अपात्रता

            
              श्रीगरुदेवा ! तुझ्या वरदहस्ताशिवाय या जगात काय होऊ शकते ? असे समजून निराश होऊन स्तब्ध बसणारे पुरुष , तुझ्या कृपेला कधीच प्राप्त होत नसतात .
     
             मला तुझ्या रुपाशिवाय नि तुझ्या व्यक्तिगत सेवेशिवाय तुझे सर्व अन्य कार्य नको आहे असे समजणारे पुरुष , तुझ्या कृपेला कधीच पात्र ठरत नसतात .

             गुरुदेवाच्या अनेक विविध रुपांना न जाणून , आपल्या गुरुशिवाय इतरांस तुच्छ लेखणारे पुरुषहि कधीच कृपा - पात्र होत नसतात .

            वादविवादांच्या भराऱ्या मारुन शब्दांनीच पांडित्य कमावणारे व तत्वाशिवाय गुरुभावनेंत चिकटलेले पुरुष , तुझ्या कृपेचे कधीच अधिकारी होत नसतात .

             केवळ चमत्कारांच्या ओढीने आपली माणुसकी गहाण ठेवणारे पुरुष , तुझ्या कृपेस कधीच पात्र ठरत नसतात .

              आपली आशा तृष्णा वाढवून , सदैव व्यक्ति - मोहात फसणारे लोक तुझ्या कृपेला कदापी पात्र होत नसतात .

                माझ्या सर्व संसाराचे व माझ्या वैयक्तिक कामाचे ओझे तुम्हीच उचलून , मुलाबाळांच्या लग्रापासून तो माझ्या सर्वच इच्छाची पूर्तता तुम्हीच केली पाहिजे . असे समजणारे पुरुष तुझ्या कृपेला कधीच प्राप्त करु शकत नसतात .

                श्रीगुरुच्या वचनाला दुर करून  आम्ही सांगू तेच गुरुने आम्हास पुरवावे  असे मानणारे लोक , सेवा करुनहि तुझ्या कृपेला प्राप्त होत नसतात .

( श्रीगुरुदेव - जुलै १९४३ )