*२१ . संघटनेची स्थापना आणि विस्तार*
प्रिय उपासकांनो ,
आपले संघटन शक्तिशालीl कसे होईल ? वटवृक्षासारखे विशाल रूप ते धारण करील ? इतकेच नव्हे तर ते देशव्यापी आणि विश्वव्यापी कसे बनेल ? कोणतेही संघटन विकृत केव्हा होते ? प्रगति कां करते ? अडचणी कोणत्या असतात ? हे सारे विचार करण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत . हे कार्य पोथीच्या पाठासारखे न होवो . या सर्व बाबीवर मनन सुध्दा व्हावे .
मनुष्य स्वभाव असा आहे की तो आपल्या इच्छापूर्तीसाठी जवळ माणसे बाळगतो . यासाठी तो स्त्री , पुत्र , मित्र आणि नोकर जनवतो . कुटुंब निर्माण करतो . जातिसंघटना , समाजस्थापना इत्यादी तयार करतो जो माणूस आपल्या इच्छापूर्तीसाठी दुसऱ्याचा उपयोग करून घेतो . त्यांच्यावर दुसऱ्याच्याही इच्छेचा प्रभाव पडत असतो . उदा . एखादा पुरूष जेव्हा उपभोगाच्या भावनेने स्त्रीला जवळ करतो तेव्हा ती स्वीही आपल्या दागिने कपडे आदींची इच्छा त्याच्याजवळ व्यक्त करीत असते आणि अशाप्रकारे त्या दोघांच्या इच्छा - मुतीतून त्यांचे संघटन निर्माण होत असते . हीच गोष्ट नोकर , मुलगा यांनाही लागू होते . त्यांची जशी इच्छा तशा माणसांची त्यांच्याभोवती गर्दी होत असते .
संघटन इच्छापूर्तीतून निर्माण होते हे खरे असले तरीसुध्दा इच्छा फळाच्या अपेक्षोतून निर्माण होत असते . समाजाच्या प्रगतीचे फळ संप्रदायाचे असते . ती प्रगति कोणत्या पध्दतीने करणे आहे . सेवेची कोणती भावना अवलंबिणे आहे यावर संघटनेचा उद्देश अवलंबून असतो . जगात अनेक संघटना आहेत . त्यात धार्मिक संघटना मानव - जातीच्या प्रगतीसाठी असतात . मानवी संस्कारातल्या उणीवा दूर करण्यासाठी असतात . ती संघटना निर्माण करणाऱ्या पुरुषाच्या सामर्थ्यावर तिची शक्ती अवलंबून असते .
संघटन सुध्दा एकदम उभे राहू शकत नाही. लोक एकदा त्या संघटनेचे उद्देश आत्मसात करू शकत नाहीत . सुरुवातीला तर थठ्ठाच सुरू होते . कामात अडचणी उभ्या होतात . परंतु इतके होऊनही जर दो पुरुष आपल्या विचारांवर अटळ राहिला तर त्याची संघटना प्रगति करीतच राहते . हळूहळू विरोधकांना त्याचे म्हणणे पटत जाते आणि संघटनेचे पाऊल पुढे पडते . तात्पर्य असे की संघटनेचा संकल्प जेवढा उदात्त असेल तेवढया प्रमाणात ती संघटना पुढे जात असते . *संघटनेला समाजात स्थान असावे*
संघटनेची स्थापना करण्यात दुसरी एक गोष्ट असते . ती म्हणजे तिची समाजाला गरज असली पाहिजे . आजपर्यंत अनेक नवे धर्म आणि रांप्रदाय आले व त्यांनी क्रांती केली . कारण त्यांना समाजाने मान्यता दिली होती . एखादा संप्रदाय जेव्हा सरळ मार्गाने जातो तेव्हा त्याचे समाजामधील स्थान टिकून रहात असते परंतु आजपर्यत संप्रदायाचा इतिहास असा आहे की त्याचा निर्माता निघुन गेल्याबरोबर त्या संप्रदायात भोगप्रवृत्ति वाढू लागते आणि त्याचे अस्तित्व धोक्यात येते . तो नष्ट होतो आणि अशा प्रकारे एकाएकी संप्रदाय जेव्हा पतन पाचतो तेव्हा त्याच्या जागी दुसरा संप्रदाय उभा राहतो . संप्रदायात जेव्हा वाईट गोष्टी फैलावतात तेव्हा तो संप्रदाय स्वतःहून मरण्याची तयारी करीत असतो . भारतीय महायुध्दात अर्जुन आपल्या भावंडांना मारण्यासाठी कचरत होता तेव्हा भगवान म्हणाले होते , अर्जुना , तू यांना मारणारा कोण आहेस ? हे आपल्या वाईट कर्मामुळे आधीच मेलेले आहेत . आता त्यांना माकडासारखे तोडणे एवढेच तुमच्यासाठी शिल्लक आहे.*
संघटनेत भोगवृत्ती नको
आजपर्यंत जेवढे म्हणून संप्रदाय झालेले आहेत . त्यांचा इतिहास असाच आहे बुध्दाचा संप्रदाय अतिशय विशाल होता . परंतु बुध्दानंतर भिक्षुकात अनाचार माजला . ते दृश्य पाहून जनतेत खळबळ उडाली . मग शंकराचार्य
निर्माण झाले . ते म्हणाले , उपभोगाची प्रवृत्ति मानवाचे कल्याण करू शकत नाही . तिचा त्याग केला पाहिजे . *
त्यांनी ब्रह्म सत्य जगन्मिथ्या * असा उपदेश केला . भोगप्रवृत्ति वाढल्यामुळे * जगन्मिथ्या * चा उपदेश त्यांना करावा लागला . या संप्रदायात तरूण , म्हातारे , चोर , डाकू हे सारे संन्यासाचे अधिकारी बनले आणि त्यांच्यामध्ये संयमाचा अभाव निर्माण झाला . आणि संप्रदायात शिथिलता वाढत गेली . यातून पुढे ज्ञानेश्वर महाराजांचा भागवत धर्म पुढे आला . तुकाराम महाराजांनी भागवतधर्मियांना सांगितले ,
*नका त्यजू रांडापोरे
बांधा सोपे , माझ्याघरे *
आज या भागवतधर्मी वारकरी संप्रदायातसुध्दा शिथिलता आलेली असून श्रीगुरू देव सेवामंडळाला ही जागा प्राप्त झाली आहे .
मित्रहो , देशात एवढे विद्वान , संस्कृत जाणणारे आणि वेदशास्त्र चर्चा करणारे आहेत की सामान्य माणसाला त्यांच्या बडबडीचा अर्थच कळत नाही . नुसती पोथ्या - पुराणे वाचण्याचाही हा काळ राहिला नाही . आज काम करणारांची आवश्कता आहे . देशात अज्ञान , उद्योगहीनता वाढीला लागली आहे . जुने मठ , मंदिरे आणि संप्रदाय याचे महात्म्य संपुष्टात आले आहे .
*सेवामंडळाला जीर्णोद्धार करणे आहे*
सेवामंडळ जुन्या परंपरा आणि पद्धति मोडू इच्छत नाही . त्यातले खरे वैशिष्टय समोर आणू इच्छिते . आम्हाला मंदिर पाहिजे पण ते गावाला आदर्श बनविण्याचे केंद्र असावे . तिथे शिस्त असावी . लग्नपध्दति हवी पण हुंड्याशिवायची हयी पोथ्यापुराणे पाहिजेत पण त्या सांगणाराजवळ आचरणाचा आग्रह हवा . सेवामंडळाला तीर्थ पाहिजे पण तिथे मानवतेचे दर्शन घडले पाहिजे . सेवामंडळाला नवा संप्रदाय निर्माण करायचा नसून जुन्या परंपरांचा जीर्णोध्दार करावयाचा आहे .
*प्रचारकांचे आचरण प्रभावी असावे*
मंडळाजवळ काही प्रचारक अवश्य आहेत . पण सेवामंडळात लोक मोठ्या प्रमाणात कां येत नाहीत ? याचे कारण एवढेच की प्रचारकांच्या दृढनिश्चयाबद्दल लोकांना अजून खात्री नाही . मंडळाचा सेवक दृढनिश्चयी आणि तो परोपकारी असल्याची जेव्हा लोकांची खात्री पटेल तेव्हा लोक आपोआप सेवा मंडळकडे धाव घेतील . म्हणून मंडळाच्या सेवकाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या प्रत्येक हालचालीने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावे . भजन , व्यायाम , औषध , शेती या सर्व बाबी त्याने चांगल्या त - हेने हाताळाव्या . लोकांच्या हृदयात त्याने प्रवेश करून लोकांनी त्याच्यामागे धावत
राहावे .
सकाळ
१ - ९ - ५८