*२०. माणसापासून देवापर्यंत*
प्रार्थनाप्रेमी उपासकांनो,
हा सामुदायिक प्रार्थनेचा धर्म व्यक्तिधर्मापासून समाजधर्मापर्यंत
समाजधर्मापासून राष्ट्रधर्म व विश्वधर्मापर्यंत आणि त्या पलिकडेही
परमेश्रापर्यंत नेण्याचा राजमार्ग आहे. सामुदायिक प्रार्थनेच्या प्रत्येक घटकाला
परमेश्वरापर्यंत कसे जावयाचे याचे ज्ञान येथे प्राप्त करावयाचे आहे. निसर्गाची
प्रक्रिया हा एक आवाज आहे. आणि हा आवाज ज्याने समाजधर्म राष्ट्रधर्म
आणि विश्वधर्म पुर्णपणे जाणला आहे त्यांच्या कानात गुणगुणत राहतो. हा
आवाज त्याला भोवतालच्या प्रत्येक वस्तूतून ऐकू येतो ही साधना प्रत्येकाला
आपल्या हृदयात निर्माण करता येते. ज्या काळात विमाने वगैरे साधने
नव्हती त्या काळातही ऋषींनी बसल्या जागेवरून, गिरिकंदरात राहून कोणत्या
वस्तू कोठे आहेत ते शोधले. ग्रहणाचे आराखडे बांधले. गणिताची सूत्रे शोधली.
आकाश तारे यांच्या जागा निश्चित केल्या. आकाश पाताळ यांचा शोध
घेतला यांचा अर्थ असा की या सर्व ज्ञानाचे मूळ त्यांच्या हृदयात होते. या
सर्व प्रक्रिया निसर्गातील पंचतत्वे रजत मसत्वादी त्रिगुण व अष्टधा प्रकृति या
सर्वांच्या द्वारे घडत असतात.
*अनुभव आचरणसिध्द मार्गानेच येतो*
व्यक्तीला व्यक्तिधर्मापासून समाजधर्म, राष्ट्रधर्म व नंतर ईशधर्म
पायरीपायरीने कळत गेला पाहिजे. जोपर्यंत व्यक्तिधर्म नीट साधत नाही
तोपर्यंत समाजधर्माकडे जाता येणार नाही. आणि समाजधर्म, राष्ट्रधर्म कळणार
नाही तोपर्यंत विश्वधर्म म्हणजे काय हे उमगणार नाही. ईशधर्म तर त्याही
पलिकडचा आहे. एखाद्याने ईश्वराची चर्चा केली तरी या सर्व मार्गातून तो
अनुभवाने गेला नाही तर त्याला ईश्वराचा पत्ता लागणार नाही व त्याच्या
साक्षात्काराचे सुखही अनुभवता येणार नाही.
बोलाचीच कढी
बोलाचाची भात
जेवोनिया तृप्त
कोण झाला?
हे जर खरे तसेच परब्रह्याची चर्चा करण्याचा जरी नाद असला तरी त्याच्या मीलनाचा आनंद व त्या स्थितीचा आस्वाद त्याला घेता येणार नाही. त्यासाठी हा मार्ग अनुभवाने अनुसरला पाहीजे . असा व्यक्तीपासून समाजापर्यंत आणि समाजापासून परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग या प्रार्थनेमुळे कळू शकतो .
*चित्त विश्वाकार होईपर्यंत साधना हवी*
_ _ _ मित्रांनो , आपला संसार नीट साधता आला की मग समाजाचा , राष्ट्राचा , विश्वाचा संसार करायला शिकले पाहिजे . आपल्याच संसारात गुरफटण्याने आत्म्याचा विकास होणार नाही . तुम्हा जाणत्या लोकावर फार मोठी जबाबदारी आहे . अशी ही विश्वाचा संसार सांभाळण्यापर्यंतची मजल तुम्हाला मारावयाची असल्यामुळे विश्रांती न घेता पुढे चालत राहिले पाहिजे . भजन , पोथी , प्रार्थना ही प्राथमिक पायरी होय . संताचे मार्गदर्शन घ्या . देशाचे नाव घ्या . पण ज्या आत्मबोधरूप गुरूची तुम्ही पूजा करता त्या गुरूत्वापर्यंत तुम्हाला पोचायचे आहे . त्याशिवाय या साधनेची पूर्णता होणार नाही . देवाची पूजा केली , तीर्थयात्रा केली की संपले सारे हे ढोंग आहे . बद्रिनारायणाला गेल्याने जन्ममरणाची आणि दारिद्रयाची चिंता मिटली असती तर कितीतरी । लोकांचे कल्याण झाले असते . परंतु तसे होत नसते . गंगेत वावरणारे
खेकडे मासे कधी उध्दरतात का ? अशी कल्पना करणेच चुक आहे . काशीच जे महात्म्य आहे ते एकेकाळी ज्ञानदानाचे केंद्र होते म्हणून . त्यावेळी तेथे त्यागी , संन्यासी , विद्वान राहत . ते आल्या गेल्याला आत्मज्ञानाचा मार्ग सांगत . या सर्वाचा उपयोग माणसाचे मन विशाल होण्याकडे होत असतो ज्याचे व्यक्तित्व समाजाची काळजी वाहण्याइतके विशाल झाले तो समाजधर्मास योग्य झाला
असे समजावे . ज्याच्या चित्तात राष्ट्राचा संसार चालविण्याची पात्रता आली त्याला राष्ट्रधर्म कळला . अशी ही पायरी आहे . विश्वाकार होईपर्यंत मानसिक तयारी करायला पाहिजे , असा प्रयत्न याच मनुष्य जन्मात शक्य आहे .
*चित्तशुध्दीचे कार्य प्रार्थनेव्दारा*
यासाठी सामुदायिक प्रार्थनेत चित्त शुध्द करायला शिकले पाहिजे .
चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती
व्याघ्रही न खाती सर्प तया*
अशा शुद्धचिताचा महिमा आहे . केवळ बाह्य देखाव्यावरून चित्ताची शुध्द अशुध्दता कळत नाही . कपडे पांढरे असतील पण त्या आत मलीन अंत : करण असू शकेल . तर एखादा घोंगडी धारण करणारा बाबा कमलीवाला पुरूष आणि गाडगे महाराजांसारखा अंगावर चिंध्या पांघरलेला संत शुद्ध चिताचा राहू शकेल , या वेषामुळे बाबा कमालीवाल्यांना एकदा कलकत्त्यात तीर्थयात्रेसाठी एक पैसाही मिळाला नाही . पण जेव्हा त्यांनी घोंगडीवर बसून गंगासागर पार करण्याची आश्चर्यकारक गोष्ट केली तेव्हा रूपयांचे ढीग पडले . तात्पर्य असे की चित्त शुध्द असलेला मनुष्य शुत्रूवरही प्रेम करु शकतो . तो शत्रुला म्हणेल . * पण तू वाईट नाहीस . तुझे मन वाईट आहे . असा मनुष्य ईशधर्मापर्यत आपली प्रगति करू शकतो . * असे चित्तशुध्दीचे प्रार्थना एक स्थान आहे .
सायं . प्रार्थना
३१ - ८ - ५८