*११. प्रार्थना कशासाठी ?*
प्रचारक मित्रांनो,
या ठिकाणच्या चातुर्मास्य वर्गात भिन्न भिन्न प्रकारचे कार्यक्रम होत
आहेत. लोकांनी ते जवळून बघावे. त्यांचा परिणाम काय होईल याचा अंदाज
घ्यावा. काही शंका असल्यास निरसन करुन घ्याव्या आणि काही प्रेरणा घेऊन
आपल्या गावी असेच कार्यक्रम सुरु करावेत. जेथे सेवामंडळ चालू आहे तेथे
सेवामंडळाचे परिपूर्ण तत्वज्ञान प्रचलित असेलच असे मानता येत नाही. कोणतीही
गोष्ट आमचे आईवडील करीत होते म्हणून किंवा कोणी महात्मा, साधु पुरुष सांगून
गेला म्हणून करणे योग्य नाही. ते अज्ञान आहे. आम्ही कोणताही कार्यक्रम हातात
घेतांना तो जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक स्विकारला पाहिजे.
*मोक्ष प्राप्तीपेक्षा सामाजिक प्रगति अधिक श्रेष्ट*
सामुदायिक प्रार्थनेत मुख्य तत्व सामाजिक विकास हे आहे. तीच
राष्ट्रीयता पुरेपूर भरलेली आहे. ही गोष्ट आमच्या लक्षात असली पाहिजे.जुन्या
पद्धतीची प्रार्थना मोक्ष प्राप्तीसाठी केली जात असे. आत्मोद्धारासाठी केली
जात असे. कालांतराने ती प्रार्थना मंदिरापुरतीच मर्यादित राहिल. पुढे साधुसंतांनी या गोष्टीवर वेगळा प्रकाश टाकला. कोणतीही प्रार्थना करा पण तिचा
तोल सुट देऊ नका. प्रार्थनेत शांतता असावी. सौंदर्य असावे. आत्म्याचे संजीयन
असावे आणि मानवतेची उन्नती असावी. आपल्या ऋषिमुनींचे हेच उद्दिष्ट होते.
समाजात जी गोष्ट कमी असेल तिच्या प्राप्तीसाठी ते प्रार्थना करीत. कधी
अन्नासाठी तर कधी वर्षेसाठी ते प्रार्थना करीत. राष्ट्रोत्थान हा त्यांचा प्रमुख
हेतू होता हे यावरून दिसून येते. सर्वांच्या कल्याणाच्या अशा प्रकारच्या प्रार्थना
त्यांनी हजारो वर्षापूर्वी करून ठेवल्या.
- आज आम्ही कुमार्गाने चाललो आहोत. प्रार्थनेसाठी भंगी, चांभार,
राजा आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरातले लोक एके ठिकाणी बसतांना
कुठेही पाहायला मिळत नाही.जर याच पद्धतीने आम्ही पुढेही प्रार्थना करीत
राहू तर मरून जाऊ आज राजकरणात उड्या घेणारे पंथ - पक्ष अनेक आहेत. परंतु पद - दलितांना वर उचलणारा पंथ भारतात अजून निर्माण व्हायचा आहे एक श्रीगुरूदेव सेवामंडळ मात्र हे काम करू इच्छित आहे . *देशात माणसांची वाण आहे*
ज्या प्रयत्नांनी माझा देश विकास पावतो तीच माझी प्रार्थना असली पाहिजे . श्रमदानसुद्धा एक प्रार्थनाच आहे . शेती , शिक्षण , कला , विज्ञान , या साऱ्या आमच्या प्रार्थना होत . माणसात मानवता निर्माण होण्यासाठी ज्या ज्या । गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या सर्व गोष्टी सेवामंडळाने पुरविल्या पाहिजेत . परंतु अजून आमचे हृदय त्यायोग्य बनलेले नाही . नाहीतर प्रार्थनेत सुद्धा बसण्याची आम्हाला आवश्यकता पडली नसती . असे झाले तर आमचे सारेच कार्यक्रम प्रार्थनामय होऊन जातात . सुरूवातीचे वेडेवाकडे दगड तासून तुसून मंदिरात उपयोगात आणावे लागतात . तसेच हे काम आहे . मानवतेचे मंदिर तयार करण्यासाठी , पुतळे बनविण्याचे हे कार्य आहे . आज देशात माणसे नाहीत
अशी चहूकडे ओरड आहे . वास्तविक चाळीस कोटींच्या या देशात माणसांसाठी हाहा : कार असावा ही केवढी शरमेची गोष्ट ! पण ती वस्तुस्थिती आहे साधूपासून नोकरापर्यंत कुठेही इमानदारीचा मागमूस नाही . इमानदारी नाही . म्हणून माणूस नाही . माणसांत ही इमानदारी निर्माण करणे हे प्रार्थनेचे पहिले काम आहे .
पूर्वी मोठा मानव - समूह पाहिला की मी आनंदाने वेडा होत असे . परंतु जेव्हा कामासाठी माणसांची मोजदाद करू लागलो तेव्हा त्या जमावातून चार दोन माणसेसुद्धा हाताला लागत नसत , आजही लागत नाहीत , भोवती गर्दी गोळा करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ध्येयासाठी आत्मसमर्पण करणार
मंडळी मिळविणे ही वेगळी गोष्ट आहे . गर्दी ढोलक वाजवूनही जमावता येते . परंतु नेक माणूस , प्रामाणिक माणूस , ध्येयवादी माणूस जीवन भरच्या प्रयत्नानंतरही हाती लागणे कठीण होते, जपानमध्ये पाच घरांच्या आड सडका आहेत, तिथे शेकडा नौवद लोक पदविधर आहेत आणि ते सगळे कामात रमुन
जाणारे आहेत . परंतु आमच्या येथे नेमके या उलट दृश्य आहे .
*या देशाचे वैशिष्ट्य धार्मिकता*
आमच्या देशाची एक महान विशेषता आहे आणि ती म्हणजे माणसाच्या कणाकणात मुरलेली धार्मिकता . या ठिकाणी धर्माचे अधिष्ठान स्वीकारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करता येणार नाही . मग ते श्रमदान असो , ग्रामोद्धार असो वा आणखी काही असो .
या भुमीत अनेक संत महात्मे होऊन गेले . त्यांनी धर्माच्याद्वाराच जनजागृती केली . पंढरपूर हे आमच्या धर्मसभेचे व्यासपीठ आहे . तिथले प्राध्यापक ज्ञानेश्वर , एकनाथ , तुकाराम हे आहेत .
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो भूतां परस्परे जडो
मैत्र जीवांचे हे तिथले पाठ्यक्रम आहेत . आणि आम्ही स्वत : ला वारकरी समजणारे लोक त्या विद्यापीठातले विद्यार्थी आहोत .
मित्रहो , जग तुमची प्रतिक्षा करीत आहे . लोक मागासलेले आहेत . माणसे असूनही त्यांना आपल्या माणूसपणाची जाणीव झालेली नाही . तुम्ही त्याच्याजवळ जा . त्यांना उन्नत करण्याची जबाबदारी आपल्या सारख्यांवरच आहे . स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आम्ही भरपूर त्याग केला . आता त्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आणखी त्यागाची आवश्यकता आहे . देव आपल्यात अशी प्रवृत्ती निर्माण करो .
१९ - ८ - ५८
सायंकाळ