*२५. संघटनेचे शत्रू* 

बंधूनो आणि भगिनींनो,
       आपल्या भारत देशात आता अशी संघटना अस्तित्वात यावी की
जिच्यामुळे काही प्रभाव पडावा, प्रभाव पडण्याचे प्रकार दोन आहेत. एक वेडपट
प्रभाव, समजा पंचवीसएक माणसांचे एक संघटन आहे. आणि त्यांनी शिर्षासन
घालून चालण्याचे ठरविले तर त्यांचा परस्परांवर पडलेला प्रभाव वेडपट मानवा
लागेल, लोकांवर पडणारा प्रभाव सात्विक असला पाहिजे. लोकांना कार्यप्रकृत
करणारा असला पाहिजे. अर्थात ही जबाबदारी त्या संघटनेच्या निर्मात्याची
आहे. ज्याने आपल्या संघटनेसाठी असे पायंडे पाडले पाहिजेत की ज्यामुळे
समाजाचे आणि संघटनेतील घटकांचे कल्याण होईल.
 *चुगली करणारापासुन सावधगिरी* 

      संघटना कायम आणि प्रभावी राहावी म्हणून अंतरंगातील सूक्षः
मतभेदांना दूर सारले पाहिजे. जर काही मतभेद निर्माण झालेच तर परस्परांशी विचारविनिमय करून ते दुर सारले पाहीजेत. कुटुंबात कुणाची चूक घडली तर
आपण जसे त्यावर व्यवस्थित पांघरून घालतो. त्याचप्रमाणे संघटनेत घडले
पाहिजे. कधी कधी काही स्वार्थी लोक आपसात वैराची भावना पेरून ठेवतात.
त्यात त्यांचा स्वार्थ असतो. संघटना बदनाम करावी असा उद्देश असतो. त्या
प्रवृत्तीपासून सावध राहिले पाहिजे. आणि ही सवय संघटनेपासून शासनापर्यंत
वाढवीत गेली पाहिजे. कोणीही लावालावी केली तर सर्वांना एकत्र बसवून
विचार - विनिमय केला पाहिजे. शांतपणे मने साफ करून घेतली पाहिजेत.
अशाप्रकारे जर आम्ही एका धाग्याने बांधले जाऊ तर आमची संघटना प्रभावी
*होईल. नाही तर तिचा विचका व्हायला वेळ लागणार नाही.
 *वृत्ते अनावर नको* 

           संघटनेची प्रत्येक बाब व्यवस्थित पध्दतीने चालावी. दुसऱ्यांच्या


अडथळ्यांनी बिचकू नये. नाहीतर संघटनेला सुरूंग लागेल. त्यासाठी चालकाने
सर्वांशी समानतेची वागणूक केली पाहिजे. योग्यतेनुसार प्रत्येकाला काम दिले
पाहिजे. फूटपाड्या मनोवृत्तीपासून नेहमी सावध राहीले पाहिजे.
 *प्रचार नम्रतापूर्वक करावा* 
        संघटनेचा प्रचार आपल्या प्रचारकार्यासाठी गावात जातो तेव्हा त्याला
अत्यंत सावध राहिले पाहिजे. तिथले राजकीय पक्ष आणि वैय्यक्तिक मतभेद
यापासून दूर राहिले पाहिजे. या ठिकाणी प्रचारकाची कसोटी असते. अशा
वेळी प्रचारकाने अत्यंत तारतम्य राखून आणि नम्रतापूर्वक उत्तरे दिली पाहिजे.
जर प्रचारकाजवळ शंका समाधानाची पात्रता असेल तर त्याने आपली
विचारप्रणाली समजावून दिली पाहिजे. नाहीतर त्यांना म्हटले पाहिजे की "
गडेहो, मी मोठा विद्वान नाही. मी आपले समाधान करू शकत नाही." हे
असावे प्रचारकाचे धोरणं.

 "गुरू निंदक जरी भेटे
चूप निरुत्तर तयासि करवावे
वस्त्र मुखावरि घ्यावे
अथवा निघोनिया जावे"

जिथे आपल्या संप्रदायाची, गुरूची निंदा होत असेल तेथे आपल्या प्रभावाने
त्या निंदकाला चूप बसविणे हे प्रचारकाचे पहिले काम. कोणत्याही कारणाने ते
जमण्यासारखे नसेल तर तिथून निघून गेले पाहिजे.

 *प्रचारकाला मंडळाची तत्त्वप्रणाली परिचित असावी* 

         या सर्व गोष्टी प्रचारक आपल्या दिनचर्येत आणू शकतो काय? या
सर्व गोष्टीचा त्याने अभ्यास करावा.मी वागतो, बोलतो आणि सांगतो ते
सेवामंडळाच्या प्रणालीशी जुळते की नाही हा प्रश्न प्रचारकाने स्वत:ला विचारावा
आणि आत्मपरिक्षण करून घ्यावे.प्रचारक या वृत्तीने वागेल तर सेवामंडळाचे काम अत्यंत प्रभावी होईल.


पुष्कळदा सेवामंडळाचे दोन सेवक एकाच वेळी परस्परभिन्न व्यवहार
करतात आणि बोलतात. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण होतो. ही गोष्ट बरोबर नाही. लक्षात येताच आपली चूक आपण सुधारुन घेतली पाहीजे. ज्या
तत्वप्रणालीवर मंडळ उभे आहे. त्या प्रणालीची ओळख प्रत्येक
असली पाहिजे. प्रचारकांनी प्रामाणिक रस्त्याने जावे चूक घडली तर पदरात घ्यावी. आग्रह, अट्टाहास या गोष्टी योग्य नाहीत.
 *आज्ञापालक* 

          जो प्रचारक ज्या महापुरुषावर अनन्य भावाने श्रध्दा ठेवतो. त्या
प्रचारकाने आज्ञापालनाची प्रतिज्ञा केली पाहिजे. अर्जुन ज्याप्रमाणे भगवंताला
अनन्य भावाने शरण गेला होता आणि भगवंतांची प्रत्येक गोष्ट मनापासुन आचरत होता. त्याप्रमाणे अनन्यभाव याचा अर्थ आपले व्यक्तित्व त्या
महापुरुषाच्या ठायी समर्पण यामुळे प्रचारकांचा आत्मनाश होणार नसुन
त्यांच्यामधील दुर्गुणांचा नाश होणार आहे आणि प्रचारकांच्या मधील दृढता
पाहून त्यांच्याविषयी इतरांच्या मनात सद्भभावना निर्माण होणार आहेत.
समाजातही त्यांना मानाचे स्थान मिळेल. यासाठी प्रचारकांनी आपले मन
शोधले पाहिजे. कुटुंब,समाज वा राष्ट्र चालविण्यात जी एक पध्दति असते तिचे
अनुकरण प्रचारकांनी प्रामाणिकपणे केले पाहिजे. त्याशिवाय प्रचारक यशस्वी
होणार नाही.
         मित्रहो, मित्रत्व टिकवायचे असेल ते पध्दतशीरपणे आचरण
केल्यानेच टिकत असते. विषयांध वा स्वार्थी माणस कोणाशी मैत्री टिकवू
शकत नाही. आपण देवाशी मैत्री करायला निघालेलो आहोत. ती चिरंतन मैत्री
आहे. मरणा नंतरही टिकणारी आहे. तेव्हा ती आपण प्रामाणिकपणेच केली वपाहिजे. त्यामुळे आपली संघटना, तत्वप्रणाली आणि ध्येयवाद वास
अबाधीत राहू शकतील आणि सेवामंडळाचा प्रचारक हा खराखुराल
ध्येयवाद वा सर्वच गोष्टी अबाधीत राहु शकतील आणि सेवा प्रचारक हा खराखुरा लोक सेवक
शोभून दिसेल.

सकाळ
४-९-५८