२. जीवंत राष्ट्रधर्म

                 धर्माचे ध्येय व देवाचं कार्य

माझ्या मित्रा ! अरे, हा धर्मच विचारवंतांकरिता राष्ट्राचं
रक्षण व सत्याचं जीवन होतो, अविचारी नि भेकड माणसांना
विशाल धोंडा होतो तसंच अत्याचारी व ऐतखाऊ लोकांकरिता एक सुरक्षित कुरणहि होतो. ईश्वराचं नांव नौतिवंतांना विश्वव्यापी प्रेमानं कर्तव्यशूर होण्याला मदत करतं नि त्याच नांवानं ढोंगी लोक हवं तसं पाप करु सफाईनं घरं भरण्याची साधनाहि करतात. आपण मात्र महत्व वर्णन करतांना त्यांच्या तात्विकतेकडेच प्रामुख्यानं लक्ष देतो पण त्यांच्या नावांच्या रंगीत पडद्यामागं काय काळा व्यवहार राजरोस चालू आहे इकडे पाहायलाहि तयार होत नाही; हे कितपत बरोबर आहे ? यातील काही फरक लक्षांत घेशील की नाही? याच कारणामुळे मी म्हणतो की धर्म अन् देवभक्ति ठीक आहे; पण हे जर देशसेवेला अडथळा आणीत असतील तर ? तर ती भक्तिच नव्हे व धर्महि नव्हे असं म्हणायला काय हरकत आहे ? आपणाकरिता एक आजच्या काळांत धर्माचा खरा मार्ग जर कोणी अवलंबिला असेल तर तो राष्ट्रपिता महात्मा गांधींनीच होय, की ज्यांनी राजकारणाचा कठिण पेचांचा खेळ खेळूनहि देवावरच्या डोळस निष्ठेचा खुंट आपल्या हातून निसटूं दिला नाही; एवढंच नव्हे तर *देशाकरिता देव व देवाकरिताच देश आहे*  हे एकत्व आपल्या जीवनाचा दीप उजळून त्यांनी जगाला दाखवून दिलं. सेवामय जीवन हाच खरा धर्म व सत्यमय सेवा हीच खरी भक्ति; हाच पाठ त्यांच्या पावलोपावली उमटला. अरे! उपभोगाकरिताच जर जग आहे तर त्यांनी खादीभांडार


युगप्रभात

स्वाधीन असतां अपुरं वस्त्र कां धारण केलं ? महाल मिळत असतानाहि पानापाचोळ्यांच्या झोपड्या कां पसंत केल्या? याचा अर्थ, साधारण लोकांच्या राहणीशी आपलं जीवन समरस कराव हे मुख्य धर्मसूत्र त्यांच्यासमोर होतं, हाच ना होतो ? हीच मनोवृत्ति भारताच्या प्रत्येक जाणत्या घटकांत-व्यक्तिव्यक्तीत जागी झाली पाहीजे आणि त्यांनी आपली घर याच विचारांची विद्यालये बनविली पाहिजेत, तरच
यापुढं आपलं सर्वांच कल्याण होणार आहे आणि सर्वांच कल्याण हेच धर्मांचं ध्येय नि देवाचं आवडतं कार्य आहे, समजलास बाबा? नाहीतर नवलाचे नऊ दिवस आनंदानं घालवून बाकीच्या दिवशी शिमग्याची कर नको व्हायला !


               सामुदायिक प्रार्थना की देशसेवा?


तूं म्हणतोस - मग का हो ! तुम्ही तरी प्रार्थना, देव न
धर्मच ना सांगता लोकांना ? सामुदायिक प्रार्थना करा, धर्मांन वागा, असं कशाला हो सांगता? म्हणा की सोडा देवधर्म अन् चला राजकारण करायला म्हणून ! किंवा असं तरी सांगा की आधी लढाई महागाई, अशांतता न् पक्षभेद मिटल्यावर मग भक्ति करा-प्रार्थना करा, तोपर्यंत करूंच नका ! पण तुमचे लोक तर रामधून झाडझूड, चरखा, प्रार्थना अन् देवाचं नांवच सांगतात; मग हे कां?"
मित्रा! बरं विचारलंस हे, तूं कधी प्रार्थनेस गेला होतास
कां? सेवामंडळाच्या एखाद्या वर्गात तरी होतास का तूं ? बरं,
मंडळाच्या खास सेवकांशी चर्चा केलीस का कधी? अरे ! त्याचं म्हणणं असं. आहे की, प्रार्थना करीत असतांना जर एखाद्याच्या घराला आग लागली तर सर्वांनी जाऊन आधी आग विझवलीच पाहिजे. मतभिन्नता कितीहि असली तरी त्यामुळे बंधुत्वांत बाध न येऊ देता सर्वांनी प्रार्थनेला एकत्र बसलंच पाहिजे. मंडळाच्या सेवकानं


जीवंत राष्ट्रधर्म

आपल्या देशाच्या रक्षणाकरिता प्राणाची पर्वा सोडून धावून गेलंच पाहिजे. प्रसंगी प्रार्थनाहि केली पाहिजे व राष्ट्र हाक देईल तेव्हा  देशाचे शिपाई होऊन लढलहि पाहिजे. माणसासारखं सुखानं राहतांहि आलं पाहिजे आणि कामगारासारखं प्रत्येकाला राबतांहि आलं पाहिजे. थोरांना अभिवादनहि करता आले पाहिजे व निव्वळ बातेकरुंना हासडतांहि आलं पाहिजे. अवश्य तेव्हा सोवळ्यांतहि राहतां आलं पाहिजे नि गावांतील गटार उपसतांहिे आलं पाहिजे. बादशाही मिरवतां आली पाहिजे व घोळ (ओचे) खोचून नांगरहि चालवतां आल पाहिजे. माझ्या सर्व प्रार्थनेतून मीसुद्धा हेच सांगत आलो आहे नि माझा धर्महि मला हेच शिकवून स्थिर झाला आहे. माझ्या परीनं कुणाच्याहि मार्गाआड न येता आजवर मी हाय मार्ग आक्रमीत आलो आहे; आलं लक्षांत ? मुत्सद्दी लोक विमानानं जात असतील तर मी मोटारीनं जाईन, पण अंधारात बसायला सागण्या इतका माझा गुरु आंधळा नव्हता व अंधार माझ्याहि पुढे नाही!
                  व्यापक जीवन-धर्म

मित्रा ! मला असं वाटत की, भारत देशाचा धर्म एकच
असावा, त्यांचा बाणा एकच असावा, त्याची भाषा व त्याची प्रार्थनाहि एकच असावी आणि त्याची सर्व संपत्तिहि सर्वांची असावी. मानवधर्माचा प्रकाश जगावर पसरविणारा हा देश देवा-सारखा जगात पूज्य मानला जावा व तो आतूनहि तितकाच उज्ज्वल नि बलवान असावा. हा प्रांत तो प्रांत हा भेद कार्याकरितां व व्यवस्थेकरिता असावा. हक्काच्या झगड्याकरिता व गटांच्या राजकारणाकरिता नव्हे. पिढ्यान्पिढ्यांचे हक्क व भाषा आदीच्या नांवावर कोंबड़े लढवणं ही ब्रिटिशांची भेदनिती स्वार्थासाठी होती: आमच्या देशाच्या सुधारणेसाठी नव्हे. पूर्वजांची पद्धति, चालत असलेली परंपरा, धर्माची रुढि या नावांखाली।



अनिष्ट गोष्टी चालवण्याचा हट्ट धरणं म्हणजं आत्मघातकी मूर्खपणा करणंच होय.
           ब्रिटिशांच्या पूर्वी लहान-लहान गट, जाति व संस्थान करुन लोक बसले होते व आपसांतच भांडत होते. पेंढारी सुटत आणि बळी तो कान पिळी या न्यायानं लोक परस्पराना खात हे आमच्या शूर पूर्वजाचं कृत्य म्हणून भूषणावह समजतां येईल का? त्यावेळी ही दुही नि ही गटांची भांडण होती, स्वत:च्या स्वार्थासाठी देश खड्यांत गेला तरी पर्वा नाही अशी फुटीर व कुटिल वृत्ति होती, अन् म्हणूनच एवढा मोठा देश मूठभर परकी लोकांनी गुलाम करुन घेतला. आजहि
आम्ही तीच पक्षांधता व स्वार्थांधता खेळवीत बसला आहोत, सत्तेसाठी आपसांत ओढाताण करीत आहोत; तेव्हा तोच रोग पुन्हा नाही झाला तर दूसरा तरी अवश्य होईल. संकट त्यानाही तर दूसर्या कोणत्या तरी दिशेनं आमच्यावर झडप घालील हे उघड आहे. अशा स्थितीत आमचा सुरक्षितपणे विकास व्हावा असं जर वाटत असेल तर आमचा देशच आम्हा सर्वांची जात, प्रांत व पंथ बनला पाहिजे;
किंबहुना त्याहिपुढं कर्तव्यानं मजल गेली तर बरंच आहे, असं
मानणारा मी माणुस आहे. 
          एका जातीच्या साडेबारा जाती करण्याला मी पतन समजतों. मतभेद असेल पण मतद्वेष कां? आपल्या न्यायप्रिय बुद्धीनं राष्ट्राची बिघडलेली घडी दुरूस्त करण्याचे प्रमाणिक प्रयत्न आपण केले पाहिजेत, आणि अन्याय करणारांना योग्य शिक्षा देऊन मार्गावर आणले पाहिजे.मित्रा! हेच मी त्या देवभक्तीत व प्रार्थनेत सांगत आलो आहे. अस
नव्हे की, देशात काहिही झाल तरी सर्व काही देव करील म्हणून स्वस्थ बसाव व आळसी होऊन जीवन रिकामं करुन सोडावं. असा खुळा बोध मला मुळीच आवडत नाही, लक्षांत असू दे!




              राष्ट्राच्या प्रत्येक घटकाचं-कर्तव्य

तूं म्हणतोस - एवढं मोठे कार्य आमच्याकडून होत नसेल तर ? आम्हांला तेवढी बुद्धी व शक्ति नसेल तर ?  ठीक आहे.
मी म्हणतो, तुझ्याकडून काय बनते तेवढं तरी सांगशील काय?
मित्रा! राष्ट्राचा उत्कर्ष होण्याला, ते जागतिक जीवनसंघर्षात विजयी राष्ट्राचा होण्याला सर्वप्रथम देशातील व्यक्तीचे स्वभाव उत्तम असावे लागतात नि त्यांच्या स्वभावांतून द्वेषमत्सर, व्यक्तित्वाकरिता केलेली गटबाजी, चोरीलबाडी इत्यादी गोष्टीचं उच्चाटन व्हावयाला पाहिजे असत. पुढारी म्हणवणारांच्या भोवतालीन लोकच सुखी राहू शकतात, अशी अन्यायी व द्वेषमूलक वृत्ति तसंच प्रलोभनाची प्रवृत्ति जर लोकात असेल तर हे खात्रीनं समजावं की बुड़त्याचे पाय समुद्राकडे ओढ घेऊं लागले आहेत. कितीहि द्रव्य असूं दे, साधन असूं देत नि सत्ता असू दे, पण काम करणार्या माणसात एकदा का बैमानी शिरली की मग हा डोल्हारा केव्हा ढासळून पडेल याचा नेमच नसतो. त्याकरिता प्रथम माणसांची मनं साफ असावी लागतात व ती साफ ठेवण्यासाठी तितकंच निर्मळतेनं, आपुलकानं व व्यापक भावनेनं आपलं वर्तनहि ठेवावं लागतं. तेव्हा मित्रा! हे तरी तुझ्याकडून होऊं शकेल काय ? उत्तम विचारांचं शिक्षण घेऊन स्वावलंबनानं राहण; अनिष्ट रुढ्या, काळ्या बाजारा सारखी दुः्कर्म व दुराचार बंद करुन आपल कार्य सर्वतोपरी लोकांना आवडेल अस वागण; आपला मार आपणच सांभाळून आपल्या घरकार्याला मदत करण; घरात स्वच्छता, टापटीप व पावित्र्य ठेवण; शेजारी-पाजारी देखील आपल्या राहणीपासून बोध घेऊ शकतील व त्यांच्यावर उत्तम परिणाम होऊ शकेल असं शरीर, असं घर, अशी मुलं, अशी स्त्री व अशी दिनचर्या ठेवणं आणि हे सर्व करून गावांतील सार्वजनिक हिताचं कार्य असेल ते सगळं



आपले आहे असं कळकळीनं समजून आपल्या न्यायान कमावलेल्या कमाईचा थोडातरी भाग त्या कार्याला देणं व त्याची विल्हेवाट कशी लागते हे समजण्याची देखील बुद्धी व जागरुकता ठेवणं ह्या सर्व गोष्टी साध्या माणुसकीच्या सामान्य नागरिकतेच्या आहेत व त्यासाठी सतसमागमाचीहि गरज आहेच. मित्रा ! काय हेहि तुला करणं कठिण जाईल असं तुझं मत आहे ? आणि हेहि जर तू करणार नाहीस तर तूं अजून मानवाच्या कोटीतलाहि पुरुष नाहीस, असं नाही का समजलं जाणार?
             अरे ! हे सर्व जाणून घेण्याचं, बौद्धिक उन्नतीचं, सात्विक स्थान आहे सामुदायिक प्रार्थना, जीत राष्ट्रीयतेची व मानवतेची बीजं सात्विक जलाच्या सिंचनानं विकसीत करण्याचं सामर्थ्य आहे. पूज्य गांधीजींनी प्रार्थनेत राजकारण भरलं व सेवामंडळ त्यांतच विकसित मानवतेचं समाजकारण भरु चाहतं. या सर्वांचीच आज व्यक्ति व राष्ट्र
यांच्या जीवनांत शांति व प्रगतीकरिता अत्यंत जरुरी आहे आणि अशा जरुरीच्या कार्यासच त्या काळचा धर्म व देवसेवाचा मार्ग म्हणण्यांत येत असंत; आलं लक्षांत ? हा जीवंत पाठ विसरून काहीहि न करतां माणसं जर पूर्वजांच पुराण व ब्रह्म न् मायाच घोकत बसली तर देशाचं काय होणार ? आणि देशाचं काय होणार म्हणजे प्रत्येक व्यक्ति-व्यक्तीचं काय होणार हा बिकट प्रश्नच आहे!
मित्रा! भारतांत नवं युग उदयास यावं आणि सर्व लोक सुखी व्हावेत अस तुला वाटत ना ? आजचा हा आपत्काळाचा घनघोर अंधार नामशेष होऊन सत्ययुगाची प्रभाती फुलावी अशी तुझी इच्छा आहे ना ? तर मग तूं जीवंत राष्ट्रधर्म आचरु लाग, हीच त्याची साधना आहे.