प्रार्थना 

             हे पुज्य गुरुदेवा ! जे लोक तुला शरीराचा , संप्रदायाचा कि धर्माचा बांधवडा समजतात , त्यांना तुझ्या खऱ्या अधिकाराची कल्पना आलीच नसावी असे मला वाटते .

             तु व्यवहार आणि परमार्थाची एकरुपता करून देणारा म्हणजे विश्व , माया , जीव आणि ब्रम्ह यांचे अभेदरूपत्व दर्शविणारा ज्ञानप्रकाश आहेस , हे समजणाराच तुला यथार्थ जाणू शकला असे मला वाटते आणि म्हणूनच त्या सर्वांचा तु चालक होऊन त्यांना आपली अभेट शक्ति दाखव आणि संसार स्वर्ग कर , अशी माझी प्रार्थना आहे .
             
            श्रीगुरुदेवा ! जे लोक तुला शुद्ध ज्ञानमय आणि शरीराशी अलीप्त अशी सद्बोधाने प्रकट होणारी एक निरपेक्ष शक्ति समजतात . तेच खरे जाणणारे होत परंतु तसे न जाणणारेच जगांत अपार आहेत .

             अशा जाणत्या आणि न जाणत्या दोघांनाही आपल्या खऱ्या स्वरुपाचे ज्ञान देऊन त्यांच्यातील आकुंचित मतभेदांची भावना नाहीशी कर एवढीच माझी चरणारविंदी प्रार्थना आहे .
( श्रीगुरुदेव - एप्रिल १९४३ )