*२८. भूजयंती* 
        प्रिय बंधू भगिनींनो,
आज विनोबा जयंतीचा दिवस आहे. आजच्या दिवशी कितीतरी
लोक जन्मले आहेत.पण ज्यांच्या जीवनात असामान्य गोष्टी घडतात. ज्यांच्या
जीवनापासून जगाला प्रगतीचा मार्ग मिळतो अशा थोर पुरूषाच्या जयंत्या
अथवा पुण्यतिथ्या मानण्याची चाल भारतातच नव्हे तर सर्वत्र आहे. आजच्या
विनोबा जयंतीला भूजयंतीही म्हणतात. कारण विनोबा भूदानाच्या कार्याने
चमकले. पूर्वीही त्यांचे जीवन उज्वलच होते. स्वराज्याच्या संग्रामात ते पहिल्या
प्रतीचे सैनिक होते. पण त्यांचे स्वतंत्र आणि जगाला दिपविणारे कार्य भूदानाचे
आहे. याचा अर्थ असा नव्हे की यापूर्वी भूमिदान, गोदान, किंवा ग्रामदान झाले
नाही. पण आज त्यामागील दृष्टी निघून गेली होती. तिला विनोबांनी उजाळा
दिला. यापूर्वीच्या आमच्या तत्वज्ञानाच्या अतिसंग्रहाबद्दल अनेक निषेधपर
वचने आहेत. जो मनुष्य जमिनीचा अथवा द्रव्याचा आपल्या आवश्यकतेपेक्षा
संग्रह करतो त्याला भागवतकरानी *चोर* म्हटले आहे. परंतु हजारो वर्षापूर्वीची
ही प्रथा लोकांच्या नजरेआड झाली. अशावेळी विनोबाजी आले आणि त्यांनी
या जुन्या भावनेला उजाळा दिला.
भूमिदानातून सुराज्य
म. गांधीनी गांधीजयंतीला *चरखा जयंती  म्हणण्याची प्रथा पाडली.
यापूर्वी भारतात चरखा नव्हता असे नाही. इंग्रज येण्यापूर्वीही अंगठीच्या
छिद्रातून ओढली जाईल अशी शाल किंवा आगपेटीत मावू शकेल अशी साडी
विणली जात असे. चरख्यावर बारीक सूत काढण्याची कला भारतात होती
परंतु इंग्रजांनी ही कला मारून टाकली. म. गांधीनी पुन्हा तिला उजाळा दिला.
एवढेच नव्हे तर स्वदेशी वस्तू वापरल्याशिवायस्वराज्य येणार नाही हा मूळ
सिध्दांत त्यांनी सांगीतला म्हनुन चाखा जयंती आपन साजरी करतो.विनोबाजी
म्हणतात. मला शेवेचे दर्शन घडले ते भूमिदानातून तेलंगनात श्रीमंतांची घरे


जाळली जात होती. तेथे त्यांना या मार्गाचा साक्षात्कार झाला. विनोबा
आवाज दिला. भूमिदान दिली गेली. कसणारांची भूक शांत झाली आणि
भूमिदानाचा जन्म झाला.
 *जगातील अव्दितीय प्रयोग* 
         तप केल्याशिवाय जयंती साजरी होत नाही. विनोबाजींनी हजारो
लोकांचा समुदाय जमविला. देशात एक आंदोलन उभे केले. विनोबा शरीराने
दुबळे, पोटात अल्सर, साधे अन्नही त्यांना घेता येत नाही आणि घेतलेले
पचत नाही. केवळ तांदुळाच्या पीठाची आंबील, गोड दही, गूळ इत्यादी अगदी
मोजका आहार घेऊन रोज दहा-बारा मैलाचा प्रवास सभा-संमेलने घेत ते
सतत हिंडत असतात. असंख्य लोक जगात भुके-कंगाल असतांना शेती
अथवा भांडवल कोठेही जास्त प्रमाणांत अडून राहू नये हा त्यांचा या मोहिमेमागे
उद्देश आहे. याचा अर्थ असा नाही की श्रीमंतांचा नायनाट करून गरिबांना
त्यांच्या जागी आणून बसवायचे आहे. विनोबांनी हे भूमिदान आंदोलन छेडले
नसते तर देशात रक्तमय क्रांती अटळ होती. पण हृदय पारिवर्तनाच्या द्वारा
त्यांनी रक्तहीन, क्रांती घडवून केवळ भारताच नव्हे तर अखिल विश्वात एक
नवा प्रयोग करून दाखविला. जमीनच नव्हे तर आपल्या जवळ जे जे जास्त
असेल ते ते आपल्या गरीब भावाला द्यायचे अशी वृत्ती प्रत्येक माणसात यावी
अशी त्यांची मागणी आहे.
हतवाराज येथे एक महंत रहात होते. ते ज्या महालात रहात त्याला
४५० खोल्या होत्या. त्यापैकी २-३ खोल्याचाच ते उपयोग करीत. बाकी
खोल्या अगदी स्मशानवत पडल्या होत्या. त्या महालाच्याच बाजूला खोपटा
खोपटांतून गरीब लोक रहात होते. मी त्यांना म्हणालो*महाराज आपण एक दिवस हे सर्व सोडून निघून जाल. जर हा
आणि लोकांच्या उपयोगापण एक दिवस हा म्हणालोमहाल लोकांच्या उपयोगात येऊ शकला तर सर्व लोक आपणास दुवा देतील
आणि महालाचे रूपही बदलून जाईल.


महंताना ही गोष्ट पटली. त्यांनी महालाच्या कितीतरी खोल्या गरिबांना रहावयास दिल्या.
मित्रहो, माणसाच्या मनाला एखादी गोष्ट पटावयाचाच उशीर असतो.
राज्येची राज्ये दान म्हणून दिली जातात. याचा अर्थ असा नव्हे की सर्वानी
राजा हरिश्चंद्र बनावे. परंतु आपल्याजवळ जे जे जास्त असेल ते ते आपल्या
गरजू भावांना द्यावे ही आजची हाक आहे.
 *ग्रामदान म्हणजे सहजीवन* 
        ग्रामदान म्हणजे गावाच्या भलाईचा संकल्प. ज्याला जे येते ते
दुसऱ्याला शिकवावे, ज्याचे घर रस्त्यात आडवे येत असेल त्याने ते काढावे,
गावातील सर्व लोकांनी सर्वाना उन्नत करावे असा हा सह-जीवनाचा प्रयोग
आहे. विद्वान, योगी, तपस्वी, राजकारणी या सर्वांनी इतरांबरोबर कामाला
लागले पाहिजे. हा प्रयोग सफल झाला तर गावाचे आणि देशाचे रूपच बदलून
जाईल. असा हा शुभ संकल्प ग्रामदानाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी करायचा
असतो.
 *साधुंनी माणसाला माणूस बनवावे* 
        गीतेत संदेशही तोच आहे. साधुंनीसुध्दा आता या कामाला लागले
पाहिजे. साधुंची खूण काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. भगवे कपडे ही
त्याची ओळख नाही., किंवा चमत्कार दाखविणे हे त्याचे कार्य नाही. आज या
भगव्या कपड्याखाली पापे केली जात आहेत. लूट चालू आहे. साधू चमत्कारावर
ओळखला जाऊ नये. आज त्याच्या मार्फत देशात आणि संस्कृतित मोठे
परिर्वतन निर्माण झाले पाहिजे. चमत्कार तर गारूडीही करून दाखवितात.साधूही
ते करू शकतील. पण हेच केवळ त्याचे जीवनकार्य नव्हे. आज ४५ कोटी
भारतीयांना माणूस करून दाखविण्याचा चमत्कार साधूसंतांना करून दाखवायचा
आहे. हे राज्य सत्तेशिवाय चालू शकेल अशी किमया करून दाखवायची आहे.


सरकारी संस्थेचा सभासद होऊन लोकांचे कल्याण साधणे हा राजकार
लोकांचा मार्ग आहे.लोकांच्या अंत:करणात प्रवेश करून त्यांना कल्याणार
मार्ग दाखविणे हा साधूंचा मार्ग आहे. हाच मार्ग आज विनोबाजी आचरत आहेत
केवळ साधूच हे कार्य करू शकतात असे नाही. तुम्ही श्रोतेही साधू
आहात. गृहस्थाश्रमात राहूनही ही सर्व कामे करता येतात. ज्या माणसाच
संसारात मन नसेल, लोक कार्यातच त्याचे मन रमत असेल तर तो मनुष्ट
आणि साधू यात फरक नाही. असे नसते तर या प्रार्थनेत तुम्ही कां येऊन
बसला असता ? सत्कार्यावर ज्यांची अखंड निष्ठा असते तो साधूच समजावा
एवढेच की ज्याने संपुर्ण त्यागाचा मार्ग धरला तो सोळा आणे साधू, तुम्ही कमी
प्रमाणात साधू, कोणी दोन तासापुरता साधूतर कोणी चोवीस तासापुरता साधु
तुमच्यातले हे साधुत्व वाढो आणि विनोबाजींच्या कार्यात तुमचा हविर्भाग पडो
एवढीच गुरूदेवा जवळ प्रार्थना आहे.
१९-९-५८