*२२ . प्रार्थनेमुळे जीवनोध्दार* 
 
बंधू - भगिनींनो ,
         तुमच्या हृदयात प्रार्थनेची आठवण सुरू होते तेव्हापासून तुमची प्रार्थना सुरू होत असते . तो क्रम असा की आधी प्रार्थनची आठवण होते . नंतर संकल्प जागा होतो . त्यानंतर प्रार्थनास्थळी जाण्याचे विचार सुरू होतात . नंतर बुध्दीचा निश्चय होतो . आणि या सर्वानंतर मनुष्य प्रार्थनेला जाऊन बसतो . हे कार्य अधिक संस्कारीत होण्यास प्रार्थनतील प्रत्येक शब्दाचा ठसा अंतकरणावर उमटावा लागतो . सामुदायिक प्रार्थनचा रंग मनावर पक्का उमटला पाहिजे . मेल्यावरसुध्दा हा संस्कार पाहिजे.हेच प्रार्थनेचे बीज आहे . ईश्वर - भजनाचे हेब तात्पर्य आहे . त्याचा संस्कार मनावर इतका झाला पाहिजे की मरणकाळी सर्व संसाराची आठवण न राहता फक्त हा प्रार्थनेचा संस्कारच समोर दत्त म्हणून राहिला पाहिजे
      
" याच साठी केला       होता अट्टहास
   शेवट्या दिस गोड व्हावा"

असे तुकाराम महाराज म्हणतात ते याच अर्थाने.
         मित्रांनो , तारून्याचे आयुष्य तारूण्य असेपर्यंत असते .धनाचे आयुष्य धन असेपर्यंत टिकते . पण ईश्वर - भजनाचे आयुष्य जगात देव आहे तोवर राहणार आहे . मनुष्याच्या जन्मोजन्मी ते टिवणारे आहे . म्हणून या प्रार्थनेत चित्त शुध्द करून आपल्या मनात परमेश्वराचे प्रेम निर्माण करायला पाहिजे , या गोष्टीचा निदिध्यास लागला पाहिजे .

     " विषय तो त्याचा
        झाला नारायण" 

अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे


*वृत्ति ईश्वरचरणी लीन ठेवा* 
       जो पुरुष ज्या वस्तूवर पूर्ण प्रेम करू लागतो तेव्हा त्या दोधात एकरूपता निर्माण होते . लैला - मजनूची गोष्ट . सर्वांना माहीत आहे . मजनू हा भोवतालच्या निर्जीव वस्तूतही लैलाचे रूप पाही . एकदा ईश्वराला त्याच्या भेटीची इच्छा झाली . देवाने मजनूला म्हटले . . .
" तूं लैलाचे प्रेम माझ्यावर केले असलेस तर मी तुला मोक्षाचा अधिकारी बनविला असता . "
पण बेफिकीर मजनू म्हणाला ,
" जर तुला माझ्या भक्तीची गरज होती तर तु लैलाच्या रूपात कां नाही आलास ? "
    मजनूची वृत्ती ज्याप्रमाणे आपल्या लैलाजवळ स्थिर होती त्याप्रमाणे आपली वृत्ती परमेश्वराजवळ स्थिर झाली पाहिजे . असे झाले म्हणजे -
        *भुलली वो माय आता कवणा ओवाळू जिकडे पाहे तिकडे
अवधा कृष्णगोपाळू* 

अशी आपली स्थिती होईल . किंवा गोपींची ज्याप्रमाणे ,

लाली मेरे लालकी जित देखू उता लाल
लाली ढूंढन मै गयी मैं भी हो गयी लाल 

अशी तन्मय स्थिती असे त्याप्रमाणे आपली होईल . *सर्व जीव सारखे* 
         ईश्वराचे ठिकाणी मनुष्य लीन झाला की मनात सर्व समभाव येईल नाटकातली पात्रे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका वठवूनही आपली ओळख विसरत नाहीत त्याप्रमाणे परमेश्वरापाशी लीन झालेला माणूस जगात वावरत असतो . एकदा माणसाला ही अवस्था प्राप्त झाली की गरीब - श्रीमंत , लहानथोर


असे भेद आपोआपच गळून पडतात .
काही लोक प्रार्थनेला येतांना शारीरिक व्याधी दूर व्हाव्यात या येतात . असे होणेही वाईट नाही . अहो , जेथे कोणीच मदत करीत ना देवाचा धावा करणे काय वावगे आहे ? त्या माणसाची आज तेवढीच आहे . परंतु ही पहिली पायरी होय . देव शेवटच्या पायरीवर असणार . प्रार्थना करतांना ही जाणीव आपल्याला असली पाहिजे . त्याशिवाय नराचे नारायन होता येणार नाही .
       बंधुनो , या प्रार्थनेला थोडी कसरतही आहे . पण प्रार्थनेचा परिणाम आमच्या व्यवहारात उमटला पाहिजे . प्रार्थना आपण मानवजातीच्या  आरंभापासून करीत आलो आहोत . परंतु मध्येमध्ये प्रार्थनापध्दतीचा तोल सरकत असतो आणि भावनेऐवजी पध्दतीला महत्व असते . आणि मग त्या प्रार्थना - पध्दतीचा जीर्णोव्दार होत असतो . आपली सामुदायिक प्रार्थना ही सुध्दा जीर्णोव्दार झालेली प्रार्थनाच आहे .
 *नव्या विचारांना प्रचारक हवे* 
      या प्रार्थनेतून जी माणुसकीची शिकवण देण्यात येते ती भाषणातनही  देता येईल . पण हा मार्ग तितकासा प्रभावी नाही . जगात मत परिवर्तनाचे मार्ग दोन . एक सक्तीचा आणि दुसरा प्रेमाचा . सक्तीचा मार्ग टिकाऊ नाही . पण प्रेमाचा 
मार्ग मात्र अंत:करणाचा ठाव घेत असतो . हाच धर्ममार्ग होय . यासाठी कीर्तने , देवळे , तीर्थाटने इत्यादी साधने आहेत . ही साधने अपुरी असू शकतात . आज । तर त्यातील मुळ दृष्टीही निघून गेलेली आहे . आज पुन्हा भारतात सामुदायिक भावना निर्माण करावयाची असेल तर नवे विचार पसरविणाऱ्या प्रचारकांची संख्या वाढत गेली पाहिजे . एकेका गावात एकेका प्रचारकाने किंवा साधूने बसून तेथील लोकांना माणुसकीचे धडे दिले पाहिजेत .
      स्वामी विवेकानंदांना अमेरिकेच्या प्रवासात काही गुराखी भेटले . त्यांना स्वामींनी विचारले .


हा कोणाचा देश आहे? गुराखी चटकन म्हणाले ,
 आमचा 
विवेकानंद हे उत्तर ऐकून गहिवरुन आले . ते म्हणाले , माझ्या देशांतील शिकलेल्या तरुणांनाही ही जाणीव नाही . हे केवढे
दुर्देव ! 

बंधूनो , ही प्रार्थना एवढ्यासाठीच आहे . प्रार्थनेद्वारे आपल्याला नवा समाज निर्माण करावयाचा आहे . असे पवित्र विचार आपल्या मनात येऊ द्या . आणि या भारताच्या नव - निर्मितीला हातभार लावा . ईश्वर तुमच्याकडून हे । काम करवून घेवो . 

सायंकाळ
 १ - ९ - ५८