प्रणिपात


          श्रीगुरुदेवा ! विश्वाच्या विराटरुपात विश्वस्थरुपाने नटणाऱ्या श्रीगरुदेवा ! ! तुला माझा अखंड नमस्कार असो .

           मनाच्या संकल्पविकल्पाला स्थिर करून सत्कार्य प्रवृत्त करणाऱ्या आणि निश्चयाने टिकवणाऱ्या तुझ्या त्या आत्मीय कृपाशक्तीला मी अनन्यतेने नमस्कार करितो .
    
          ही आत्मीय धारणाशक्ति ज्यांच्यात अखंडपणे प्रवाहित राहून जगताला बोध देते , अशा संतमहंतांना मी वारंवार नमस्कार करतो .

          ज्यांच्या हृदय - पटलावर त्यांचे ज्ञानाचा परिणाम होऊन , निश्चयाने जे जन या शुद्धभक्तिमार्गाला आपल्या विचाराशी संयुक्त करतात त्या प्रिय मुमुक्षु जनांस मी मनोभावाने नमस्कार करतो .
           हाच शुद्ध हेतु धरुन , लोकांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे सत्य मार्ग लाभण्याकरिता जे अनेक मार्गानी , भाषांनी व पद्धतिनी एकत्व दर्शवितात , अशा निष्कामवृत्तिच्या पूजनीय सज्जनांनाहि मी सत्प्रेमाने नमस्कार करतो आणि या सर्वात अनुस्यूतपणे एकच तत्व नटलेले आहे असे मी मनोभावे समजतो .
( श्रीगुरुदेव - मे १९४३ )