सामुदायिक  प्राथनची आवश्यकता

          सध्या चालू असलेली उपासक म्हणवणारांची स्थिती अशी की, जो तो आपल्या वैयक्तिक स्वार्थाकरिता व मोठेपणाकरिता धडपडत आहे. भक्तिलाच नव्हे तर समुळ धर्मालाच ऐहिक क्षुद्र कमाईच्या धंद्याचे स्वरुप कित्येकांच्या दृष्टीने प्राप्त झालेले आहे. देवळांचा उपयोग पापारी दृष्टीने केला जात आहे. या एकूण परिस्थितीमुळे लोक भरमसाटपणे अवास्तव मार्गांनी बहकले जात आहेत. वरपंगी पाहता लोभ भक्तिभावाला एवढे चिकटलेले जरी असले, तरी त्यातून प्रसंगाकरिता म्हणजे भक्तीच्या शुद्धतत्वाच्या कसोटीची वेळ आली असता किती
कामी पडतील, हाच मोठा जबर प्रश्न समोर येऊन ठाकतो.
                   नाही नाही म्हटले तरी आजही शेकडा ९० लोक आपल्याला असेच समजत आहेत की, आम्ही आपल्या संप्रदायाप्रमाणे ठीक। आहोत. दुसऱ्यांचे आम्हांला काय करावयाचं आहे? परंतु एवढेही त्यांच्या लक्षात येत नाही की, मला काय त्याचे याचा अर्थ हाच ना की, आमच्याकरिता लोक मेले तरी चालतील परंतु आम्ही कोणाचीहि पर्वा करणार नाही. जे आमचे आहे तेच खरे. जिकडे तिकडे अशी ही।
अंदाधुंदी थैमान घालून राहिली आहे, काहूर माजले आहे.

                        विश्व ऐक्याच्या मार्गावर
        
           अगदी सरळ विचार केल्यास कुणाच्याहि विचारी मनास असेच वाटेल की, आज आपल्याला या धर्म व भक्तीचा फायदा किंवा परिणाम आपल्या मानवी वत्तीला अनुसरून-मानव्याला साजेसा व पोषक असा
व्हावयास पाहिजे आहे. सर्व विश्वाच्या दृष्टीने जरी तो जमत नसला इतका व्यापक होऊ शकत नसला-तरी त्याची जी प्राथमिक भूमिका (प्रथमावस्था) आहे, अर्थात आपल्या देशाच्या राष्ट्रधर्माच्या दृष्टीने एकसूत्रता व्हावयास पाहिजे आहे तेवढी जरी झाली तरी फार उत्तम.


निदान आम्हांला तेवढे तरी समाधान मानतां येईल कि, हिन्दू या नावाने का होईना परंतु आम्ही इतके लोक तरी कार्याकरिता असे जुळू शकतो की जेथे जात, पंथ, संस्था इत्यादी भेदाभेद शिवू शकत नाहीत.
   
                या व्यतिरिक्त दसऱ्या कोणत्याहि ठिकाणी याहून कमी प्रतीच्या भावनेने जुळता येणे शक्य नाही व ते तेवढे हितकरहि होणार नाही. जेथे धमावचारावरील श्रद्धेच्या बळावर देवासमोर सर्व ऐक्याच्या भावनेने
वागू शकत नाहीत, तेथे कोणत्याही अन्य मार्गानी लोक आपल्याला खराखर एक समजतील असे मला वाटत नाही. कारण एक होण्याची कल्पना- आमचा धर्म एक आमचा देव एक आमचा देश एक । आम्ही सर्व एकाच प्रभची लेकरे व एकाच भूभागातील रहिवासी।
यावरच अधिष्ठित आहे ना? परंतु येथेच जर अनेकत्व किंवा भेदाभेटा दिसू लागला तर मग एकी करा, एकत्व पहा ह्या कल्पना केवळ स्वप्नासारख्याच निष्फळ भराऱ्या मारीत राहतील, हे उघडच आहे.

                         आमचे अध:पतन

               प्रिय सज्जनांनो! जेथे जगांतील भौतिक शास्त्रांच्या संशोधनाची परिसीमा झालीसी वाटते, तेथील लोकांना तरी आपण सर्व माणसे एकच आहोत अशी भावना शिवलीसी दिसते का? आणि जर शिवली असती तर आपल्या अनावर तृष्णेच्या आसुरी महात्वाकांक्षेच्या भरात आपल्याच मनुष्यजातीवर राक्षसासारखे तुटून-पडून त्यांचे रक्त पिणे त्यांनी अमृतवत कशाला मानले असते? हा सर्व आपल्या उच्चतम विकासाचा परिणाम की, आपल्या वृत्तिची ही नीचतम अधोगति समाजावी जेथे आमचे पूर्वज देवाजवळ अशी प्रार्थना करीत की,
          सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।
          सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्विद्दुःखमाप्नुयात॥

       तेथे आम्ही असे जपत आहोत की, देवा! माझ्या सुखाकरिता माझे संपूर्ण गांव जर बळी पडत असले तरी चालेल, पण मी तुझा भक्त


म्हणून तरी मला दूःख देऊ नकोस असे प्रार्थण्यापर्यंत आमच्या अज्ञानाची व स्वार्थी वृत्तीची मजल पोहोचली आहे. अशा पतन पावलेल्या परिस्थितीचा अजूनहि आम्ही विचार करुन, जर धमनि आणि उपासनेनेहि आपल्याला एक समजू शकलो नाही, तर आमच्यासहित आमच्या वाढत्या पिढीचे पाप माथी घेणारे आम्ही बहाद्दरच नाही का समजले जाणार?
       
             ह्या सर्व बाजूंचा विचार लक्षात घेऊन, आमच्या कुलदेवतांना जरी आम्ही स्पष्ट तुम्ही सर्व देव एक नाही का? असे म्हणू शकत नाही, तरी निदान आमच्या एकधर्मीय म्हणवणाऱ्या लोकांनी प्रार्थनला
जमून स्वत:ची भेदभावना तरी नष्ट करावयास नको काय? आम्ही हिंदू किंवा आर्यधर्मीय म्हणवणारे लोक वेदान्ताच्या, राष्ट्रधर्माच्या, निदान मनुष्यवृत्तीच्या पहिल्या अवस्थेच्या उन्नति-मार्गावर सक्रियतेने चढून,
सर्व प्राणिमात्राला व्यापून राहणारी आमची दृष्टि सामुदायिक प्रार्थनेच्या रुपाने प्रभूसमोर ठेवीत आहोत एवढे जरी सक्रिय प्रार्थनेच्या क्रमपद्धतीने आम्ही दाखवू शकलो, तरी माझ्या मायभूमीच्या अभ्युदयात भर पडली आणि निःश्रेय महामंत्राच्या खऱ्या अर्थास सुरुवात झाली, असे मी मनोभावे समजेन.

               नाशाचे मुळ-अंधानुकरण व लोकरंजन

          माझ्या प्रिय हिंदू समजणाऱ्या सद्गगृहस्थानो ! तुम्ही याचा दूरवर विचार करून जर बघाल ना? तर आज चाललेले भक्तीचे मंत्र हे फुटक्या नावेप्रमाणे नदीच्या तळाशी घालण्याच्या तयारीला लागले
आहेत. असेच तुम्हाला समजून आल्याशिवाय राहणार नाही, असे मला वाटते. तम्ही जरी आज मजोरीने कसेबसे नाकारीत असला, तरी याच्या
परिणाम स्वरुपी भावी काळाची आठवण होताच, असे वाटते की, लोक घरोघर आचरणाशिवाय आपल्याला साधू समजतील, प्रत्येकाचा पंथ निराळा निघेल व कुणीही कुणाचे मत घ्यायला तयार होणार नाही. केवळ रूढ मार्गाचेंच अंधानुकरण करीत गेल्यास असे होणार हे निश्चित व त्यात


ढवळाढवळ करावयाला नको हा तर आपला स्वभाव. त्यामुळे असे मतस्वातंत्र्य बोकाळले की मग शिष्य कोण पहावा याचीच अडचण भासून लोक आपसात नसते तर्क लढवून विद्वान म्हणवतील नि गाढवांची 
गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही असे खात्रीने होईल व आजही या गोष्टीचीच भरभराट जोरात चालू आहे.

                 मनुष्य जेव्हा लोक माझ्याकडे अधिक वळावेत असे स्वार्थबुद्धीने मनात आणतो, तेव्हा तो कुणाचाहि दोष न सांगता तुम्ही समजाल तो न्याय, तुम्हाला आवडेल तोच धर्म, तुम्ही जेवाल तेच अमृत, तुम्ही जिच्याकडे पहाल तीच तुमची भोग्य वस्तु, तुम्ही जे  मागाल त्यावरच तुमची मालकी असेच प्रतिपादन करतो आणि कोणतेहि साधक बाधक नियम न सांगता सर्व मार्ग मनुष्याकरिता मोकळे आहेत. असे भरमसाट सांगण्यातच लोक आपणाला मोठे समजतील असे तो 
मानतो. असल्या कृतीचा परिणाम असा होणे स्वाभाविक आहे की,  प्रत्येक जण आपल्या मनाने आपणास सोयीचा तो मार्ग काढू लागेल व तसे होताच लाथांचा सुकाळ झालाच म्हणून समजा.

                             विनम्र प्रार्थना

          माझ्या प्रिय बंधूनो! अशी शेवटची अवस्था-काही का असेना।  तुमच्या सारखे जीवंत विचाराचे लोक शिल्लक आहेत तोपर्यंत तरी येऊ नये, अशी माझी सदिच्छा आहे आणि म्हणूनच माझी सर्व सजनांना नम्र प्रार्थना आहे आहे की, कोणत्याही महत् कार्याचे जे एकमेव अधिष्ठान अर्थात सामुदायिकत्वाने केलेली प्रार्थना- आमच्या मनोमंदिरात प्रस्थापित करुन, पुनरूज्जीवनास आवश्यक अशा निरुढ धर्माची तात्विक संप्रदायाची स्थापना करावी ही सर्व मंदिरे अनेक देवतांची आहेत ही भावना दुर सारुन, आमच्या सर्वांच्या सामुदायिक प्रार्थनेची व विश्वाला व्यापून टाकणाऱ्या धार्मिक तत्वज्ञानाच्या शिक्षणाची ही आदर्श स्थाने आहेत अशी नवस्फूर्ति तुमच्यात उदित व्हावी, त्याच बरोबर वैयक्तिक 


स्वार्थाच्या भावनांनी बुजबुजलेले जे मंदिरांविषयीचे तत्वज्ञान आज सर्वत्र दिसत आहे त्याचा लोप व्हावा व या सर्व कार्यास आवश्यक असणारी सद्बुद्धि आपणा सर्वात निर्माण व्हावी असे मला वाटते. आणि त्याच उद्देशास अनुसरून ही अनेक देवळे या भारतवर्षावर आता फिरून चमकती दिसावीत, अशी प्रभूस प्रार्थना आहे.

                       मंदिरांचे पुनरूज्जीवन

             प्रिय सज्जनांनो! तुम्हाला माहित आहे काय? की ही देवळे पूर्वी नुसती देवळे नसून, त्यांत जीवंत धर्माची व उज्वल कर्तव्याची शिकवण दिली जात होती आणि त्यामधील महंत किंवा पुजारी हे त्या शिक्षण घेणाऱ्या लोकांचे महत् गरु होते, आचारशील, नि:स्वार्थी व ज्ञानविज्ञानसंपन्न असे आचार्य होते. इतर कोणतेही शिक्षण देण्यापूर्वी, आपला देश धनधान्याचे समद्ध, सत्कर्तव्याने उज्ज्वल व राक्षसी वृत्तीचा
नाश करण्याकरिता सदैव सत्शस्त्रविद्येत तत्पर कसा राहील, याचेच शिक्षण अत्यंत दक्षतेने वैदिक व पुरातनकालचे आपल्यातीलच सत्पुरुष देत असत आणि मग नंतर काय ते पुढील तत्वज्ञान- आध्यात्मिक
ज्ञान-सांगत असत. परंतु आज त्या प्राथमिक गोष्टीचा कोठेच ठावठिकाण नसून, मंदिरे म्हणजे आमची उपयुक्त भुवने, आम्ही म्हणजे ऐषआराम भोगून दिवस काढणारे आणि लोक म्हणजे आमच्या मताचे पित्तू!
असेच बहुतेक ठिकाणी नाही का अनुभवास येतं?

                  तेव्हां अशा परिस्थितीत केवळ प्राचीन महंतांच्या नांवाचा निष्क्रिय जयजयकार करुन आपण कृतार्थ होणार आहोत की काय? आमच्या जीवनात काही फरक पाडून आम्ही त्यांच्याच कृपेने माणूसकीच्या नियमांनी तरी जगावयास नको काय हे जर खरे असेल, असे तर त्या संतमंहतांना व आपल्या वाडवडीलांनाहि वाटत असेल, तर आपण आपल्या प्रत्येक देवळादेवळात नित्यक्रमाची पूजाअर्जा केली, अगर न केली तरी मला आनंदच वाटेल, पण-सर्व गाव मिळून निदान


आठ दिवसातून एकदा तरी एके ठिकाणी मंदिराच्या भव्य पटांगणात रम्य असे स्थान निर्मून सर्वांना कळू शकेल अशा भाषेत सर्वांनी आपणा सर्वांच्या उन्नतीच्या हेतूने आपण देवास प्राचित आहोत या भावनेने सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे .                          

                       प्रायोगिक उपक्रम
 
             अशा सामुदायिक प्रार्थनमुळे आपणात निरपेक्ष सामुदायिक प्रेम व पवित्र बद्धीचा विकास होऊन , आपल्या प्रत्येकाच्या कृतीत त्याच व्यापक व परस्परहितकर वृत्तीचे प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटल्यावरूनच मी जवळजवळ १५ वर्षापासून याच गोष्टीचा पिच्छा पुरविला आहे. प्रभुच्या कृपेने तशी प्रार्थना बऱ्याच ठिकाणी जाहीर नसली तरी होत आहे . एकेका खेड्यात तीनतीनशे लोक एकत्र जमून प्रार्थना करीत आहेत . अशी खेडी हजारपंधराशेहून कमी नसावीत . प्रार्थनेनंतर  अत्यंत थोर व गंभीर अशा भगवत - अधिष्ठानासमोर श्रेष्ठ पुरुषाचे ( आपली फर धर्मवृत्ति निरुढतेने मानव्याला पोषक व विकासक कशी होऊ शकेल नि अंत आपल्या सत्कृत्यांची लोकांना पुन : पुन्हा जाणीव कशी होत राहील , अशा आशयाचे ) प्रवचन अत्यंत भावनात्मक वृत्तीने होत रहावे , अशी प्रथा आम्हा लोकात सुरु व्हावी याचीहि योजना केलेली आहे .
     
               ही सर्व विचारधारा माझ्यासमोर येतांना , मला नेहमी माझ्या  प्रिय उपासक बंधूना सांगावेसे वाटते की , तुमच्या विचाराला अजून तरी  कलाटणी द्या , म्हणजे तुम्हीच हे सर्व कार्य अत्यंत ऐक्यतेने करु शकाल  व फलस्वरूपात भारताचे नंदनवन फिरून विकसित करण्यास कारण व्हाल . समाजात हा विचार अत्यंत जोराने का फोफावत नाही याचे कारण आपली आकुंचित मतेच असू शकतात , जे लोक देवाला व धर्माला मानीतच नाहीत , त्यांना जरी मला वेळाने सांगावयाचे असले , तथापि देवाला व धर्माला मानणाऱ्या मानवाईकांनी ( माननीय लोकांनी ) तरी याचा लगेच  विचार करुन कार्याला लागावे , अशी माझी अपेक्षा आहे.


             सामुदायिक प्रार्थना म्हणजे काय ?
      

                पण सामुदायिक प्रार्थना म्हणजे काही कथापुराण नव्हे , समाप्तीला गेले की सर्व फळ मिळेलच असे समजून फक्त प्रसादाकरताच जमावे अथवा असेही उपयोगी नाही की , ज्याने यावे त्याने घोर किवा पंचमस्वरात आपला आवाज काढून मनास येईल त्या देवाच्या नावाने वाटेल त्या रंगात ओरडावे नि झाली आमची प्रार्थना म्हणून निघून  जावे . अशा प्रकारचे गैरशिस्त किंवा ऐक्यविनाशक वर्तन मात्र मुळीच  चालणार नाही .

              सामुदायिक प्रार्थना म्हणजे सर्वानी एक होऊन आपल आदर्शानुसार भाव सर्वशक्तिमान अशा प्रभूजवळ मांडण्याची एक की मानवोचित पद्धती ! मानसिक शक्ति व शांती मिळविण्याची एकमेव
उत्कष्ट कवायत ! ! साधारण भौतिकशास्त्रमान्य अशा शारारिक  कवायतीपेक्षाहि अति दक्षतेची ही कवायत आहे . ती भौतिक कवायत फक्त बाहेरच दाखवायची असते परंतु सामुदायिक प्रार्थनेची कवायत  अंतरंग व बहिरंग अत्यंत स्वच्छ व सरळ ठेवून करावयाची असते. 
  
            भाविकता म्हणजे गबाळपणा नव्हे !

                  प्रिय सज्जनांनो ! आपल्याघरी कोणी मानवाईक गृहस्थ येणारे असले की , साधारण माणूस देखील आपली राहणी अति उत्तम , टापटिपीची स्वच्छ व पोक्तपणाची ठेवीत असतो . तसेच लग्नप्रसंगी व सभासमयीचे उत्तम वागण्याची कमाल करुन सोडतो . परंतु मला आश्चर्य वाटते की , ज्या देवतेच्या अधिष्ठानसत्तेने खरोखरच आपल्या वागणुकीचे फळ सक्रीयतेने मिळणार आहे , त्या देवतेच्या समोर लोक इतक्या गबाळ तऱ्हेने  कसे वागतात ?

               माझ्या पाहण्यात असे देखील आले आहे की,काही भाविक (?) लोक देवळे म्हणजे आपली पाहुणे उतरण्याची जागा किंवा करमणुकीचे ठिकाण समजतात. कथाकीर्तन प्रसंगी अगदी स्वैर बोलणे,


पाय लांब करुन बसणे , पानविडे खाणे , मोठ्याने हसणे खिदळणे इत्यादि प्रकार पाहिले म्हणजे असे वाटावयास लागते की , आता यापुढे दुसऱ्या कोणत्या पवित्र जागेत आम्हा लोकांना उत्तम राहण्याची व बोध घेण्याची बुद्धि होणार आहे ? दुसरी कोणती जागा त्यासाठी उरलेली आहे ?

           भाविकतेचा पूर आलेले ते लोक पहा ! देवावर बाहेरूनच पाणी झोकतात काय , गंध अक्षता जोराने फेकतात काय , बेढबपणे घंटा वाजवतात काय व साखरेचा प्रसाद एखाद्या पानावर घेऊन वाटेल तेथे ठेवतात काय ! ! हे सर्व प्रकार पाहिल्यावर असे मत बनू लागते की, ही लोकांच्या भाविकेतच्या ( ? ) घाण संग्रहित करून त्याने कोदट व जंतुमय बनलेले हे एक गलिच्छ व टाकाऊ स्थानच आहे की काय ? देवळाच्या सभामंडपातील ती गुरेढोरे घातलेली त्यांच्या शेणखतांनी लिडबिडलेली जागा , भिंती भिंतीवर कबूतरांनी स्वविष्ठेने रंगविलेली रांगूळ , कुजलेल्या निर्माल्यात ( बलफलात ) निर्माण झालेले ते जंतु  आणि तेलाच्या सारवणाने बदरंग झालेल्या दिवा ठेवण्याचा जागा पाहून असे वाटावयास लागते की , देवालयात स्वच्छता व टापटीप राखण्याचा फायदाय नाही , फक्त कोणीहि येऊन घट्ट डोळे मिटून जिकडे जाईल तिकडे जोराने बेलफूल झोकावयाचे , या करिताच हे स्थान आहे . अशी स्थिती पाहिल्यावर खरोखरच  देवळे ही आमची आदर्श स्थाने होत असे कोणी लाजून सुद्धा कबूल करणार नाही .

                     शिस्त व नियमितपणा 

               असले प्रकार देवळात नको आहेत आणि सामुदायिक प्रार्थनेत तर मुळीच उपयोगी नाहीत . म्हणूनच मी मागच्या विभागात सांगितले आहे की , ही एक सर्वश्रेष्ठ कवायतच आहे . वागण्याच्या व उभे राहणे वगैरेच्या बाबतीत ही जशी शिस्तीची कवायत आहे , तशीच वेळेच्या बाबतीतहि ही कडक अशीच कवायत आहे . कारण ज्या ठिकाणी लोक आपली महत्वाची कामे सोडून येणार , त्या ठिकाणी जर वेळेचे


महत्व नसलेले बहादर रेंगाळत बसतील , तर कसे जुळायचे उशीरा गेले तरी चालेल, नाही गेले तर काय देव शिक्षा थोडीच करतो ? असे समजणारे लोक मुळीच नको आहेत .

                या बाबतीत तर परधर्मीयांच्या शिस्तीचा धडा अवश्य घेण्यासारखा आहे.कितीही जरुरीचे काम असू द्या, नमाज पढण्याची किंवा प्रार्थनेची वेळ झाली की ते लगेच करून जातात . प्रार्थनेच्या स्थानी , चर्च किंवा मशिदीमध्ये आणि आमचे अध्यात्मवादी लोक पहाल तर , प्रात:संध्या करावयाचा नियम असल्यास कमीतकमी १२ वाजता तरी ती झालीच पाहिजे . नि माध्यान्हसध्या म्हणजे वाजायचे चार ! तीहि केली तर केली नाहीतर बसले चहाचाच कप  घेत . सायंसंध्या तर रात्री जेवल्यानंतरच आठवण आल्यास व्हावयाची!

                धर्मवान म्हणवणाराचीच जर अशी स्थिती आहे तर बाकीच्या लोकांचे प्रकार सांगावायासच नकोत करु प्रार्थना फुरसतीने असेच त्यांचे मत ! परंतु असे मात्र मुळीच होऊ नये. मनुष्याने आपल्या जेवणात व झोपण्यात जशी नियमितपणाची सवय ठेवावी , आपल्या आवडत्या वस्तुचे चिंतन जसे हृदयात निश्चयाने बाळगावे , तद्वतच सामुदायिक प्रार्थनेकरिताहि वृत्ति सावध ठेवावयास पाहिजे .

                       संघटनेतील वैशिष्ट्य

              आपणास माहितच असेल की , व्यायामाची सामुदायिक कवायत ज्याप्रमाणात मनावर प्रभाव पाडून बाणेदारवृत्ति तयार करू शकते , त्या प्रमाणात एखादाच मनुष्य एकटाच जर दंडमोंढे मारू लागला किंवा कवायत करू लागला तर त्याची प्रगति मात्र व्हावी तशी होऊ शकत नाही . तद्वतच आपली वैयक्तिक प्रार्थनाहि मनावर तितका परिणाम करु शकत नाही , जितका की तीच प्रार्थना सामुदायिकतेने केली असता विशिष्ट प्रभाव पाडीत असते. मनाच्या सात्विक भावना उद्दीपित करून सोडीत असते. असे नसते तर अनेक संप्रदायात सामुदायिक  तऱ्हेने


भजन करण्याची प्रथाच निघाली नसती . त्याचाहि हाच हेतु होता की , उपासकांना सामुदायिकत्व प्राप्त व्हावे .

                  प्राचीन परंपरा व परिवर्तन 

            परंतु कोणत्याहि ठरविलेल्या पद्धतीला काही ठराविक कालमर्यादा ही असतेच आणि त्या मर्यादेनंतर त्या पद्धताला घरगुती स्वरुप येऊ लागते . त्यांत जर का लोभाचा शिरकाव झाल तर त्या ठराविक पद्धतीचा नाश झालाच म्हणून समजा . आमच्या ऋषीलोकांनी वेदकाळापासून तो संत ज्ञानेश्वरादिकांनी आता आता पर्यंत यासामुदायिक भक्तीच्या पद्धतीचे महत्व गाईलेले आहे . परंतु दुर्दैवाने त्यास कालान्तराने तालसूराचे , रागरागिणीचे अत्यंत जुनेपणाचे व संकुचित मिथ्याभिमानाचे रोग जडल्यामुळे , शुद्ध व्यापाराचे स्वरुप आज आलेले - सुक्ष्मदृष्टीने पाहिले असता - दिसून येते . ही पतनावस्था या थरापर्यंत पोहोचला आहे की , जो संप्रदाय नित्यक्रमाने भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे।। असे अत्यंत गहिवरुन म्हणू लागतो , तोच संप्रदाय आपल्याच सांप्रदायिकाना एके ठिकाणी बसवून भजन , संघटितपणे काला किंवा प्रेमभावाने सत्चर्चा करु शकत नाही. जे लोक त्यांना  असं तुम्ही का करिता ? म्हणतील तेच अलग पाडले जातील . अशी परिस्थिति - तत्वाचा विसर व विपर्यास झाला म्हणजे - प्राप्त होतच असते . याचे कारण , काळात अत्यंत परिवर्तन झाले , बराच काळ लोटल्यामुळे जीवंत कर्म तोच रुढिधर्म होऊ लागला , कर्माच्या पाठीमागची तात्विक भूमिका दृष्टिआड होऊन बहिरंगच रुढ झाले , हेच होय .

                       आदर्श प्रणाली

              हे सांगतांना त्याबरोबर मला हे सुचवावयाचे आहे की , वैदिक कालापासन तो आतापर्यंत ज्या ज्या वेळी साधुसंतांनी काही नवीन रुद केले, पूर्वपद्धतीत परिवर्तन केले ते ह्याच करिता की, त्या शुद्ध सामुदायीक प्रार्थनेच्या तत्वावर रुढिरूपी काळोख पसरून आतील शुद्ध


तत्व लोपली जाऊ नये . जेव्हा जेव्हा अत्यंत अवनत काळ आला , तेव्हा भगवंतांच्या सामुदायिक प्रार्थनेला उत्तेजन देण्याचेच कार्य श्रेष्ठ महात्म्यांनी केले व त्यातच भगवत शक्तीचा उदय झाला , अशी वर्णने अनेक ग्रंथातून आढळतात . आजही जर त्या संतश्रेष्टाच्या कार्याचा आमच्या सज्जनसमाजाने विचार केला तर असेच आढळून येईल की , आम्हा । लोकांना या अंध:कारातून यापुढे संघटीतपणे सर्वाच्या उन्नतीचा व सामुदायिक पार्थनेचा मार्ग स्विकारलाच पाहिजे . त्यामुळे आमच्या पूर्वकालीन संतांच्या सदहेतला कलंक न लागता , राष्ट्रधर्म व मनुष्यधर्म यास उजाळा मिळून ऐहिक व पारमार्थिक उन्नती होऊ शकेल हाच भाव डोळ्यासमोर ठेवन मी आपणास सामुदायिक प्रार्थनेकरिता उत्तेजित करीत आहे .

            प्रिय वाचकांनो ! वाचन करीत असताच याचा विचार दृढ होऊ द्या ,नि आपापल्या गांवी सामुदायिक प्रार्थनेचे शुद्ध बीज पेरुन त्यातून अत्यंत उत्कृष्ट अशा अभ्यूदयनिःश्रेयस फळांना प्राप्त करा . दसऱ्यांना त्रास न देता , आधी स्वत:उत्तम होऊन सर्व जगाला उत्तम करु . (कृण्वन्तो विश्वमार्यम् ) ही संतऋषीची तत्वप्रणाली विसरु नका . एवढीच माझी तुम्हा सर्व हिंदवासियांना कळकळीची नम्र सूचना आहे .

( श्रीगुरुदेव - जुलै १९४३ )