सामुदायिक प्रार्थनेचे व्यापक उद्देश
 

           प्रिय उपासकांनो आणि वाचकांनो सामुदायिक प्रार्थना फक्त मेल्यावर मोक्ष मिळवून घेण्याकरिता करावयाची नसून सामुदायिकत्व प्राप्त करून देण्यासाठी नि सामूहिक धर्माची ज्योत मनुष्यमात्रात जागवण्यासाठीच करावयाची आहे . तिचा परिणाम फक्त देवभक्तीतच व्हावा असे नसून , चार माणसात पद्धतशीरपणे कसे बसावे स्वतः स्वावलंबी बनून स्वच्छ कसे रहावे आपल्या गावातील उद्योगधंद्यानी तेजः पुंज बनून उजळ मखाने देवासमोर कसे जावे आणि आपल्या अंगातील भिकार नि बेकार वृत्ति काढून टाकून निर्भयतेने आपल्या मानवजीवनाचा विकास कसा करावा याचे सक्रीय ज्ञान लाभावे हाच प्रमुख उद्देश आहे. तसेच हे सर्व कर्तव्यकर्म माझ्या सुखाकरिताच नसून सृष्टीच्या विकासाकरिता आहे.असे समजण्याची व लोकांना प्रेमाने बोलण्याची कला अवगत व्हावी , तसेच कुणाचीहि गोष्ट डोळे झाकून गुलामवृत्तीने मान्य न करिता विचारशक्तीने समजण्याची व आपल्या मानवधर्मात कलहकारक संप्रदायादि भेदांना विलीन करून टाकण्याची पात्रता अंगी यावी म्हणूनच सामुदायिक प्रार्थना करावयाची आहे .

                     संघटनात्मक परिवर्तन

               काळ हा नेहमी बदलणारा आहे नि प्रत्येक बदलत्या काळास अनुसरून भक्तीचे ( उपासनेचे ) बहिरंग प्रकारहि आजवर बदलत आले आहेत . ज्या कारणांनी मागील संतलोकांनी वा ऋषिमुनींनी बहिरंगात बदल केला ती कारणे आजवर टिकून कशी राहणार ! अर्थात आज निराळीच कारणे निर्माण झाली आहेत . त्या काळातील नि आजच्या काळातील लोकांच्या मनोवृत्तीत पडलेले महदंतर सर्वच लोकांना दिसत आहे अर्थात आजच्या परिस्थितीचा व मनस्थितीचा विचार करुन निराळी


योजना होणे अगत्याचे आहे. या विस्कटलेल्या काळात संघटीतपणाने राहण्यातच आपल्या सत्यधर्माची इभ्रत आहे हे निश्चित समजूनच हा सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम ठरवलेला आहे.

             शिस्तीच्या वळणात संघटीत झालेले रानकुत्रे देखील वाघांना पाडन खाऊं शकतात तर मग आमच्या विचारवान समजल्या जाणाऱ्या मानवसमाजात-प्रार्थनेच्या एकसुत्रात गुंफल्याने संघटना झाल्यास अन्याय करुन आमच्या लोकांवर धाड घालण्याची कुणातहि ताकद राहणार नाही हे उघडच आहे. आणि ती आक्रमक ताकद कोणात राहावी तरी काय म्हणून? या दृष्टीने योग्य संघटीतपणाची शक्ती आपल्यात खेळत रहावी म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.

           वेदकाली ऋषिलोक संघासंघाने वेदघोष करीत भगवंताची प्रार्थना समाजाच्या सुव्यवस्थेकरिता करीत असत. त्या काळात आता बरेच अंतर पडल्यामुळे वेद ऐकून समजण्याइतकेहि ज्ञान आज लोकात उरलेले नाही. किंबहुना ज्यांना वेद पाठ आहेत त्यांनाही मर्म कळणे कठीनच झाले आहे. यासाठी त्या वेदवचनाचा उद्देश मराठी व हिन्दीसारख्या प्रचलित प्राकृत भाषांमधून प्रकट करुन त्याद्वारे लोकांना तेजस्वी बुद्धीचे मार्गदर्शन करावे म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.

                         संप्रदाय-समन्वय

                 आजकालच्या सांप्रदायिक, जातीय किंवा संस्थामय जीवनात तो मोठा की हा मोठा हा वाद उपस्थित करून मोठ्या पुरुषांवर टीका करण्यानेच आपला संप्रदाय मोठा असे ठरविण्यात बरेच लोक बहाद्दरी मानीत आहेत. त्यामुळे एकाच धर्मातील लोक देखील एकेठिकाणी जमणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत उपस्थित असणाऱ्या सर्व संप्रदायातील
आदर्श महात्म्यांची वचने आदराने म्हणून वा गाऊन आपणासह त्याच्यात एकता निर्माण करावी म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.
    
            जगात देश, काल व पात्रभेदाने अनेक धर्माची स्थापना केली


गेली आहे अर्थात देशकालपरत्वे तसे करणे भाग होते म्हणूनच ते करण्यात आले आहे . परंतु आमच्या काही धर्मगुरुनी आमच्या पराणादिकातूनच जशी अतिशयोक्ती केली तसेच त्यांच्यातहि झाले असल्यामुळे व परस्परांच्या धर्माचा मूळ शुद्ध इतिहास परस्परांना ठाऊक नसल्यामुळे लोकांच्या मनात परस्परांविषया अनादर वाढत गेला आहे . दशकालपात्रभेदाने सर्व धर्मसंप्रदायाची आवश्यकता अथवा अपारहार्यता आणि मूल तत्वांची एकात्मकता अथवा सहेतुकता लक्षात घेता हा अनादर किंवा द्वेषभाव अस्वीकार्य आहे हे स्पष्टच आहे . तेव्हा हे जाणून सर्व धर्माबद्दल आपल्या मनात शुद्ध भावना व आत्यंतिक आदर ठेवणेच इष्ट आह . याचा अर्थ असा नव्हे की कुणाला यासाठी धर्मांतर करावे लागेल म्हणून फक्त परस्परांच्या धर्माविषयी आदर बाळगून सर्वांनी आपापल्या शुद्ध नि सोज्वळ धर्माची आठवण सदैव जागृत ठेवावी , विरोधी गोष्टींना कमी करुन गुणग्राहकतेने ऐक्यवर्धनास उपयुक्त अशा गोष्टीवर जोर द्यावा आणि परस्परांविषयी बंधुभावाने वागून आपापल्या धर्माची ज्योत सदानकदा समाजात जागवावी यासाठीच ही सामुदायिक प्रार्थना मार्गदर्शक आहे .

                        यथार्थ तत्वदर्शन 

                    खऱ्या धर्माची कल्पना काय हे प्रत्येक संप्रदायधुरीणांनी एकांतांत आपापल्या शिष्यलोकांना आपापल्या भावनेनुसार सांगून त्यांची मते एकलकोंड्याप्रमाणे करुन टाकलेली दिसत आहेत . तसे जर नसते तर धर्म म्हणजे काय व तो का धारण करावा या विषयी एकवाक्यता होऊन ती शब्दात न राहता कार्यात दिसली असती व समाजाच्या अशा चिंधड्या उडाल्याच नसत्या ; पुन:पुन्हा समाजधारणेचे भिन्नभिन्न प्रयत्न करावे लागले नसते कारण धर्म या शब्दातच असा अर्थ आहे की सर्वांच्या सुव्यवस्थेकरिता देशकालपरिस्थितीचा विचार करून योजलेले कार्य ! ते जेव्हा वैयक्तिक दृष्टीने आचरले जाते तेव्हा त्यास  कर्म  म्हणतात व सर्व मिळून सर्वाकरिता केले जाते त्यांस  धर्म म्हणतात.ही भावना


अनेक प्रमाणांना वेळावेळा समाजात सांगून व जागृत करुन जनतेत सुव्यवस्था निर्माण केली जावी म्हणूनच ही सामुदायिक प्रार्थना आहे!

              साधुसंत समाजधर्म सांगून व स्वतः आचरुन दाखवून गेल्यावर देखील त्यांच्या देहत्यागानंतर त्यांना जे लोक व्यक्तित्वात मर्यादित करु पाहतात नि त्यांच्या सखोल व अफाट ज्ञानाचा झरा आकुंचित करुन
त्याला विशिष्ट धर्माचे, संकुचित संप्रदायाचे किंबहुना जातीचे स्वरूप देतात त्यांच्या त्या विभीन्न भावनांना विस्तीर्ण मैदानात आणून जनसेवेस लावण्याकरिता नि जनताच जनार्दन कशी आहे याचे यथार्थ ज्ञान व
अफाट विश्वरुपाचे डोळ्यांनी व तत्वदृष्टीने दर्शन करून देण्याकरिता म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.

                  अनेक लोक एके ठिकाणी जमल्यानंतर कुणालाहि असत्य जाहीरपणे बोलता येणे शक्य नाही व चुकारपणाने सत्य लपविताही येणार नाही. कारण जी गोष्ट केवळ आपल्या गावातच नव्हे तर आपल्या
संपूर्ण देशात जाहीर केली जाते किंबहुना अखिल विश्वास मान्य होते तीच गोष्ट एका खेड्यातील सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी देखील स्पष्ट सांगणेच भाग पडते. असे असल्यामुळे कुणालाहि आपला भोळेभाबडेपणा गुप्ततऱ्हेने खपवता येणार नाही तसेच कुणाहि गुंडास घरभेदेपणाने द्रोह निर्माण करून आमच्यांत भेद पाडता येणार नाही. कारण आम्हीहि
त्यांचे एकाच आसनावर बसून प्रार्थना करणारे बंधूच आहोत व असे सर्वांना कळावे म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.

           विपरित भावना व आवश्यक आचारधर्म

                आज लोकांना स्नान करणे, देवपाटातील देवांची पूजा करणे कपाळास चंदन लावणे. सुंदर गाठलेली माळ घालणे, सोवळेपणाने राहणे व तीर्थोतीर्थी भ्रमण करणे हाच आपला धर्म आहे. एवढेच
कीर्तनपुराणांतून सांगितले जाते. परंतु आपल्या गावाभोवताली स्वच्छता राहील असे नियम सर्वांनी पाळणे, आपल्या गांवाच्या शिवेतील सर्व


गाडी जाण्याचे मार्ग सर्वांनी मिळून अगदी सडकेप्रमाणे करुन ठेवणे, गावात एक सुंदर जागा घेऊन त्यात मुलांनी व्यायाम व कवायत करावी म्हणून आखाडा करुन ठेवणे , तशीच एखादी सुंदर जागा पाहून तेथे वाचनालय काढणे नि वाचनाचा , व्यायामाचा व (एखादी सुंदर जागा ठरवून तेथे ) नित्यक्रमाच्या प्रार्थनेचा पाठ लोकांना देण्याचा उत्साह निर्माण करणे , इत्यादी आवश्यक आचाराचा धर्म मात्र लोकांतून अतिशयच लोपला गेला आहे . त्या आवश्यक धर्माचारास लोकांसमोर ठेवावे म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे .
  
              आमच्या गावोगावी पुराणे व पोथ्यांचे वाचन चालु असते, पण कथेशिवाय लोक त्यातून काहीहि घेण्यास तयार नसतात , कारण ते समजतात , ह्या देवधर्माच्या गोष्टी फक्त ऐकल्या की पुण्य पदरी पडते नि आपल्याला इच्छित फळे मिळतात . मग त्यातील व्यक्तीच्या नि आपल्या जीवनांतील अंतर मोजण्याचा संबंधच काय ? अशा समजुतीने जन्मच्या जन्म पोथी वाचणारे वाचण्यात नि ऐकणारे ऐकण्यातच गर्क असतात . ऐकणारे कधीकाळी वाचक होतील ही आशा करणे व्यर्थ तसेच वाचणारे पुढे सरकणे कठीण ही जी ऐकाऐकीची हाक आहे तिला ढासळून देऊन त्या सर्वांना अभ्यासास लावावे व आपल्या श्रेष्ठ पर्वजांचे गुण आपल्यात आणण्याचा धडा शिकवावा म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे .

                   साधनक्रमांचे सामर्थ्य 

              अति देवभक्ती ही एकदम मनुष्याचा देहभाव निरसन टाकील असे लवकर होत नसते त्यासाठी बरेच जन्म किंवा काळ तरी लोटावाच लागतो .( बहना जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपज्ञते ) असे असतांना बरेच लोक भाविकतेने आपापले कामधंदे सोडून दिवसभर त्याच मार्गी लागून काही दिवस घालवतात नि तेवढा अधिकार नसल्यामुळे असलेल्या स्थितीपेक्षाही पतन पावतात . तेव्हा ही उतावीळतेची अधिकारबाह्य


प्राक्रिया कोणालाहि झोंबू नये आणि त्यांना क्रममार्गानेच उन्नती करुन घेता यावी म्हणून ही अभ्यासदायी सामुदायिक प्रार्थना उपयुक्त आहे.

            मनुष्य हा वेगवान विचारांच्या प्रवाहात वाहुन जाणारा प्राणी आहे. आपले विचार नव्याने निर्माण करण्याएवढी धमक सर्वांतच राहू शकत नाही. त्याकरिता असले आदर्श विचार समाजासमोर नेहमी असावेत म्हणजे मनुष्य पुन:पुन्हा जागृत होऊन आपल्या उच्चतम ध्येयाकडे जाण्यास प्रवृत्त व समर्थ होत राहील. त्या शब्दांच्या अर्थबोधाने, तेथील गंभीर
वातावरणाने नि प्रतिष्ठित सज्जनांच्या बोधप्रद वाणीने त्याला आपल्या कर्तव्याची सदैव याद राहील व तो उन्नत होत जाईल, असे होत रहावे म्हणूनच ही सामुदायिक प्रार्थनेची प्रथा आवश्यक आहे.

                प्रत्येक मनुष्यमात्राच्या भावनेत फार मोठी शक्ति आहे परंतु तिचा विकास कोणत्या मार्गांनी व कसा करावा याचे त्याला ज्ञान नसल्यामुळे तो आपली अमुल्य शक्ति आपल्या मलीन कर्मांनी गमावून
बसत आहे. अनेक लोकांनी ती आपली शक्ती अव्यक्त नि व्यक्तरुपात असणाऱ्या परमप्रभुच्या प्रार्थनेच्या निमित्ताने एक केली तर महान पुण्यसंस्कार भारत देशाच्याच नव्हे तर अखिल विश्वाच्या सुखशांतीकरिता
निर्माण होतील नि लोक पुण्यशील व सुसमृद्ध होतील. ही भावनाशक्ती समाजातं जागृत करावी म्हणूनच ही सामुदायिक प्रार्थना आहे.

                      भक्तिमंदिरांचे पुनरुज्जीवन

अनेक भोळेभाबडे लोक उगीच ठिकठिकाणी पाया पडत नि शेंदुर लावीत गावांच्या भोवताल कोंबडेबकरे देत फिरण्यातच आपली भक्ति किंवा देवपुजा समजत असतात. परंतु मनुष्यधर्माची उच्च उपासना कोणती व
कोणत्या देवाला कसे भजावे म्हणजे मनुष्य चरित्र्यवान व समर्थ होतो हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.आंधळेपणाने भक्ति करुन व कर्तव्यशून्य बनून- देव म्हणून जी मुर्ति पाहण्यात नि पूजण्यात येते तीच मुर्ति जागृत होऊन आपल्यास


दर्शन देते व त्यानंतर मुक्तिशिवाय आपले काहीहि कार्य उरत नाहीर असे समजून बरेच लोक रुढी नि कर्मठपणा यायोगे आपला जन्म एकाच प्रवाहात घालवतात, यास्तव देव म्हणजे आत्मतत्वाने प्रकाशलेली  शक्ति! ती शक्ति उच्च अभ्यासाने पराक्रमाने, भक्तिने व जनसेवेने सत्यनिष्ठता धारण करूनच ज्यांना लाभते त्यांनाच संत, थोर मुनि अथवा देवसुद्धा आपण म्हणत आलो आहोत व त्या अभ्यासाचा व केवळ ओनामा म्हणजेच ही देवळातील मूर्ति होय. ती उच्च ठेवण (प्रक्रिया) जोपर्यंत आपल्या अंगी उतरत नाही तोपर्यंत आपल्या भक्तिच्या 
मार्गावर आरुढ झालोच नाही हे प्रमाणांनी व अनुभवाने बहुजनसमाजास पटवून द्यावे, यासाठीच ही सामुदायिक प्रार्थना आहे.

                हे सर्व संप्रदाय नि ही सर्व देवदेवळे एका दृष्टीने मानवधर्माच्या  आड येतात म्हणून पुढेतरी रुढ पद्धतीनेच नवसाकरिता नि नावाकरिता असली लहान-लहान ओबडधोबड देवळे न बांधता, आहे त्यातूनच जी कुजत  पडली आहेत त्यांचे स्मारक म्हणून पुनरूज्जीवन करुन आणि भव्य मंदिरांना  आदर्श स्थानाचे रुप देऊन कार्याकरिता नि तत्व प्रचारा करिता सर्वांत ऐक्य आणावे यासाठीच हा सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम आहे. गावातील प्रत्येक घरन्-घर अत्यंत स्वच्छ व व्यवस्थित व्हावे ते यासाठी म्हणून लोकांसमोर प्रार्थनामंदिराचा आदर्श ठेवणे जरुरीचे आहे. त्या दृष्टीने ज्या मंदिराचा एकेक विभाग मनाला उच्च आदर्शाकडे नेणारा असेल अशा सार्वजनिक मंदिरात ही सामुदायिक प्रार्थना करणे अगत्याचे आहे. 

               धार्मिक शिस्त आणि आजचा तरूणवर्ग 

                    लोक नियमितपणाच्या बाबतीत इतके मागासलेले आहेत की त्यांना ठरलेली वेळ म्हणजे जणु काय आपल्या घरचा खेळच आहे असे होऊन गेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे आयुष्याची नासाडी, कार्याचा नाश नि दुसऱ्याचे महत्व न समजणे यातच झालेला दिसून येत आहे. अर्थात ही गोष्ट सर्वांना उत्तम तऱ्हेने कळावी आणि वेळ म्हणजे एक महत्वाची


वस्तु आहे व हजारो लोक त्या वेळेला मान देऊन एके ठिकाणी एकदम जमतात ही किंमत अशिक्षितांपासून तो सुशिक्षितांपर्यंत सर्वांस समजून यावी, अनुभवास यावी, म्हणून ही सामदायिक प्रार्थना आहे.

              गावामध्ये अनेक थोर येऊन जातात व लोक त्यांचा अमुल्य, वेळ उगीच दर्शन दर्शन करुन व घरोघरी नेऊन गमावीत असतात, अर्थात त्यामुळे त्यांच्या पासून घ्यावयाचा लाभ तो दूरच राहतो. असे होणे ठिक नाही, याकरिता त्यांच्या विचारांचे चार अमृतमय शब्द सर्व
लोकाच्या मनोमंदिरात दुमदुमावेत व त्यांना आमच्या या हितकर कार्यांकरिता पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही सामुदायिक प्रार्थना उपयुक्त आहे. 

                 अनेक लोकांना शिस्त म्हणजे काय याचे देखील ज्ञान नसलेले दिसून येत. खेड्यांतूनच नव्हे तर शहरातून देखील असे अनेक लोक दिसून येतात की ज्यांना शिस्तीचे स्वारस्य माहीत नसते नि ज्यांना 
पद्धतशीरपणा जमूंच शकत नाही. त्यांना नेहमीच मोकळ्या रानात वावरण्याची सवय झाल्यामुळे, कोणासमोर किती नम्रता धारण करावी व ती कोणत्या तऱ्हेने याचे बहुधा ज्ञान नसतेच वडील किंवा श्रेष्ठलोक खाली बसले असता स्वतः खर्चीवर बसून बुटासहित पाय टेबलावर लाब करून ठेवणारे अनेक तरुण दिसतात. ही सवय अंगवळणी पडलेली असल्यामुळे
मान म्हणजे काय व तो कुणाला आणि का द्यावा याची जाणीव फार थोड्या लोकांत असलेली दिसून येते. तेव्हा आपणास आदराच्या जागी कशा तऱ्हेने उभे राहिले पाहिजे, बसले पाहिजे व त्यामुळे अनेक लोकांच्या समुदायातहि किती गंभीरता व प्रसन्नता निर्माण होते हे सर्वाच्या अनुभवास आणून द्यावे म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.

                    अल्लड मुलांना आपल्या व्यसनासमोर जगात काहीच महत्वाचे नाही असे वाटत असते, नि म्हणून त्यांच्यावर योग्य परिणाम करणारी एखादी संघटित संस्था जरूर हवी असते, तीत तो जर न आला तर लोक व त्यांचे मित्र त्याचा उपहास करतील म्हणून तरी तो तीत सामील होतोच अशा दृष्टीने मुलात नियमितपणा येण्याकरिता व त्यांच्या प्रगतीचा


पाठ त्यांना देण्याकरिता म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आवश्यक आहे.
           
            विद्यार्थीलोक पाश्चात्य देशाचे वैभव आपल्या डोळ्यांनी पाहू लागले म्हणजे त्यांना आपल्या धर्माविषयी आदर वाटणे अशक्यप्राय होत असते आणि कधी कधी आपल्या धर्मात ही संघटनेची योजनाच नाही आपले देव म्हणजे खडेगोटे नि आपली पुराणे म्हणजे थोरांनी केलेल्या व्यभिचारांची वर्णने! या शब्दांनी त्यांचे कान भरून दिले जातात अर्थात् असले समज रुजत जाऊन मग हळुहळु आपला धर्म बिलकूल वाईट समजून बरेच हिंदू तरूण सुशिक्षित लोकसुद्धा- उगीच अर्थाशिवाय (अविवेकाने)धर्मांतर करण्यात आनंद मानतात तेव्हा उगीच गैरसमाजाचे जाळे न पसरावे म्हणून त्यांच्यासमोर वेदान्ततत्वाची उच्चतम विचारसरणी ठेवून त्यांना त्यांच्या सनातनत्वाची पूर्ण जाणीव निर्भयपणे रुढीला बाजूस सारून-करून द्यावी, यासाठी ही सामुदायिक प्रार्थना आहे.
               
                    गोमातेचे औद्यागिक पूजन
    
             आमच्या कृषिप्रधान देशाला आवश्यक अशी गायीइतकी महत्वाची वस्तु दुसरी कोणतीच नाही, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. देवलोकांनी ती देवमाता आहे असे म्हटले आहे. त्याचा अर्थच हा आहे की तिच्याशिवाय आम्ही लोक आमच्या या भारतवर्षात जिवंत राहू शकणार नाही, म्हणजे आमची जमीन बैलाशिवाय नि मुलेबाळे दुधाशिवाय सुखी राहणे शक्य नाही, परंतु असे असताहि लोक तिची हेळसांड का करतात, कळत नाही हल्ली लोकांनी तिजकडे इतके दुर्लक्ष केले आहे की ती दुसऱ्या लोकांच्या भक्ष्यस्थानी पडल्या जात असलेली दिसत असूनहि लोक विकतातच, यापेक्षा अधिक पतन दसरे कोणतेच असू शकणार नाही. आश्चर्य आहे की, ज्या देशास आम्ही गोभक्षक म्हणतो त्या देशातील गायीच्या दुधाची वाढ ते पन्नास शेर दध देईपर्यंत देखील करतात नि आपल्या घरी व संस्थेत गायी हत्तीसारख्या बनवून पाळतात; परंतु जेथे गायीचा वध होऊ देऊ नये. गाय ही देवता


आहे असा वेदघोष चालतो नि धर्माची आज्ञा सांगितली जाते तेथे शंभर दुभत्या गायींचे मिळून पन्नास शेर दूध निघणेहि कठीण झाले आहे; किती द:खाची गोष्ट आहे ही कृषिविषयक विचार व भावना लोकांच्या मनात जागृत व कार्यप्रवण करण्याकरिता, उन्नतिकारक व उपयक्त वस्तूंना देवता ही संज्ञा देऊनहि थोरांनी ज्या गोष्टी वाली उद्योगमंदिर जागृत ठेवली आहेत, त्याचा उत्तम त-हेने आपल्या लोकांवर परिणाम करुन द्यावा म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे.
  
                    अन्याय अस्पृश्यतेचे उच्चाटन
   
             जात म्हणजेच उच्चनीचपणाची कसोटी, मग कर्म किंवा सदाचार असो वा नसो! अशी जी समज आमच्या लोकात रूढ झाली आहे नि प्रचलित काळी काट्याप्रमाणे अंगाअंगात नि रोमारोमांत घुसलेली आहे ती नाहीशी करण्याकरिता; तसेच ज्याला उच्च व्हावेसे वाटते त्याने आपल्या कर्तव्यतत्परतेने, त्यागाने, ज्ञानाने व समाजसेवेकरिता प्राण पणास लावून पुढे यावे व असाच मनुष्य बहमान्य व्हावा-उच्च समजला जावा, अशी समाजात सामुदायीकत्वाने घोषणा करण्याकरिता म्हणूनच ही सामुदायी प्रार्थना आहे.

         अनेक दिवस अस्पृश्य म्हणुन समजला जाणारा समाज कितीही उत्तम कर्मे करित असला, कितीही घराने (स्वच्छ राहणीचा दृष्टीने), वाचन व व्यवहाराने (आचरणाने) शुद्ध असला तरी त्याला हात लावणे किंवा जवळ बसवणे देखील महापाप अधर्म नि अन्याय्य आहे असे जे आम्हा समजत आलो त्या आमच्या वर्तनाचे परिमार्जन किंवा प्रायश्चित
ना आम्ही चुकून तुमचे जीवन खराब केले हे सक्रिय
साठा आपले कर्तव्य म्हणून स्पर्शभावाने सामुदायिकत्वात सामिल करुन घेण्यासाठी म्हणून ही सामुदायिक प्रार्थन आहे.
           
                  दानपुण्याची समुचित कल्पना

            अनेक लोक दानधर्म करण्याची इच्छा करीत असता अनेक स्वार्थी


लोक त्यांना समाजसेवेचा खरा मार्ग न दाखविता आपलपोटेपणाने वैयक्तिक दृष्टीने त्याचा उपयोग घेतात, परंतु ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. ज्या
योगाने गाव उद्योगशिल-कलावान होईल व वाचनालये, विद्याभुवने आणि प्रसंगी गावसंरक्षणाकरिता आखाडे (व्यायामशाळा) वगैरे हे सर्व उज्वल होतील अशा दृष्टीने दिलेली मदतच पुण्यकारक होय आणि यानेच आपले पूर्वज देवरुप व सुखी होतील नि संसार नंदनवन होईल हे निर्भयतेने चारजणा (समुदायात) बोलुन सर्वांची त्यास अनुमति मिळवणे महत्वाचे आहे 
त्यासाठीच ही सामुदायिक प्रार्थना आवश्यक आहे. 

              ज्यांच्या जवळ कवडी नसते त्यांनाही पुण्य करण्याची अत्यंत खुशी असलेली दिसून येते व ती इच्छा ते इतर मार्गांनी पूर्ण करू पाहतात. अर्थात् पुण्य काय नि पाप कोणते याचे यथार्थ ज्ञान त्यांना नसल्यामुळे आपल्याला आवडेल ते पुण्य समजुन समाजाची धारणा (भावना) आपल्या किर्तीपथाकडे झुकवण्याचा पुष्कळशा चळवळ्या लाकाना व बुवा म्हणवून घेणारांचाहि प्रयत्न सुरु होतो. वर्गणी करुन 
दक्षिणा मिळवून यज्ञसप्तादि करण्याचे व्यवहार चालू लागतात नि ते स्वत: घरी जरी त्या द्रव्याचा विनियोग करीत नसले तरी समाजाची सर्वांगीण उन्नती कशी होईल नि त्यातील अनेकात्वात एकत्त्व विशेषत्वाने 
व बहुजन संख्याकाने कसे नांदेल याची जाणीव त्यांना नसल्यामुळे आपली कीर्तीच जणुकाय पुण्य आहे असे ते समजत असतात व त्यामुळे त्या संपत्तीचा समाजास योग्य मोबदला मिळत नाही. उन्नती होत नाही, ही स्थिती सुधारण्याकरिता, ज्यायोगे समाजात फुट न होता सर्वसाधारण जनसमुह सुखी नि कर्तव्यशील होईल व अध्यात्मसुख हे व्यवहारात कसे प्राप्त करता येते हे त्यास कळून येईल, असा मार्ग त्यांना समुह पद्धतीने कळावा म्हणुनच ही सामुदायिक प्रार्थना आहे.

                  अविरत अभ्यासाची आवश्यकता

              मनुष्य थोडाबहुत शहाणा झाला की त्याला पुन:पुन्हा तीच ती


कसरत करीत बसण्याचे जीवावर येते आणि तो म्हणत असतो - आम्ही ते तर सर्व शिकलो . आम्हाला येतं आता ते त्याच्या पुढे काही आहे का ? आणि अशा भावनेने असतो आपल्या घरी माशा मारित नि झोपा काढित त्याला जर म्हटले की - अहो ! रोज तुम्ही झोप घेताच की तुम्हाला ती समजलीस नाही का अजुन ! सोडा तिचा पिच्छा नि बसाना नेहमी उठूनच ! तेव्हा तो म्हणेल - त्यावर तर जीवनच आहे बाबा ! तेव्हा त्याच्या त्या ज्ञानाबरोबरच त्याला हेही कळावयास पाहिजे की  भांडे नेहमी घासल्यानेच उजळ राहत असते , असे समजून त्याच दृष्टीने देहाला सदैव सत्कार्यतत्पर ठेवावे व त्याचबरोबर इतर लोकासही उन्नत करावे  अर्थात हा कर्तव्यसंदेश लोकांना देऊन त्याच्यात तो रुजवण्यासाठीच ही सामुदायिक प्रार्थना आहे .

              मनुष्य स्वत : शहाणा ( ज्ञानी ) झाल्यावरही त्याने आपल्या मागे असलेले सर्व लोक उन्नत करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय थोर लोक त्याच्या शहाणपणास मान देत नसतात , अर्थात ही जबाबदारी
प्रत्येक ज्ञानी , विद्वान व सुशिक्षित म्हणवणारावर आहे नि त्यानी ती पाळावी म्हणून ही सामुदायिक प्रार्थना प्रचलित केली गेली आहे . 

                     लोक आपली काहीच तयारी न करता अध्यात्म्याच्या उगीच मोठमोठ्या गप्पा मारीत असतात . वेदान्तास व्यवहारात उतरवता न आल्यामुळेच त्यांची सर्वथैव अवनति होत असलेली दिसून येते . तेव्हा त्यांना मी सर्वव्यापक असा एकमेव कसा आहे याचे अभ्यासद्वारा नेहमी भान व ज्ञान व्हावे म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे .

           कर्तव्यतत्पर अनासक्तीची उदात्त शिकवण

                      हे सर्व कर्तव्य निष्कामवृतीने म्हणजे समाजहिताच्या भावनेने केल्यानंतर मला माझ्या मार्गात मृत्यू जरी आला तरी माझ्या इष्ट देवतेप्रमाणे
नि आदर्श सतमहंताच्या मार्गाने आपला आत्मा देहाच्या आसक्तीतून मुक्त करीन ; नि यावयाचेच असेल तर जन्मभर जी सेवा करीत आलो


तीत त्यापेक्षा अधिक जाण्यास म्हणजे अधिक उज्ज्वलतेने सिध्दी प्राप्त करण्यासच येईल ! ही संतमार्गाची यादगिरी ( स्मृती ) सर्व लोकात प्रामुख्याने जागृत करून त्यांना सत्कार्यप्रवण करावे यासाठीच ही सामुदायिक प्रार्थना आहे .

            संसाराचे कितीहि काम असले तरी जोपर्यंत ते टाळणे शक्य आहे तोपर्यंत प्रार्थनेच्या महत्वासमोर त्यांचे महत्व तुच्छ समजून जो ती वेळ गमावूच शकत नाही तोच आपले कार्य  कोठपर्यंत करावयाचे याचा धडा घेऊ शकतो . एरव्ही माणसांना आसक्तीमुळे मरेपर्यंत या संसारातून फुरसत मिळणे कठीण असते नि ही जी कार्याशिवायची आसक्ति असते तीत सुखदुःखाच्या स्वप्नाशिवाय उन्नतिकारक असे काहीही नसते कार्य तेच की ज्यात निर्लेपता आहे . त्याचा थोडा का होईना अभ्यास व्हावा म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आहे .

                   सामुदायिक प्रार्थनेचे सामर्थ्य 

                    व्यक्तीने स्वत:करिता व्यक्तीची किंवा शक्तिची केलेली प्रार्थना वैयक्तिक समजली जाते व समाजाने मिळून समष्टीकरिता केलेली प्रार्थना सामुदायिक समजली जाते . ती प्रार्थना एका महान शक्तीची म्हणजे जीत सर्व लोक जगवण्याची व सुव्यवस्थित ठेवण्याची ताकद आहे अशा दैवीशक्तिीची असते . ती प्रार्थना सर्व समाजाकडून संघटितपणे झाल्याशिवाय आजवर त्या परमप्रभुने व्यक्तिरूपात किंवा कार्यरूपात आपली भेट दिली नाही असा परंपरागत अवतारांचा इतिहास आढळतो . अर्थात तीच भक्ति त्या जगन्नियंत्या प्रभूस अधिक मान्य होते ,म्हणून ही सामुदायिक प्रार्थना पुरस्कृत केली जात आहे .

                प्रिय सज्जनांनो ! सामुदायिक प्रार्थना ही   आपल्या देशातच नव्हे अखील विश्वात सुव्यवस्था व   शांतता निर्माण करून देणारी एक शक्तीमान हाक आहे . तिच्या योगे आम्हा लोकात शीलत्व नि सत्यव्रत पालन करण्याची ताकद येऊन बुध्दीचा पूर्ण विकास होतो व अन्यायी


वृत्तीशी झगडण्याची दैवीशक्ति लाभते,आणि त्यायोगेच मनुष्य हा धमकीने व मोकळ्या मनाने इहलौकिक व पारमार्थिक सुख प्राप्त करु शकतो .

                समष्टिसेवेचा नैसर्गिक नियम 

                 वास्तवकि ज्या अभ्यासूला समाजाच्या सुव्यवस्थेचे ज्ञान कळत नाही , ज्याला जगाची मैत्री समजत नाही , ज्याने आपल्या आवाजात देवत्व संपादन केले नाही , त्याने मोक्षाची कल्पना करणेच दर्बलपणासारखे आहे . मी नेहमी सांगत आलो आहे की मनुष्याला त्याच्या चढत्या अधिकारावरही जबाबदारी पाळावीच लागते . प्रथम आपल्या चित्तशुद्धीची नंतर आपल्यावर असलेल्या कुटुंबाची म्हणजे कुटुंबात असलेल्या आपल्या वडिलांपासून तो पुत्रापर्यंत सर्वांविषयीच्या कर्तव्याची नि त्यानंतर गाव , प्रांत , राष्ट्र व धर्माचीही जबाबदारी पार पाडल्याशिवाय एकटाच , अलग निधन फक्त समाधी लावतो किंवा सन्यास घेऊन फक्त भयारात बसतो म्हटल्याने जुळू शकत नाही , त्याने आपल्या मागचे लोक उन्नत केलेच पाहिजेत असे जर नसते तर आपण तराल नव्हे ते नवल । कुळे उद्धरील सकळांची जो ।। असे वचन लिहिण्याचे संतांना कारणच नव्हते आणि असे न करिता जे संसारच नव्हे तर शरीर देखील त्यागून जातील त्यांनासुद्धा पुन्हा या कार्याकरिता यावेच लागेल , असा ईश्वराच्या घरचा नियम आहे . असा नियम नसता तर साधुसंतांच्यावर ही कामगिरी का आली असती ?

                निसर्ग हीच घटना प्रत्येक सामाजिक अवनतीच्या वेळी घडवून आणतांना आपल्याल्या दिसून येतो व ती प्रत्येक वेळी सामदायिकत्वाने समुदायाच्या संघटित शक्तीकडूनच त्याने घडवून आणलेली आहे . हल्लीचा हा काळहि तोच असल्यामुळे आम्हा सर्वांना सामुदायिक प्रार्थना करूनच आमच्या समाजात सुव्यवस्था निर्माण करावयाची आहे .

    समाजव्यवस्था व सामुदायिक प्रार्थनेचे वैशिष्ट्य
 
           यावर कोणी असेहि म्हणतील की - काय समाजाच्या


सुव्यवस्थेशी व तुमच्या प्रार्थनेशी काही संबंध आहे ? सामुदायिक प्रार्थना न केली तर काय समाजात सुव्यवस्था निर्माण होऊच शकणार नाही ? परंतु यावर मी विचारतो - सर्व लोकात संघटितपणा तर तुम्हास अपेक्षित आहे ना ? मग सर्व लोकात कोठेतरी एकसूत्रता आणल्या शिवाय ते जुळणे शक्य आहे काय ? हे सर्व लोक ज्याकरिता तुम्ही जमवणार ते ध्येय किंवा केंद्र सर्वांना साधारणपणे आकर्षित करु शकेल असे दुसरे  तुम्ही कोणते निश्चित करणार ? त्यांची एकता कुठे ( कोणत्या बिंदवर किंवा भुमिकेवर ) घडवणार नि ती शक्ती एकाचवेळी तुम्हा सर्वांना कशी व्यापणार ? ती एकाच आवाजात तुम्हास सापडणार की अनेक मतात ? अनेक मते जर एकाच वेळी अनेक रस्त्यांनी धावणारी असली तर मनुष्य देखील तुमची हाक ऐकावयास तयार राहणार नाही , मग दुसरे कोण ऐकणार ? यावर तुम्ही म्हणाल - आम्ही आमचा एक अध्यक्ष ठरवू नि त्याला आमची मते देऊ . मी म्हणतो - त्या अध्यक्षाला तरी कोणी अध्यक्ष राहीलच की नाही ? अध्यक्षत्वाचे काही गमक ठरवावे लागेलच की नाही , की जेणेकरून तो आपले अध्यक्षत्व प्राप्त करु शकेल वा शाबित करू शकेल ? तुम्ही म्हणाल - होय , तो अध्यक्ष ध्येयावर - तत्वावर - अवलंबून राहील . मी म्हणतो ते तत्वच अध्यक्ष ठरवणार की ते ज्यात आहे त्यास अध्यक्ष करणार ? तुम्ही म्हणाल  तत्व ज्यात आहे त्यास अध्यक्ष करणार ? मी म्हणेन - तत्व अध्यक्षाच्या हिताचे की सर्व साधारण लोकांच्या हिताचे ? तुम्ही म्हणाल की जगाच्या हिताचे मी म्हणेल - ते तत्व शरीररुप राहील की शरीराला निर्माण करणारे किंवा आधारभूत असे शक्तीरुप राहील ? अर्थांत ते शरीर आहे की एक स्वतंत्र शक्ति आहे , जिच्या तर्फे तुम्ही अध्यक्ष निवडणार आहात ? तुम्ही म्हणाल - ते शक्तिरुप आहे नि स्वतंत्र आहे . अर्थात ती शक्ति अमर राहणारी असुन अध्यक्ष देहदष्टीने कितीही मेले तरी आमचे तत्व - ती शक्ति कधीही मरणार नाही . मी म्हणतो - मग बंधूनो ! त्या अमर तत्वालाच जर आपण मानणार तर ते तत्व आमच्यात


सदैव नांदो असे कुणाला म्हणणार ? - तुमच्यावर जी त्या तत्वाचा परिणाम करणारी शक्ती आहे तिलाच ना ? मग मी तरी तुम्हास दुसरे काय सांगतो ?

           माझे म्हणणे हेच आहे की , सर्व मनुष्यमात्राला जी शक्ति आकलन झाली असता तिचा परिणाम भेद पाडण्यात न होता मी सर्वमेव आहे या जाणिवेत होतो , अशी मी सर्वांकरिता आहे किंबहुना मीच सर्व आहे असा बोध देणारी - जी दृश्य व अदृश्य शक्ति तिलाच ईश्वर म्हणतात व तिची याचना नि आराधना करणे म्हणजेच सामुदायिक प्रार्थना करणे असे मी समजतो . ती अन्य मार्गानी - भिन्न भिन्न प्रवाहांनी - जरी प्राप्त होत असली तरी तो एकांगीपणा आहे आणि ही शक्ति संपूर्णतेने ज्या ठिकाणी संघटित असते किंवा प्रगट होते त्या स्थानास सामुदायिक प्रार्थनेचे स्थान हेच नाव आहे असे मला वाटते ; आणि या दृष्टीनेच ही सामुदायिक प्रार्थनेची प्रक्रिया प्रिय उपासकवर्गासमोर मी ठेवीत आहे .

         मी तर म्हणेन , घरोघरी केली जाणारी पूजाअर्चा वा प्रार्थना ही एकट्याकरिता जेवढी महत्त्वाची आहे , त्याच्या लाखोपटीने अधिक महत्व सामुदायिक प्रार्थनेस आहे . समुद्राचे पाणी वापरण्याकरिता म्हणून जरी नदीच्या प्रवाहातून जगात सर्वत्र फिरते तरी त्यांचे मूलस्थान समुद्रच आहे , तद्वतच प्रत्येक प्राणी जरी त्या शक्तीने आपला संसार चालवित असला तरी ती मुख्य शक्ति सामुदायिकत्वात असते . व्यापकतेची सर आकुंचितपणास केव्हाहि येणार नाही . समष्टीच्या हृदयाची खळबळ ही त्वरेने कार्य रुपात आलीच पाहिजे . यादृष्टीने सर्व समुदायास त्या शक्तिचा लाभ व्हावा नि जगात पुन्हा सुव्यवस्था निर्माण व्हावी व सत्यमेव जयते ही म्हण सर्वांच्या अनुभवास यावी म्हणूनच ही सामुदायिक प्रार्थना निश्चित ठरवलेली असून , ते घडवून आणण्याचे सामर्थ्य तो जगच्चालक तुम्हा उपासकास देवो एवढीच त्यास प्रार्थना करुन माझे लेखन येथेच पूर्ण करितो .

( श्रीगुरुदेव - एप्रिल १९४४ )