*२७. उत्सवामागचे तत्वज्ञान* 
    भजनप्रेमी बंधूभगिनींनो,
       भजन ही एक ईश्वरी देणगी आहे. परंतु कोणालाही कला साध्य
करून घेण्यासाठी सुरूवातीला अभ्यास करावा लागतो. केवळ गोड आवाज
असूनच चालत नाही. त्यातून गोड भजन गाता आले पाहिजे. कला ही माणसाला
लोकप्रिय बनविते. उद्योगाची कला, चित्र काढण्याची कला, उत्तम भाषण देण्याची
कला, गायनाची, वादनाची कला अशा कितीतरी कला आहेत की ज्यामुळे
माणसांच्या जीवनात रम्यता आली आहे. जपानमध्ये घराघरात उद्योगाची
कला विकास पावली आहे. इतर कला सुद्धा तेथे वाढल्या आहेत. आणि त्यांच्या
जीवनातही त्या पहायला मिळतात. त्यांच्या कुंपणातसुद्धा कला दिसते. हे
आम्हाला शिकले पाहिजे. परंतु भारतात त्या वृत्तीचा लोप होत आहे. पण तिला
चालना दिली तर ती वाढूही शकेल. या चातुर्मास्यातच पहा. आदर्श घराची
स्पर्धा ठेवली आहे. तीत विद्यार्थी अभ्यास सांभाळूनही भाग घेत आहेत. याप्रमाणे
आता सर्वानीच लागले पाहिजे. पण,

          "सारा गाव मामाचा
       कोणी नाही कामाचा"

अशी वृत्ती असेल तर ती टाकून दिली पाहिजे. आज जी पांढऱ्या
कपड्याची स्पर्धा समाजात सुरू झाली आहे ती थांबवली पाहिजे. आम्हाला
उद्योग करता आला पाहिजे. सभ्य राहणी अंगात मुरली पाहिजे. आपणाला
चांगले म्हणावे अशी प्रत्येक माणसाची हौस असते. पण ही हौस बाजारातून
विकत आणून भागविता येत नाही. ती प्रत्यक्ष ती आचरणातूनच भागवावी
लागते. परंतु आज आपल्या देशांत चांगल्या गुणांपेक्षा वाईट गुणांचीच चलती अधिक आहे.


*उत्सवातून समाजविकास* 

           आपल्या पूर्वजांनी सामाजिक गुणांची वाढ व्हावी म्हणून उत्सव
निर्माण केले आहेत. एकत्र आल्यानंतर सर्वांची शक्ती या उत्सवाला मिळाली
पाहिजे. बिछायत घालणे, जोडे ठेवणे ही कामे एकानेच का करावी? रामधून
निघते तीत सेवामंडळाच्याच सेवकांनी कां भाग घ्यावा? अशाने समाजात
जागृती निर्माण होणार नाही. शहाण्या नागरिकांनी त्यात भाग घ्यावा. आपल्या
मुलामुलींना त्यात पाठवावे. अशा गुणांची वाढ झाली तर समाजात सर्वत्र शोभा
दिसेल. आजचा कृष्णाष्टमीचा दिवस.  कृष्णाने असे काय केले की पाच
हजार वर्षापासून त्याचे भजन पूजन या भारतभूमीत चालत रहावे? त्याने
अशीच सामाजिक सुधारणेची लाट निर्माण केली होती. गोप, गोपी, गुराखी,
योगी, योद्धे या सर्वांना प्रगतीचे आव्हान केले. त्याच्या जन्मापूर्वी जिकडे तिकडे
अशांति पसरली होती. डाके, गुंडगिरी, लूट यांचेच साम्राज्य पसरले होते.
शहरात गेलेली मुलगी घरी परत येईल किंवा नाही यांची शाश्वति नव्हती. लोक
हवालदिल झाले होते. राजा हा रयतेचा वाली. पण तोच राक्षस बनला होता.
रक्षकानेच भक्षणाची रीत उचलली होती. शहाणपण सांगणारे पंडित पोट
जाळण्यासाठी वाममार्गाला लागले होते. कंसाच्या राज्यात न्याय राहिला नव्हता.
*ज्याची लाठी त्याची म्हैस * हाच न्याय सगळीकडे होता. गरीब, अमीर, स्त्री
पुरुष यांच्या मनांत उद्वेग पसरला होता. अशावेळी श्रीकृष्ण जन्माला आला
आणि या दिव्य पुरूषाने ही सर्व विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसविली.
 *श्रीकृष्ण पूर्णावतार कां?* 
     त्याने ओळखले होते की भारताला गाय किंवा शेती या दोनच माता
आहेत. गोमाता आणि भूमाता. भारताचा हा विशेष आहे की या दोन मातांना
ज्यांनी वर आणले ते देव बनले. उत्तम शेती करण्यास गाय बैल जरूरी आहे.
हे श्रीकृष्णाने जाणले. आणि तिला सुस्थिती यावी म्हणून तो स्वत: गुराखी


uबनला. त्याचबरोबर त्याने गोपालाची संघटना केली. कशाला ? 
तर कंसाच्या
जुलुमी सत्तेशी सामना देण्यासाठी. पुढे पांडवांना साथ देऊन त्याने भारतीय
यद्धाच्या निमित्ताने कौरवांचे निर्दालन केले. आणि भोवतालच्या समाजाला सुखी
केले. याप्रमाणे त्याने महान कार्य केले. तो मुलांपासून म्हाताऱ्या पर्यंत,
अडाण्यापासून विद्वानांपर्यंत आणि योग्यापसून तपस्व्यापर्यंत सर्वाचा आवडता ।
बनला. म्हणून श्रीकृष्णाला पूर्णावतार मानायचे.
अशा पुरुषाला आम्ही देव मानतो. पण तो माणसातील एक माणूसच
असतो. महात्मा गांधीनीही असेच महान कार्य केले. १९४७ साली स्वातंत्र्यदिनी
इकडे भारतात आनंदाची दिवाळी चालू होती आणि तिकडे गांधीजी मानवतेचा
संहार चालू असलेल्या नौवाखालीत एकटे फिरत होते. केवढी ही निर्भयता.
अशा माणसाला आम्ही देव कां मानू नये ? अशी करणी प्रत्येकाला करता
येईल. मनात आणले तर आपल्या हातून काहीतरी घडल्याशिवाय राहणार
नाही.
 *श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान* 
        
        ज्या महापुरूषाबद्दल उत्सव केला जात असेल त्याचे चरित्र
डोळ्यासमोर असले पाहिजे. जगात असा एकही देश नाही की जेथे गीता
पोचली नाही. बहुतेक सर्व भाषात तिची भाषांतरे झाली आहेत. श्रीकृष्णाचे
तत्त्वज्ञान वाचून जगातील तत्त्ववेत्ते विस्मित होतात. ज्याला श्रीकृष्णाचे चरित्र
माहीत नाही, ज्याला गीता कळली नाही तो मनुष्य अथवा ती स्त्री भारतात
रहायला योग्य नाही अशा प्रकारे भारतीय तत्त्वज्ञान ज्यांनी ज्यांनी निर्माण
केले त्यांची आठवण हीच त्यांच्या उत्सवामागची भूमिका असली पाहिजे. भारतीय
तत्त्वज्ञानाने, लोक-कल्याणाच्या कार्यात प्रत्यक्ष बाप जरी आडवा आला तरी
त्याच्याशी लढायला सांगितले आहे. साध्वी अहिल्याबाई होळकर हिने सोळा
कोटी रूपयांवर तुळशीपत्र ठेवून आपल्या राज्यातच नव्हे तर भारतातील सर्व तिर्थात, मंदिरी, सदावर्ते, धर्मशाळा इत्यादी गोष्टीची सोय केली. तिच्या मुलगा


विरोध करू लागला तेव्हा* जर तू माझ्या सत्कृत्याच्या आड येशील तर मी तुला हत्तीच्या पायी तुडवीन*
अशी तिने त्याला ताकीद दिली
 *आज सुराज्य निर्माणाची प्रतिज्ञा करा* 
        
          देवाची जात नसते. ते वरून पडत नाहीत. जो जनतेच्या कल्यानाची
असामान्य कामे करतो त्याला आम्ही अवतार मानतो.आज चटकन का
करता मोठे होता आले पाहिजे हीच हाव प्रत्येकाच्या ठायी निर्माण झाली आहे.
वास्तविक या क्षणी स्वच्छतेची, उद्योगशीलतेची मानवतेवर .प्रेम करण्याची
आवश्यकता आहे. हे जो करील तो आमचा देव होईल, आज देशात पंचवार्षिक
योजना चालू आहेत. यावेळी लोक कामे करणार नाहीत तर कोण करणार?
आज जो पाचदोन माणसांनासुध्दा शिक्षण देऊन देश सेवेला लायक बनवशील
तो आमचा महात्मा होईल. आमच्या देशात बाहेरच्या देशातील मिशनरी येऊन
दवाखाने चालवितात. आणि महारोगी मिळत नाहीत म्हणून ते दवाखानेच
आमचे लोक मिशनऱ्यांच्या ताब्यात देतात. अशी स्थिती या देशाची आहे.
मित्रहो,हे सुराज्य निर्माण करण्याचे कार्य तुमच्यापुडे पडलेले
आहे.आतच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्या महापुरूषाचे चरित्र आठवा.
त्याने गरीब गोपाळ हाती घेतले. त्यांना वर आणले. शुध्द हृदयाच्या गोपति
परमेश्वराची भक्ती जागविली. कृष्ण-चरित्र्यात गोपी-कृष्णाचे विषयाध प्रेम
वर्णन केले जाते. पण त्या जर तशा असल्या तर भागवतकारांनी त्या
भक्तांच्या मालिकेत बसवून त्यांच्या भाग्याचे जे वर्णन केले आहे ते केल
नसते. त्याने जसे समाजात सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम केले तर
काम आजही तुमच्याआमच्या समोर पडलेले आहे. त्याकरिता आपण
काढून पुढे यावे हाच या दिवसांचा संदेश आहे.
सायंकाळ
७-९-५८