*१८. सृष्टीची चतुर्विधता* 

प्रिय उपासकांनो आणि बंधुभगिनींनो,

सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम हा जीवनातील आहार-विहारादी
सर्व पैलूंना उजाळा देणारा कार्यक्रम आहे. शरीराला अन्नाची खुराक लागते.
त्यानंतर शरीराच्या प्रत्येक पेशीला समाधान लाभते. स्वच्छ कपड्यांमुळे मन
संतुष्ट होते. परंतु या प्रार्थनेमुळे शरीराचा कणनकण पुलकीत होतो. शांत
होतो. अन्नाप्रमाणेच हा जीवनप्रवाह जर प्रार्थनेद्वारे सतत मिळत राहिला तर
आपल्या आनंदाला पारावार राहणार नाही. यामुळेच आपल्या मूळ स्वरूपाचेही
आपणास दर्शन घडते. मुळात आम्ही सर्व एक आहोत. अनेक रूपे घेऊनही
एकच आहोत. याचे सूत्र आम्ही आत्मदर्शनात पाहू शकतो. शरीरात अनंत
जीवंत पेशी असून ते शरीर जसे एक आहे तसा हा मानवी समाज अवाढव्य
असलातरी त्यात परस्परांचा घनिष्ट संबंध आहे. सामाजिक जीवनाबद्दल आम्ही
जी जी भावना करतो तिचा या समाजाशी संबंध असतो. प्रत्येक शब्दाचा वायु
मंडळाशी संबंध असतो.यामुळे आम्ही वातावरणातील सृष्टीलाही समाधान
देऊ शकतो.
 *चार सृष्टींची रचना* 

ही सृष्टी दिसायला एकच असली तरी यात चार सृष्टी वास करतात.
जीवसृष्टी, ईशसृष्टी, परसृष्टी, आणि परात्परसृष्टी या त्या चार सृष्टी होत.
जीवसृष्टीचा माणूस भिन्नभिन्न नात्याने वावरतो. तो कोणाचा बाप, कोणाचा
मुलगा, कोणाचा पति तर कोणाचा गुरूशिष्य अशा अनेक नात्यांनी संबंधित
राहतो. अशी भिन्न भिन्न नाती निर्माण करून त्याच्या सुखदुःखाला अनुभवतो.
या सृष्टीला जीवसृष्टी म्हणतात. जे लोक नाते-संबंध आणि याचबरोबर प्राप्त
होणारी सुखदु:खे यांनी जखडलेले असतात. ते या सृष्टीत येतात.
दुसरी ईशसुष्टी काही लोक या संबंधाच्या पलिकडे असतात.ते


*फक्त प्रकती व पुरूष हे दोनच विभाग जाणतात. या सृष्टीतील जीव नाती
*ओळखत नाहीत धर्म, जात, पंथ, यांची बंधने त्यांना नसतात, व याच वृत्तीतून
त्यांचे सर्व व्यवहार चालतात.
तिसरी सृष्टी परसृष्टी, यात प्रकृती व पुरूष हाही भेद लुप्त होतो,
सृष्टीतील पुरूष, स्त्री इत्यादी सर्वाना जीव या एकाच भावनेने ओळखणारे जे
लोक ते या सृष्टित येतात. आणि चौथी परात्पर सृष्टी हे सारे जीव अभेट
रूपाने माझीच रूप आहेत असे मानणारे जे लोक ते या सृष्टीत येतात. कोणीत
माझ्याहून भिन्न नाहीत, मीच सर्वत्र भरलेला आहे. असे मानणारांची ही सर्व
आहे.
 
*हे विश्वची माझे घर
ऐसि मति जयाची स्थिर
किंबहुना चराचर
आपणचि जाहला*

अशी विशाल भावना ज्यांची झाली ते त्या सृष्टीचे लोक समजावे या
चार सृष्टीची माणसे चार त-हेचे व्यवहार करतात, आम्ही जगातील सर्व लोक
आमच्या योग्यतेप्रमाणे त्या त्या सृष्टीचे घटक आहोत.

 *सर्व सृष्टींचा संबंध प्रार्थनेद्वारे* 

आपली सामुदायिक प्रार्थना या चारही सृष्टींशी संबंध जोडते. नात्यांनी
आम्ही भिन्न आहोत पण व्यवहार दृष्टीने आम्ही सामुदायिक आहोत. आत्म्याच्या
रूपाने आम्ही एका परम आत्म्याचे रूप आहोत. आम्ही भिन्न त-हेने वागतो.
पण एकाच समाजाचे घटक या नात्याने आम्ही सामुदायिक आहोत. महात्मा
आपले रूप यात पाहतो. तो आपले विश्व-कुटंब मानतो. गृहस्थ आपले एक
लहानसेच कुटुंब समजतो. मंडळाचा सेवक आपल्या पूर्ण मंडळाशी तादात्म्य
पावतो. अशा त-हेने जरी आम्ही भिन्न असलो तरी आमचा संबंध सर्वाशी येतो. मला जीवनात, अन्न, वस्त्र, जोडा,घर मोटार, घड्याळ इत्यादी असंख्य वस्तु


लागतात. या वस्तूंच्या व्दारे माझा संबंध त्या तयार करणारांशी येतो. मग माझे
जीवन जर एवढ्या सर्व लोकांवर अवलंबून आहे तर त्या सर्वांशी जुळवून घेण्यासाठी
मला प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय मी समाजाचा घटक होऊ शकणार नाही
व या वस्तू उपभोगण्याचाही मला हक्क पोचणार नाही. माझ्या अंगभूत कलांनीही
मी भोवतीच्या समाजाशी एकरुप होत असतो. मजजवळ जी कला असेल ती मी
समाजाला दिली पाहिजे. याप्रमाणे जेव्हा व्यक्तीचे व्यक्तित्व समाजात विलीन होते
तेव्हा तो समजाचा खरा नागरिक समाजला जातो. आपली उपजीविका दुसऱ्या
लोकांच्या श्रमावर होत असल्याने आपल्यावर जे समाजाचे कर्ज होते ते फेडणे,
त्याचप्रमाणे समाजातील न्यूनता भरुन काढणे हे आपले ध्येय असले पाहिजे
आणि अशी सामुदायिकता जोडण्याकरिताच प्रार्थना आहे. *तुका म्हणे आता।
उरलो उपकारापुरता* अशी वृत्ती झाली म्हणून याप्रमाणे आपले व्यक्तित्व समाजात
विलीन करण्याचे शिक्षण घेण्याची ही शाळा आहे.
 *प्रार्थना ही जीवनात उतरावी* 

मित्रांनो, प्रार्थना ही केवळ कलाच राह नये, जीवन व कला हे दोन
भिन्न विषय आहेत. भाषणाची कला शिकलात तर तुम्ही पंडित व्हाल. पण
त्यामुळे तुम्ही जीवनापासून दूर जाऊ लागाल. शास्त्र जीवनात उतरले नाही
तर व्यर्थ होईल. एकंदरीत मनुष्याच्या प्रवृत्तीत तो जी गोष्ट शिकतो ती आचरणात
उतरविण्याची वृत्ती असली पाहिजे. पुस्तकी ज्ञान, चर्चाच कामाच्या नाहीत.
शुद्ध, सात्विक भावनांचे संस्कार मनावर झाले पाहिजेत. पुढे पुढे सात्विक
प्रभाव वाढत गेला पाहिजे. आणि त्याचा समाजावर परिणाम झाला पाहिजे.
म्हणून ही सामुदायिक प्रार्थना-सर्व सृष्टीकरिता, प्रचारकाकरिता,
व्यवहारिकाकरिता, महात्म्यांकरिता राजमार्गासारखी आहे.

सायं. प्रार्थना
३० - ८-५८