*२६. चातुर्मास्य परंपरा*
प्रिय बंधू भगिनींनो,
पूर्वीचे ऋषि आणि महात्मे वर्षातून आठ महिने भारत भ्रमण करीत.
त्या भ्रमणातून त्यांना जो अनुभव येई त्याच्या आधारावर सामाजिक उणिवा
दूर करण्याचे चिंतन करीत. ते चार महिने एके ठिकाणी निवांतपणे विचार
करीत बसत. त्याच बरोबर मनातील विकारही ते धुवून टाकत. त्यानंतर पुन्हा
नव्या उत्साहाने नवीन विचारधारा प्रसारीत करण्यासाठी ते प्रवासाला निघत.
आज ती स्थिती एकदम बदलून गेली आहे. चातुर्मास्याचा खरा उद्देश नष्ट
झाला आहे. आणि त्याला विश्रांतीचा अर्थ आला आहे. मठ, मंदिरे आणि
संप्रदाय या जुन्या संस्थांच्याबद्दल जसा विपर्यास झाला तसाच चातुर्मास्य
परंपरेलाही विकृत अर्थ आला.
*चातुर्मास्यात देश-विकासाची चर्चा व्हावी*
आज सामुदायिक चातुर्मास्य वर्ग भरविण्याची मला आवश्यकता
वाटते ही प्रथा सेवामंडळाप्रमाणे साधुसमाजानेही अनुसरली पाहिजे. यामुळे
परस्परांचा परिचय होईल. त्यांनी परस्परांचे स्वभावगुण लक्षात घ्यावे.
आपसातील उणिवा दूर कराव्या. तसेच भारत देशाचा कोणता भाग मागासलेला
आहे याचा शोध करावा आणि त्याच्या प्रगतीच्या योजना बनवाव्या. याचा
अर्थ सर्वांनी साधू बनावे असा नाही. तर सामाजिक जीवनातील ज्या उणिवा
असतील त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असा आहे. शिक्षकांनी सुध्दा
हप्त्यातून एकदा अशाप्रकारे एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या उन्नतीचा विचार करणे
चांगले असते. आमची नीतिधर्माची पुरातन परंपरा चालता चालता इतकी बिघडून
गेली आहे की वकील, डॉक्टर,राजकारणी या सर्वांनीच आपला रस्ता बदलून
घेतला आहे .ज्या देशाची संघटना शक्ती निर्माण करण्याची व विशुद्ध ज्ञान लोकांना देण्याची जबाबदरी आहे. त्या देशाची परंपरा खंडीत झाली तर सारी
पाहीजे.घरातील सारी माणसे सकाळ-सायंकाळ जागेत काम करतात. कंपोस्ट
बनवितात. तिथे पाहुणा जेवायला दुसरीकडे गेलेला चालतो परंतु शौचासाठी
मालकाच्या घरात आला पाहिजे. तिथे प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट पद्धती
आहे. जोडे एका रांगेत ठेवले जातात. आमचेकडे असे दृश्य कधीच दिसत
नाही. सांगण्याचे तात्पर्य असे की जी गोष्ट आम्ही घडवू इच्छितो तिची सवय
आधी आम्हाला लागली पाहिजे, अशी सवय स्वतःहून लागू शकत नाही. म्हणून
लहानपणापासून आई-वडील गुरुजीनी तसे संस्कार घातले पाहिजेत. मुलांचे
शिक्षण गर्भधारणेपासून सूरु होत असते ही गोष्ट सर्वांत लक्षात घेतली पाहिजे.
*घरा घरात नेहरु का होत नाहीत ?*
आम्हाला या देशात कुत्र्यामाजरांची प्रजा वाढवायची नसून रत्ने
निर्माण करावयाची आहेत. आमचे येथे एकच गांधीजी वा एकच नेहरुजी कां?
या लोकांच्या खाणी कां नाहीत ? याचे कारण त्यांचे मूळ गुण आम्ही ओळखले
नाहीत. बी पेरण्याआधी जमीन चांगली करावी लागते. त्याचप्रमाणे मुलांच्या
गर्भावस्थेपासून आईबापांची वागणूक आणि राहणी चांगली असली पाहिजे.
मुल निर्माण झाल्यानंतर चांगले संस्कार त्यावर टाकले पाहिजेत. हीच चांगली
माणसे निर्माण करण्याची युक्ती आहे. जर असे नसते तर डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांसारखे विद्वान रत्न कसे निर्माण झाले असते ? ज्या मुलांवर
लहानपणी चांगले संस्कार घडले असतील तोच मुलगा पुढे जाऊन मोठा
माणूस होतो. या सर्व उत्तम संस्काराच्या गोष्टी आहेत. आपल्याला जसे घर
बनवायचे असेल त्याप्रमाणे नकाशा तयार कराचा लागतो. तसेच देशाच्या
भविष्याचा विचार करावा लागतो, व्यायाम, वकृत्व, खेळ, संगीत, उद्योग,
आणि इतर जीवनोपयोगी कला या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या अंगात रुजल्या
पाहिजेत. अळीच्या मागे भिंगोटी लागते आणि अळीला आपल्यासासखे बनविते. तोच न्याय शिक्षकांनी अनुसरला पाहिजे.त्यांनी विद्यार्थ्यांना भिंगोटी बनले पाहिजे. असे झाले तर शेकडो नेहरू आणि हजारो गांधीजी इथे निर्माण होतील.
*गृहस्थ जीवन आणि साधू*
साधुंनीसुद्धा लक्षात घेतले पाहिजे की कोणाचे घर मागासलेले आहे. ते
दुरुस्त होईल. बिचारे गृहस्थाश्रमी लोक कष्ट करुन साधूंना सांभाळतात, पोसतात, त्यांच्याबद्दल आदर बाळगतात. त्यामुळे अशा कुटुंबाची व्यवस्था
पाहणे आणि त्यांच्या मानसिक विकासाकडे लक्ष देणे ही साधूंनी त्यांची प्रामाणिक
जबाबदारी मानली पाहिजे. आदर्श घरांच्या निर्मितीची चढाओढसुद्धा लावली
जावी. तीत गावातील सर्वानी भाग घ्यावा. अशा भिन्नभिन्न पद्धतींनी सामाजिक
जीवनात असलेल्या उणीवा साधूंनी व प्रचारकांनी दूर कराव्या. असे
झाल्याशिवाय साधू आणि प्रचारक गृहस्थाच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाहीत.
पहिले गावात सप्ताह बसत. सात दिवसात गाव पूर्णपणे स्वच्छ
होत असे. परंतु आज गावात एकीकडे सप्ताह चालतात, टाळ वाजतात आणि
दुसरीकडे कॉलयचा थयथयाट सुरु होते. हे सप्ताहाचे खरे रुप नव्हे यामुळे
आम्ही बदनाम होतो आणि आपल्या देवालाही बदनाम करतो. ही धार्मिकता
नाही. माझी धार्मिकता राष्ट्राच्या प्रगतीशी संबंधीत आहे. प्रचारकांनी पुढे काय
करायचे याचा विचार केला पाहिजे आणि तशा प्रकारच्या पद्धती या चातुर्मास्य
परंपरेतून आत्मसात केल्या पाहिजेत.
सकाळ
५-९-५८
आशाच संपली असे म्हणुन साधू , संत, शिक्षण, महात्मा या सर्वांनी नित्य जागृत असले पाहीजे .
*मुलांवर सुरुवातीपासूनच चांगले संस्कार हवे*
नेहमी माणसाने मूळ कारणाचा शोध केला पाहिजे. सुरुवातीला लहान
वाटणाऱ्या गोष्टी वेळीच सुधारल्या नाहीत तर त्या वाढत वाढत विशाल रूप
धारण करतात. मुलगा लहान असतो. त्यावेळी त्याचा बाप त्याच्या लहानसहान
दुर्गुणाकडे दुर्लक्ष करतो. मग मोठेपणी तो मुलगा घरचाही राहत नाही बाहेरचाह
राहत नाही. मग म्हातारपणात असे लोक मुलांना साधूजवळ घेऊन जातात.
मुलगा सुधारण्याची अपेक्षा करतात. परंतु आता काय फायदा होणार ? यासाठी
मुलांना लहानपणीच वळण लावले पाहिजे. अशी पद्धत प्रत्येक घरात, शाळेत
चालली तर कधीच वाईट परिणाम होणार नाही. मोठ्यात मोठा डाकू सुद्धा
असाच बनत बनत डाकूगिरी करत असतो. त्याची सुरुवात पेन्सिल, पैसा
इत्यादी गोष्टीपासून होत असते. सुरुवातीला त्याची आई त्याला मदत करीत
राहते. परंतु एक दिवस जेव्हा तो मोठी चोरी करतो आणि पोलीसाच्या स्वाधीन
होतो तेव्हा आई-बाप ओरडायला लागतात. पण आता काय फायदा होणार ?
ही गोष्ट समाज नेते, शिक्षक कुटुंबचालक व सर्वांनी ओळखली पाहिजे. आणि
सुरुवातीलाच तिचे निर्मूलन केले पाहिजे. मुलगा शाळेतून शिकत असतांना तो
देशाचा आधारस्तंभ होऊ शकणार किंवा नाही या गोष्टीचा विचार शिक्षकांनी
केला पाहिजे. असा आजचा विद्यार्थी तसा उद्याचा देश ही गोष्ट आपण लक्षात
ठेवली पाहिजे.
*जपानच्या विकासाचे रहस्य*
प्रत्येक जपानी माणूस आपल्या घरी भाज्या फळे पिकवितो घरच्याच
संडासातले खत वापरतो. घराघरात पीच* नावाचक थंड आणि रसदार फळ
तयार करतो. आमचेकडे सुद्धा *पीच * तयार होतो पण फारच लहान. काही
हवेचाही फरक असू शकेल. परंतु जपानी लोकांच्या कष्टांचा तो नमुना मानला