*१९. प्रचारक हा जीवनाचा मार्गदर्शक होय*
बंधू आणि भगिनींनो,
रोजचे बौध्दिक हे प्रचारकांचे भांडवल आहे. त्याची तारीखता
ठेवली पाहिजे. आणि जेव्हा अहवाल सादर कराल तेव्हा कोणत्या तारखेला
कोणती गोष्ट सांगितली हे सांगता आले पाहिजे. हे सारे भांडवल व्यवस्थित
जवळ राहील तर माणूस नेहमी सावध राहील. नित्यरुप असलेल्या या जीवनात
प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकण्याची त्याला सवय लागेल. लिहून घेतलेली
बौद्धिके जपून ठेवा. ती तुमच्यानंतर दुसऱ्यांच्या कामी येतील. माणूस हा
यांत्रिक आहे. तो ज्या रस्त्याने जाईल. त्या रस्त्यावरुन त्याच्यामागून जाणारे
पाहिल्याचा अनुभव घेत असतात. हा समाजजागृतीचा उत्तम प्रकार होय.
अशा शुद्ध साधनांना नेहमी उत्तम प्रकारे हाताळले पाहिजे.
तुम्ही केवळ मी सांगतो तेवढ्याच गोष्टींचे अध्ययन करु नये.
ज्याच्याद्वारे मानवतेचे उत्थान घडून आले त्या सर्व महापुरुषांच्या वाणीचे
आपण अध्ययन करावे. सामान्य माणूस वेद, उपनिषदे इत्यादी ग्रंथांतील
गोष्टीची संगति लावू शकणार नाही. परंतु महापुरुष अध्ययन आणि अनुभव
यांच्याद्वारा जगातील ज्ञानाचा सारांश काढून आपल्या समोर ठेवीत असतात.
समयोचित गोष्ट सांगत असतात. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट जशीच्या तशी आपल्या
कामी पडू शकणार नाही. कधीकधी एका विशिष्ट युगाचे तत्वज्ञान आज उपयोगी*येऊ शकणार नाही. आजच्या गोष्टी अजून काही वर्ष चालतील. परंतु संतांच्या
*निर्णय जगाच्या अंतापर्यंत चालत राहील. त्यांची वाणी कधीच बदलत नाही,
*कारण जग ज्या आधारावर चालते त्या आधारावर संत चालत असतात. एक
युग असे होते की तेव्हा लंगोटी लावली जात होती. त्यानंतर पगडी, टोपी
येऊन आज उघड्या बोडक्याचा जमाना आला आहे. याप्रमाणे बाह्य साधने
बदलत असतात, परंतु खोटे बोलणारा, व्यभिचारी, विश्वासघातकी माणूस
चांगला आहे असे सांगणारा संत कधीच निपजू शकत नाही.
*जनतेचा हृदयात प्रवेशण्याचे साधन : भजन*
जो आपल्या धुंदीत येऊन हृदयातील वाणीने सुंदर गायन करतो
तोच लोकांवर परिणाम करू शकतो. प्रचारकाला ही कला आवश्यक आहे.
तिच्याद्वारा आपल्या कामांत ते खूप प्रगति करू शकतात. जर त्यांना ही कला
अवगत नसेल तर त्यांनी खेड्यातील भजन गाणारी दोन मुले सोबत घ्यावी.
त्यांच्याशी मैत्री जोडावी. जमू शकले तर त्यांना संगीत शाळेत पाठवावे. आणि
प्रचार कार्यात त्यांचे सहकार्य घ्यावे.
भजन गाणारे बहुधा गरीब असतात. जर त्यांची पोटाची चिंता तुम्ही
पुरी केली तर ते तुमचे होतील परंतु खेडूत लोकांना व्यसने असतात. व्यसने
नसतील तर राग आणि गर्व तरी असतो. याचे कारण असे की जेव्हा माणसाला
लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळते तेव्हा ती पचविणे कठीण होते. पुष्कळदा
प्रतिष्ठेमुळे माणसाचा अहंकार वाढीला लागतो...
नवल अहंकाराची गोठी
विशेष लागे ज्ञानियापाठी
हा श्लोक लक्षात घेऊन मुलांना सांभाळावे. अहंकारापासून त्यांना
दूर ठेवावे. आणि सात्विक जीवनाबद्दल आवड निर्माण करून त्यांचेकडून काम
करून घ्यावे.
*भक्ती आणि राष्ट्रीयता*
भारतात भक्तिबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे. परंतु भजनपूजन
समाजातून जाण्यासाठीसुद्धा शेदोनशे वर्षे लागतील. परंतु तेव्हासुद्धा राहील
राष्ट्रीयरूप. सेवामंडळाने भजनात एकदम क्रांती करून टाकली आहे. वीस
वर्षापूर्वी आम्ही पुढरपुरांत,