी नवे स्वरुप घ्यावे असा प्रयत्न करीत असू, तर त्यासाठी
काही आदर्श आम्हाला निर्माण करावे लागतील. असे नमुने समोर ठेवल्याने
अधिक परिणाम होईल. आजच्या भौतिक संस्कृतीचा माणसावर अधिक परिणाम
होतो याचे कारण प्रत्यक्ष दर्शन हे आहे. आपल्या पूर्वजांनीही समाज
परिवर्तनासाठी हाच आदर्श गिरविला होता. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी
अभंगांच्या जोडीला गौळण, विराण्या आदींची रचना केली. गोस्वामी
तुलसीदासांनी रामलीलेच्या द्वारे रामायणाचे दर्शन लोकांना घडविले आता।
कालांतराने या प्रयत्नांना विकृत स्वरुप आले ही गोष्ट निराळी आजचा
सिनेमासुद्धा अशाच काही तरी चांगल्या उद्देशाने सुरु झाला असला पाहिजे.
परंतु सध्या त्याचा दुरपयोग सुरु आहे. या सर्व गोष्टींचा एकच उद्देश होता
आणि तो म्हणजे लोकांचे कल्याण करणे. परंतु आता त्या प्रयत्नांना वाईट रुप
आलेले आहे. यासाठी दुसरे नविन नमुने समोर ठेवावे लागतील. ज्या प्रकारचा
नवा समाज आपल्याला अभिप्रेत असेल त्या प्रकारचे हे नमुने लागतील लोकांना
पुराणाप्रियतेकडून नवीन आदर्शाकडे नेण्यास यापेक्षा वेगळा मार्ग नाही.
 *नवसमाजासाठी सेवामंडळ* 
आज समाजात अनंत संस्था काम करीत आहेत. त्या सर्वच नवा
मार्ग संशोधित आहेत. सरकारसुद्धा काही नवे मार्ग शोधत आहे. परंतु सारेच
अंधारात चाचपडत आहेत. देशाचे परिवर्तन कसे होईल हा विचार त्यांच्यासमोर
असला तरी त्यांची धाव शक्तीपेक्षा मोठी आहे. परंतु सेवामंडळ तसे करीत
नाही हे त्यांचे भाग्य आहे. आपली शक्ती पाहुन त्याची पावले पडत आहेत.
सेवामंडळ आपल्या शक्तीनुसार पुढे जात असले तरी एका विशिष्ट प्रकारचा
प्रकाश घेऊन पुढे जात आहे.
जनता ज्या संस्थेचा स्विकार करीत असेल तीच संस्था काही काम
करु शकते. सेवामंडळाला हे भाग्य प्राप्त झाले आहे. त्याला जनतेच्या हृदयात


शिरुन काम करावयाचे आहे. विरोधात न शिरता सहकार्याच्या भूमिकेतून जेवढे
करता येईल तेवढे सेवामंडळ समाजासाठी करीत राहील. समाजाची प्रवृत्ती
आणि सेवामंडळाची आकांक्षा यांचा समन्वय साधने हे आपले उद्दिष्ट आहे.
मिशनरी लोकांचे काम आपल्यासमोर आहे. कोणत्याही प्रकारच्या विरोधात,
भांडणात आणि राजकारणात न पडता किती काम होऊ शकते याचे मिशनरी
हे एक उदाहरण आहे. आज आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने काम करु इच्छितो.
ज्या प्रमाणात आपली संघशक्ति बळकट होईल त्या प्रमाणात वातावरण निर्माण
होईल आणि सेवामंडळाला अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन घडून येईल.
 *शिस्त व आज्ञापालन* 
सेवामंडळ जी क्रांती करु इच्छिते ती प्रचारकाच्या द्वारा होणार आहे.
प्रचारक म्हणजे क्रांतीचे अग्रदूत, क्रांतीसाठी प्रचारक आज्ञाधारक आणि
शिस्तप्रिय हवे असतात. अर्थात ही आज्ञा आणि शिस्त कुधा एका व्यक्तीची
नसून सामाजिक शक्तीची असते. ही शक्ती प्रचारकाला ओळखता आली पाहिजे.
आणि अशाप्रकारे एकदा ओळख पटल्यावर आपण घेतलेल्या निर्णयाचे ।
काटेकोरपणे पालन आपल्या हातून झाले पाहिजे.
गुरुदेव ही आपली केंद्रशक्ती आहे. सामाजिक अनुज्ञेत ही शक्ती ।
अंतर्भूत असतेच. म्हणून सामाजिक प्रेरणांची आज्ञा प्रचारक पाळायला शिकला
की श्रीगुरुदेव सेवामंडळाचा तो एकनिष्ठ सेवक आपोआपच होवुन जातो.
सेवामंडळाला अभिप्रेत असलेल्या क्रांतीसाठी अशा एकनिष्ठ शिस्तप्रिय व
आज्ञाधारक सेवकांची आम्हाला मनापासून अपेक्षा आहे.
१९ - ८- ५८
सकाळ