*१३. मानवी विकासाची शाळा-प्रार्थना* 

माझ्या प्रार्थनाप्रेमी मित्रांनो,
प्रत्येक वस्तूचे जीवन निसर्गाप्रमाणे जगण्यासाठी आहे. कशासाठी
जगायचे हा प्रश्न प्रत्येकाने सोडवला पाहिजे. पुष्कळ माणसे मरणोत्तर आपली
आठवण शिल्लक रहावी म्हणून जगतात. जे अशाप्रकारे मरण्याची आठवण
ठेवून जीवन जगले त्यांचे जीवन अनंत वर्षानंतरही स्मृतीच्या रुपाने शिल्लक
उरते. आणि जे केवळ जन्माला आले म्हणून जगतात त्यांचे जीवन कीटकांच्या
जीवनाहून भिन्न रहात नाही. जीवन जगण्यासाठी आधी मरणाला जिंकले
पाहिजे. याचा अर्थ आयुष्य वाढविले पाहिजे असा नाही तर त्यामुळे त्याची
आठवण शिल्लक ठरेल असे काम त्याने केले पाहिजे. काही लोक स्वर्गप्राप्तीची इच्छा धरतात परंतु जीवनभर अशुभ कर्मे हातून घडल्यामुळे त्यांना
स्वर्गाची प्राप्ती होऊ शकत नाही. जन्मभर पापे करुन मरतांना मोठे दान केले
की माणूस स्वर्गात जातो असा एक समज आहे. पण तो अत्यंत चुकीचा आहे.
दानाने काही काळापुरती त्याची कीर्ती अवश्य होत असेल पण समाज अशा
कीर्तीपेक्षा कर्तव्याची आठवण अधिक ठेवतो. म्हणून आपण समाजाला
आवडतील, त्याचा विकास करतील अशीच कामे केली पाहिजेत. याचेच दुसरे
नाव धर्म आहे.
 *अविरोध - वृत्तीने जगण्यासाठी धर्म* 
धर्म हा समाजाच्या धारणेकरिता आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाच्या
आड येऊ नये. एका माणसाने दुसऱ्या माणसाचे शोषण करु नये, सर्वांनी
सहकार्याने व अविरोध वृत्तीने जगावे, याचेच नाव धर्म. धर्म म्हणजे सामाजिक
नियमांचे पालन. आम्ही जगू तुम्हीही जगा या वृत्तीचे नाव धर्म, समाज आणि
व्यक्ती यांचे जीवन परस्परावर अवलंबून आहे. व्यक्तीमुळे समाज बनतो.
समाजाच्या सुव्यवस्थेमुळे व्यक्तीला आकार येतो. आपली ही प्रार्थनाच पहा.

ती अव्यवस्थित बसून केली तरीसुद्धा पार पडेल . पण रांगेत आणि शिस्त बसल्याने एकाचा दुसऱ्याला त्रास होत नाही . उलट त्या प्रार्थनचे सौंदर्य वाढते शांतता लाभते . मनाची एकाता साधण्यास होते . अशीच पद्धत प्रत्येक कामाला असली पाहिजे . अशा प्रकारच्या रचनेला धर्मात महत्वाचे स्थान आहे . परंतु आज धर्माच्या नावाखाली आपण काय पाहतो ? राम आणि कृष्ण ही वास्तविक एकाच देवाची दोन रुपे पण त्यांच्या सांप्रदायिकांची खूप भांडणे आहेत . राम श्रेष्ठ की कृष्ण श्रेष्ठ यावर वर्षेच्यावर्षे वाद चालतात . परस्परांच्या उखाळया पाखाळ्या काढतात आणि मारामाऱ्या करण्यापर्यंत त्यांची मजल जाते . हे प्रकार पाहिले म्हणजे समाज , धर्म आणि पंथ या सर्वांत किती भयानक विरोध आहे हे आपल्या लक्षात येते .
 *प्रार्थनेतून सामाजिक दृष्टि विकसित झाली पाहजे* 

एकदा दिल्ली येथील मशिदीत प्रार्थनेसाठी जाण्याचा योग आला . तेथे एक माणूस नमाजासाठी आला . तो तेथे होणाऱ्या समारंभाचा अध्यक्ष होता . पण नमाजासाठी येण्यास त्याला उशीर लागला . लोकांनी पुढची जागा भरुन गेली होती . अखेर ती जोडे ठेवण्याची जागा होती तेथे बसला व प्रसन्नतेने आपली प्रार्थना करु लागला . या घटनेपासून प्रत्येकाने धडा घेतला पाहिजे . प्रत्येक धर्मात अशा चांगल्या गोष्टी सापडतात . काही चुकीच्या गोष्टीही असतात . आपण कोठूनही चांगला गुण घेतला पाहिजे . कसेतरी खावे - प्यावे , कशीतरी प्रार्थना करावी ही खरी जीवनपद्धति नव्हे . प्रार्थनेत सामाजिक जीवनाचे आदर्श दिसले पाहिजेत . आमच्या प्रार्थनेत कोणाला देव दिसला नाही तरी शिस्त दिसली पाहिजे . भेदभावाला येथे स्थान नसले पाहिजे . गांभीर्य , शांतता आणि प्रसन्नता यांचे विशाल दर्शन येथे घडले पाहिजे . सामाजिक दृष्टी येथे
मिळावी पाहिजे . माणसाने समाजात कसे वावरावे एवढे शिक्षण या प्रार्थनेतून मिळाले तरी प्रार्थनेचा हेतु सफल झाला असे होईल.

*सामाजिक उणीवांची पूर्ती प्रार्थनेतून व्हावी* 

विश्वातली ही पंचतत्व , त्रिगुणात्मक शक्ती कोट्यावधि जीवजंतू निर्मान करुन त्या सर्वांशी एकरुप झालेली आहे . माझे शरीर अनेक पेशीचे बनलेले आहे . तरीसुद्धा त्यात एकत्व आहे . गावात हजारो घरे बसलेली असली तरी
यात एकता असतेच . कोणत्याही गावाचे नाव त्या गावातील वस्तूंच्या , समहाला मिळालेले असते . एका घराला , एका रस्त्याला किंवा मंदिराला ते मिळालेले असते . अशा समूहाच्या एकतेतून समाजजीवन बनत असते . या समाजाला सुव्यवस्थेचे दर्शन ज्या ज्या गोष्टीतून होईल त्या साऱ्या प्रार्थना होत . दुकानदार प्रामाणिकपणे व्यवहार करुन स्वत : चे पोट भरील तर त्याचा व्यवहार ही एक प्रार्थना होईल . शेतकरी स्वत : च्या पोटासाठी राबविण्याची भावना बदलून देशाची कल्पना समोर ठेवील तर त्याच्या कर्माला प्रार्थनेचे रुप येईल . मित्रांनो , केवळ जगायचे म्हणून जगू नका . समाजाची सेवा करीत मरणानंतरही आपली आठवण राहील असे कार्य करीत जीवन जगा . तुमचे ते जगणे प्रार्थनामय होईल . त्यामुळे समाज - जीवन सुधारेल . आपला देश आणि आपली संस्कृति जिवंत राहील , प्रार्थनेचे असे विशाल स्वरुप आहे . सामाजिक उणीवांची पूर्ति याच प्रार्थनेतून होणार आहे . . २० - ८ - ५८
 सायंकाळ