*१४. आजची सदोष शिक्षणपद्धती* 

मित्रांनो,
काहीतरी नवीन गोष्ट नित्य आपल्या जीवनात याव्या अशी मानसाची
इच्छा आहे. ही एक उत्तम इच्छा आहे. परंतु आपण जे ऐकू जे पाहू ते जीवनात
मुरेल अशीही माणसाची इच्छा असली पाहिजे. त्याच बरोबर तशा पद्धतीचा
अभ्यास असला पाहिजे. शिक्षण घोकून घोकून घ्यायचे अशी एक पद्धत आहे.
परंतु या पद्धतीचे चांगले परिणाम हाताशी आले नाहीत. प्रधारकांनी ही गोष्ट
लक्षात घेवून, त्याचा अंमल करायला शिकले पाहिजे.
 *आजचे शिक्षण अनुत्पादक* 
जपानसारख्या देशात शिक्षणाचा भार पालकावर पडत नाही तेथे विद्यार्थी
उत्पादनाच्या जोरावर पुढे सरकतो. आपल्या शाळा खर्चाच्या बाबी बनल्या
आहेत. विद्यार्थ्यांचा सारा आर्थिक भार पालकावर येतो. पुढे मात्र पालकाला
त्याची काहीच मदत होत नाही. याचे कारण आजचे आपले शिक्षण उत्पादका
नसून अनुत्पादक बनले हे आहे. म. गांधीनी जीवन .शिक्षणाची जी पद्धति
काढली तीत मुलांचे शिक्षण खोदकामापासून सुरु होते. हे येथे सांगण्याचे
कारण असे की आमचे शिक्षण नुसते पुस्तकी असता कामा नये आज शिकणारा
माणूस फक्त शिकतच जातो. काम करण्याची त्याला सवयच राहत नाही.
 *जेव्हाचे काम तेव्हा व्हावे* 

जीवनात दुसरीही एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. रोजचे काम
रोज झाले पाहिजे. जे काम ज्यावेळी होणे आवश्यक असते. त्याच वेळी झाले
पाहिजे. ही सवय फार चांगली आहे. आपली दिनचर्या लिहण्याची सवय प्रत्येक
प्रचारकाला असली पाहिजे. प्रचारकाजवळ ज्ञान पाहिजे. तसेच त्या ज्ञानाचा
उपयोग करण्याची हौस पाहिजे. नाहीतर *घोडे काय थोडे वागविते ओझे?


अशी त्याची अवस्था होईल. प्रचारक जर नुसता ज्ञानाचा भारवाहक बनेल तर
तो समाजासाठी व स्वत:साठी काहीच करु शकणार नाही.
या वर्गात केवळ बौद्धिक शिक्षणच असू नये. चांगल्या गोष्टी जीवनात
उतरविण्याचेही शिक्षण असावे. असे करण्यात येणा-या अडचणीचे निराकरणही
येथे झाले पाहिजे. सवयीने शरीराला संयम येतो. जर आम्ही ग्रामगीता
वाचण्याचा सप्ताह साजरा करणार असू तर त्याप्रमाणे गाव दुरुस्त करण्याचा
सप्ताहही आम्ही साजरा केला पाहिजे. चांगल्या सवयीचे व्रत घेणे हाच खरा
महान सप्ताह होय. आमच्या शक्तीची लहान लहान गोष्टीत जी विषम विभागणी
झाली आहे ती गोष्ट चांगली नाही आपली शक्ती चांगल्या कामी केंद्रित झाली
पाहिजे.
 *जीवनात साधेपणा असावा* 
प्रचारकाच्या जीवनात साधेपणा असला पाहिजे. आज आपल्या
देशात असे कोट्यावधि लोक आहेत की ज्यांना अन्न व कापड मिळत नाही.
जर आम्ही आमच्या साध्या राहणीमुळे काही वस्तू वाचवू तर त्यांचा उपयोग
गरजू माणसे करु शकतील. प्रचारकाचे जीवन त्या दृष्टीने आदर्श असले पाहिजे.
आपली पूजापद्धतिही बिघडून गेली आहे. आज पाया पडण्यात
आपण खरी पूजा समजतो. परंतु ही चुकीची गोष्ट आहे. खरी पूजा गुरु सांगेल
तसे वागण्याने होत असते. गुरुची पूजा त्यावर गंध-अक्षता उधळून होत ।
नसते. माळा घालून होत नसते. तर त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने जाण्यात ।
ती पूजा असते हा रस्ता आपण धरला पाहिजे. आज आपण सारे विद्यार्थी
अवस्थेत आहोत. हा आचरणाचा पाठ जेव्हा आम्ही आत्मसात करु तेव्हाच
आमचे जीवन उन्नत होईल. आणि आजची सदोष शिक्षणपद्धति बदलून टाकता
येईल.
२१ - ८-५८
सकाळ