*२३ . प्रार्थनाः राष्ट्रपुरुषं निर्मितीची योजना*
प्रार्थनाप्रेमी बंधूभगिनींनो ,
कोणत्याही कामाला शिस्तीपासून सुरुवात केली की तीत हळू हळू सुव्यवस्था निर्माण होते . पहाडातील दगडातही एक प्रकारचे सौंदर्य असते.परंतु या दगडांना मानव तासून तासून अधिक सौंदर्यसंपन्न बनवितो. एका रांगेत त्यांची योजना करुन त्यांच्या सहाय्याने महाल उभा करतो . हे दुसऱ्या प्रकारचे सौंदर्य आहे . एक सौदर्य नैसर्गिक आहे तर दुसरे मानवनिर्मित आहे.
_ _ _ मानवी जीवाकडेही परमेश्वराच्या नजरेतून पाहिले तर त्याचे स्वाभाविक सौंदर्य नजरेस पडते . या दृष्टीला बाह्य संसाराचे महत्व नाही.बाहय सुखदुःखे आणि व्याधि उपाधी यामुळे काहीही परिणाम होत नाही . ही समदृष्टी होय . इथे केवळ आल्यानेच दर्शन होते . या उलट सामान्या माणसाच्या नजरेतुन पाहणाऱ्यांना हे सौंदर्य अजिबात दिसणार नाही . तेथे त्याला विषमतेचे . सुखदुःखाचे दर्शन होईल . जशी ज्याची दृष्टी तसे त्याला दर्शन चोराचे डोळे धनाकडे जातात . विषयांध माणूस भलतीकडे पाहतो . तर सात्त्विक माणूस समोरच्या सात्त्विक बाबींकडे पाहतो . याचा अर्थ एवढाच की सौंदर्य दोन्ही ठिकाणी आहे . परंतु डोंगरात सौंदर्य पहायचे असेल तर वेगळी दृष्टी हवी राजवाड्यात सौंदर्य पहायचे असेल तर वेगळी दष्टी हवी .
*मानव - मंदिराची घडण*
सामाजिक मुल्ये वेळोवेळी बदलत जातात . त्यानुसार चालीरीतील, वागणुकीत बदल होत जातो . असे का ? तर जगाची इच्छा माणूस सुंदर, सभ्य , सुशील बनावा अशी आहे म्हणून हे स्वप्न जर साकार करायचे असेल
तर आमच्या सामाजिक जीवनातही ही दृष्टी आली पाहिजे . जन्मापासुन मरणापर्यंत आणि पूजेपासून लग्नापर्यंत सर्व कार्यक्रमात या सामाजिक प्रवृत्तीचे
प्रतिबिंब नाही आमची दृष्टी बदलली नाही तर ज्या प्रकारचा समाज बनविण्याची आपली अपेक्षा आहे तसा तो बनणार नाही .
माणसाचे मूळ संस्कार पशूसारखे असतात . काही शास्त्रज्ञ तर सांगतात की मनुष्य हा किडा - मुंगीपासून उत्क्रांत होत होत वर आला आहे . संस्काराशिवाय माणूस तयार होत नाही . त्यांच्या मनावर भोगाचे संस्कार होत असतात . त्यागाचे नसतात . परंतु माणसात त्याग , सेवा , शिस्त हे गुण वाढीला लागणार नाहीत तोपर्यंत या समाजाला मानवमंदिर मानता येणार नाही .
मित्रांनो , प्रार्थनेची सुंदर रचना पाहिली की एखाद्या सुंदर बागेची आठवण होते . या बागेत समाजपुरुषाचे दर्शन होते . नव्या समाज पुरुषाचे बोलणे , चालणे , उठणे , बसणे सारे काही लक्षात येते . या सर्व गोष्टी काटेकोर अंमलात येण्यासाठी प्रार्थना हाच एक उपाय आहे . ही प्रार्थना जेवढी निटनेटकी होईल तेवढे आमचे सामाजिक जीवन उन्नत होईल .
जीवन उन्नत करायचे आपले की सर्वांचे ? स्वत : चा विचार राक्षस करीत असतात . दुसऱ्याचा विचार देव करीत असतात . घरातील एकच माणूस शिकलेला आणि बाकीचे अंगठाछाप तर मी शिक्षित आहे असे कोणत्या तोंडाने त्याला म्हणता येईल ? ज्याच्या घराच्या नोकरापर्यंत हे शिक्षितपणाचे लोण पोहचलेले असेल तोच खरा शिक्षित मानला पाहिजे . आपल्या प्रत्येक वागणुकीचा परिणाम आपल्या घरावर , भोवतालच्या वातावरणावर व्हायला पाहिजे . ही गोष्ट शिक्षणाची . असा सुसंस्कारी शिक्षित माणूस घरी आला तर संत दारात आल्यासारखे वाटले पाहिजे.
*नवा समाजपुरुष येथेच घडेल*
असा नवा समाज निर्माण करातांना राम , कृष्ण , हनुमान इत्यादी अवतारी पुरुषांच्या तत्त्वज्ञानाचे दर्शन आम्हाला व्हायला पाहिजे . केवळ देवाच्या मूर्तीच्या दर्शनाने आम्ही आता थकलो , आम्हाला कृष्णाचे दर्शन गीतेतून झाले पाहिजे . मारुतीचे दर्शन म्हणजे एकनिष्ट सेवा वृत्तीचे दर्शन आहे कृष्णाने
या भारतात भक्तीचे आणि कर्माचे वातावरण निर्माण करावे आणि आम्ही मात्र कृष्णाची एक मुर्ती हातात घेऊन मिरवावे ही दशा आता संपली पाहिजे ,
आता हे दर्शन विश्वाच्या प्रत्येक अणुरेणूतून झाले पाहीजे, हे सारे बळाने , धनाने , सत्तेने किंवा पांडित्याने होणार नाही तर मानवावर चागंले संस्कार घडवून ते होणार आहे . आज अशा पुरुषाला पाहण्याची साऱ्या जगाला भूक लागून राहिली आहे . आणि सर्वांची अशी खात्री आहे की , असा पुरूष भारतच निर्माण करील . *भारताची त्यागवृत्ति*
या भारतात एक पत्नी वर्ताचे तेज आहे अध्यातमाचे रक्त अगांत खेळत आहे ज्या महात्माने केवळ सत्याचा आश्रय घेवुन रक्तहीन क्रांती घडवुन आणलीझाले पाहिजे . हे सो नाही तर मानवावर चांग
दाण्याची साया जापान त्री आहे की असा पुरुष
या भारतात एकपत्निव्रताचे तेज आहे . अध्यात्माचे रक्त अंगात आहे . ज्या महात्म्याने केवळ सत्याचा आश्रय घेऊन भारतात रक्तहीन घडवून आणली त्या महात्मा गांधीना सारे जग आदर देते . आणि म्हणुनच असा माणूस निर्माण होऊ शकणारी भूमी भारत आहे . पण आज जणु तो महानिद्रेत आहे . पाश्चिमात्य देशात आपण सगळीकडे भोग प्रवृत्ति वाढलेली पाहतो . पण भोगाने कधीच शांती मिळत नाही हे सत्य भारताला समजलेले आहे . भारतीय माणूस हा एवढ्यामुळे अल्पसंतोषी , पापभीरु आहे . म्हणून हीच भूमि नव्या पुरुषाच्या जन्मासाठी योग्य अशी आहे . आणि असा पुरुष आमच्या
येथे निर्माण व्हावा एवढ्यासाठी आमची सामुदायिक प्रार्थना आहे .
मित्रहो , ही प्रार्थना आपल्या जीवनात मुरु द्या . पावसाळ्यात पाणी आणि उन्हाळ्यात कोरडे ठणठण अशी स्थिती नको . चातुमास्य नतंर प्रार्थना ही तुमच्या जीवनात एक आवश्यक बाब म्हणून चालू राहीली पाहीजे.
सायंकाळ
२ - ९ - ५८